नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया

दिनांक:-  26/11/2016                              वृत्त क्र. 755

 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी
 मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे
-    राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया

अलिबाग दि .२६ - (जि.मा.का) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील पात्र मतदारांनी मनात संभ्रम शंका न ठेवता निर्भयतेने मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज खोपोली येथे केले. दि.२७ नोहेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यास ते दौऱ्यावर आले होते.
      यावेळी खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत  दत्ता भडकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद  दीपक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजु पाटोदकर आधी उपस्थित होते.
      यावेळी बोलताना राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले कि, राज्यात येत्या कालावधीत २१२ नगरपरिषद व नगरपंचायती मध्ये निवडणुका होत आहेत. त्याच्या पहिल्या टप्यातील १६५ नगरपंचायती व नगरपालिकांमध्ये  २७ नोहेंबर रोजी  मतदान होणार आहे . त्या निमित्त होणाऱ्या साहित्य वाटपाच्या कामाची पाहणी करण्याकरिता मी येथे आलो आहे . खोपोली येथील साहित्य वाटप प्रक्रिया व्यवस्थित होत असून  मतदान केंद्राधिकारी व कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे पाहून समाधान वाटले. मला असा विश्वास आहे कि, राज्यातील सर्वच ठिकाणी निवडणूक साहित्य वाटप प्रक्रिया व्यवस्थित होईल.
उद्या देखील मी काही मतदान केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे .या पाहणीचा उद्देश असा आहे कि, या निवडणूका निर्भयतेने, मुक्त व पारदर्शक व्हाव्यात. मतदारांनी देखील जास्तीत जास्त मतदान करून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा.


                              पथनाट्य पाहणी             
खोपोली नगरपरिषदेच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी करण्यात येत असलेल्या ‘ मतदार राजा जागा हो ’ ! या  पथनाटयाचे आयुक्तां समोर सादरीकरण करण्यात आले . तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांनी आयुक्तांना रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व खोपोली येथील बस स्थानकावर सुरु असलेल्या मतदार जनजागृतीसाठीच्या ध्वनीफितीची माहिती दिली. यावर त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच आयुक्तांसमवेत सर्व उपस्थितांनी मतदानाची शपथ घेतली.
-------------------------------------------------********------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक