Posts

Showing posts from November 20, 2016

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया

Image
दिनांक :-  26/11/2016                              वृत्त क्र . 755   नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी  मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे -     राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया अलिबाग दि .२६ - (जि.मा.का) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील पात्र मतदारांनी मनात संभ्रम शंका न ठेवता निर्भयतेने मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज खोपोली येथे केले. दि.२७ नोहेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यास ते दौऱ्यावर आले होते.       यावेळी खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत  दत्ता भडकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद  दीपक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजु पाटोदकर आधी उपस्थित होते.       यावेळी बोलताना राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले कि, राज्यात येत्या कालावधीत २१२ नगरपरिषद व नगरपंचायती मध्ये निवडणुका होत आहेत. त्याच्या पहिल्या टप्यातील १६५ नगरपंचायती व नगरपालिकांमध्ये  २७ नोहेंबर रोजी  मतदान होणार आहे . त्या

भारतीय संविधान -आमचा अभिमान

Image
दिनांक :- 25 नोव्हेंबर 2016                                                     लेख क्र.58 भारतीय संविधान -आमचा अभिमान             जगाच्या पाठीवर सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगालाही मोठी देणगी दिली आहे. आपले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत झाले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. या घटनेला जवळपास 67 वर्षे पुर्ण होत आहेत.            आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे उद्गाते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, विचारवंत, तत्वज्ञ, दलितांचे कैवारी, एक चाकोरीबाह्य असे उत्तुंग व्यक्तीमत्व अशी कितीतरी विशेषणे ज्यांना लावली तरी ती कमीच पडतील असे आपले डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या देशाचे, अनमोल रत्न होय.      त्यांनी लिहिलेले आपले भारतीय संविधान हा आम्हा, प्रत्येकाचा आहे अभिमान…. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नेहरु युवा  केंद्र अलिबाग यांनी आयोजित एका कार्यक्रमामध्ये  आपले संविधान पूर्णपणे पाठांतर असलेल्या एका म

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक:-  25/11/2016                                                                                                  वृत्त क्र. 750 मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे                                                    --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.25:- (जिमाका) रविवार 27 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवणुकीचे मतदान होणार असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी केले आहे. जिल्ह्यातील उरण, खोपोली,पेण, अलिबाग,मुरुड,रोहा,श्रीवर्धन, महाड, माथेरान या 9 नगरपालिकांसाठी निवडणुक होत आहे.  ही निवडणुक शांततेत पार  पडावी व मतदारांना निर्भयतेने मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनासोबत पोलीस विभाग देखील सज्ज झाला आहे.  प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवार व प्रभाग जिल्हयात होणाऱ्या 9 नगरपरिषदांच्या निवडणूकीसाठी एकूण 81 प्रभाग आहेत. यात 170 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.या 170 नगरसेवक पदासाठी एकूण 528 उमेदवार उभे आहेत. त्याची स

क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रामाची आवश्यकता -देवदत्त नागे

Image
क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रामाची आवश्यकता                                                                                      -देवदत्त नागे              अलिबाग दि.21:- (जिमाका)  -    क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असल्याचे  प्रतिपादन जय मल्हार मालिकेतील   “ श्री खंडेराय यांची भुमिका साकारलेले  देवदत्त नागे यांनी राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी  केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य च्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने नेहुली येथील क्रीडा संकुलात दि. २० ते २२ नोव्हेंबर, २०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे उदघाटन देवदत्त नागे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.                   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिवछत्रपती पुरस्कार विजेते संघटक नथुराम पाटील, मुंबई विभागाचे क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे प्रमोद चांदुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, मुंबई जिल्हा धनुर्विद्य