Posts

Showing posts from March 3, 2019

इयत्ता सहावीसाठीची प्रवेश परीक्षा 6 एप्रिल रोजी

इयत्ता सहावीसाठीची प्रवेश परीक्षा 6 एप्रिल रोजी अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 8:-   इयत्ता 6 वी साठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.6 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वा. नियोजित परीक्षा केंद्रावर होणार आहे.  यासाठी परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र www.nvs.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावीत व योग्य वेळी, योग्य ठिकाणी परीक्षेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर माणगाव पि.के.नारायणन केले आहे. 000000

पोषण पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image
  अ लिबाग, जि. रायगड, दि.8(जिमाका)- पोषण आहाराविषयी जनजागृती होऊन पोषणमुल्य असलेल्या आहाराबद्दल माहिती होऊन बालकांमधील कुपोषणाची समस्या दूर होण्यासाठी शुक्रवार दि.8 ते 22 मार्च दरम्यान   महिला बालविकास विभागाच्या वतीने   पोषण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आज येथे दिली.                 पोषण आहार पंधरवाड्याची माहिती देण्यासाठी आज जिल्हा परिषदेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुक्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक हे ही उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, या अभियानाचा उद्देश राज्य आणि जिल्हा पातळीवर पोषणासाठी जनजागृती करणे असा असून महिला व बाल विकास विभाग तसेच सामाजिक कल्याण तसेच इतर विभागांबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे. या अंतर्गत जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.                त्यानुसार, 8 मार्च   रोजी पोषण मेला, जनजागृतीसाठी पत्रकार परिषद आयोजित करुन माध्यमांना माहिती देणे,   शनिवार दि. 9 रोजी जिल्ह्यातील सर्व   पंचायत समितीस्तरावर बैठ का घेणे,

अद्ययावत महाड बसस्थानकामुळे कोकणच्या विकासात भर- ना.अनंत गिते

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7:-  महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते. महाड येथील अद्ययावत एस.टी. बस स्थानक हे कोकणाच्या वैभवात व विकासात भर टाकेल,असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते यांनी महाड येथील नुतन एसटी स्थानकाच्या भूमिपुजनप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, महाडचे आमदार भरत शेठ गोगावले,आ.प्रविण दरेकर, प्रांताधिकारी इनामदार, तहसिलदार पवार, एस.टी.विभाग नियंत्रक श्रीमती बारटक्के, महाड पं. स. सभापती सपना मालुसरे, महाडचे उपनगराध्यक्ष वजीर कोंडीवकर, महाड आगारप्रमुख कुलकर्णी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री ना. गिते यांनी  सांगितले की, भारतातील उत्तम परिवहन सेवा देण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाडकरांची गेल्या अनेक वर्षापासून कोकण रेल्वे महाड शहराला जोडण्याची असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे सांगून ना. गिते म्हणाले की, साईडींग मंगूर झाल्यानंतर पेण-अलिबाग

जागतिक महिला दिनःमहिला मतदारांनी आपली नावे नोंदवावीत- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.7(जिमाका)- जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवार दि.8 रोजी महिला मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,   मा.मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार दिनांक 01/01/2019 या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी दिनांक 31/1/2019 रोजी प्रकाशीत करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढविणे तसेच महिलांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग वाढण्यासाठी दिनांक 8 मार्च 2019 रोजी सर्वत्र साजरा होणाऱ्या जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन प्रयत्न होत आहेत. तरी जिल्हयातील सर्व पात्र महिला मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

लोकशाही दिनी पाच अर्ज दाखल

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 -    या महिन्याचा लोकशाही दिन आज   निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी   एकूण 5अर्ज प्राप्त झाले. विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या याप्रमाणे-   मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.रायगड-2,   जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रायगड-1, धर्मादाय आयुक्त कार्यालय रायगड-1, कार्यकारी अभियंता खारभूमी सर्वेक्षण वअन्वेषण विभाग पेण-1   असे एकूण 5 अर्ज प्राप्त झाले आहेत.

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.05:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे बुधवार दि.06 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- बुधवार दि.6 रोजी सकाळी   अकरा वा. ते दुपारी साडेबारा वा. मुक्ताई नगर पेण येथे आगमन व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेतील विविध विकास कामे, मुक्ताईनगर येथील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती.   शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पेण नगरपरिषदेच्या उर्वरित कामाचे भुमिपुजन.   चिंचपाडा गावठाण येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे या कामाचा भुमिपुजन.   मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बाह्य रस्ते प्रकल्प (OARDS) अंतर्गत पेण बाह्यवळण रस्ता टप्पा क्र.2 या   18 कि.मी. रुंदीच्या रस्त्याचा भूमिपुजन समारंभ.   शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत विश्वेश्वर क्षेपणभूमीवर भराव करुन मैदान विकसित करण्याचे कामाचा उद्घाटन कामाचा समांरभ,   रोहिदासनगर येथे संत

विद्यार्थी खेळाडूंच्या वाढीव गुणांकनासाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड    दि.5(जिमाका): शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक (इ.12 वी) परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग,राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्यप्राप्त सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भातील सुधारित कार्यपध्दतीस शासन मान्यता देण्यात आली आाहे.    शासन निर्णयानुसार भारतीय शालेय खेळ महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत खेळ, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित खेळाच्या राज्य संघटना इ.आयोजित खेळ क्रीडा गुणांसाठी ग्राह्य असणार आहेत.    एकविध खेळाच्या राज्य संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांचे अहवाल शासन निर्णयात नमूद कागदपत्रांच्या यादीनुसार परिपूर्ण असतील तरच खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळण्याकरिता शिफारस करण्यात येईल. एखादा खेळाडू विद्यार्थ्यांना क्लबकडून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केलेले प्रतिनिधीत्व अथवा संपादन केलेले प्राविण्य क्रीडा गुण सवलतीसाठी अनुज्ञेय असणार नाही.   जिल्ह्यातील एकविध खेळाच्या संघटनांनी शासन निर्णयातील परिशिष्ट 4 व परिशिष्

सीओसी प्रमाणपत्र वितरण मोहिम

अलिबाग,जि. रायगड दि.5(जिमाका):-   औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे ता. रोहा येथील  सन 2007 ते 2016 मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स  यायोजनेतील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र संस्थेकडे प्राप्त झाले आहेत.  त्सएच सन 2007 ते 2018 या कालावधीतील शिल्प कारागीर योजनेतील  प्रमाणपत्रही प्राप्त झाली आहेत. ही प्रमाणपत्रे सर्व  उत्तीर्ण कारागिरांनी  15 मार्च पासून संस्थेतून घेऊन जावीत. प्रमाणपत्र नेण्यासाठी सोबत फोटो, ओळखपत्र, गुणपत्रक/ तात्पुरते प्रमाणपत्र इ. सोबत आणावे असे आवाहन  प्राचार्य श्रीमती चव्हाण यांनी केले आहे.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळः थेट कर्ज योजनेच्या मर्यादेत एक लाख रुपयांपर्यंत वाढ

अलिबाग,जि. रायगड दि.5(जिमाका):-   शामराव पेजे कोकण इतर मागारवर्गीय आर्थिक विकास महामंडळ  मर्यादित मार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब, होतकरू व बेरोजगार व्यक्तिंना व्यवसाय/ स्वयंरोजगार करण्यासाठी अल्प व्याज दराने कर्ज दिले जाते. त्याअंतर्गत महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेची मर्यादा आता 25 हजार रुपयांवरून  1 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकषः लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी व इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा. वय 18 ते 55 वर्षे दरम्यान,   एकत्रिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे,   सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदार थकबाकीदार नसावा,   शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत नियुक्त संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारास प्राधान्य. या योजेनअंतर्गत घेतलेले कर्ज हे 4 वर्षा फेडावयाचे असते. नियमित कर्जफेड केल्यास   व्याज आकारले जात नाही.   या अंतर्गत मत्स्य व्यवसाय, मोबाईल दुरुस्ती, गॅरेज, फ्रीज एसी दुरुस्ती,   मटण चिकन शॉप, इ. व्यवसाय करता येतात.   तरी गरजू व इच्छुकांनी   शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थि

पल्स पोलीओ लसीकरणःजिल्ह्यात रविवारी (10 मार्च) लसीकरणः 2 लाख 72 हजार बालकांना डोस देण्याचे नियोजन

अलिबाग,जि. रायगड दि.5(जिमाका):-   राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत  येत्या रविवार दि.10 रोजी  रायगड जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील  2 लाख 72 हजार 748 बालकांना या मोहिमेत लसीकरण करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी,   जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. काटकर आदी उपस्थित होते.   यावेळी   जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यंत्रणानिहाय पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी माहिती देण्यात आली की,   जिल्ह्यात ग्रामिण व शहरी मिळून   2 लाख 72 हजार 748 अपेक्षित लाभार्थी आहेत. त्यासाऱ्यांना डोस पाजण्यासाठी ग्रामिण भागात 2925 तर शहरी भागात 241 अशा एकूण 3166 बुथवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.   या लसीकरणासाठी 7224 आरोग्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत.   या मोहिमेत शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येईल. रेल्वेस्टेशन, बस स्थानके अशा ठिकाणीही

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाःजिल्ह्यातून 14 हजार 277 कामगारांचा सहभाग ;सहभाग नोंदविण्यात रायगड जिल्हा राज्यात दुसरा

Image
अलिबाग,जि. रायगड दि.5(जिमाका):-   केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरु केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नाव नोंदणी करण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ आज देशपातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रायगड जिल्ह्यातील 14 हजार 277 कामगारांनी या योजनेत सहभाग घेतला असून राज्यात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. सदर उद्घाटन समारंभास जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रकाश गजऋषी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचे गिरीष डेकाटे,   भारतीय मजदूर संघाचे   संघटन मंत्री मोहन पवार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे रुद्र प्रसाद, सहाय्यक संचालक ओमप्रकाश ठाकूर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकूश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधि

मतदार नोंदणी विशेष अभियान जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवशींनी केली मतदान केंद्रांची पाहणी

Image
अलिबाग,जि. रायगड,दि.३(जिमाका)- मतदार नोंदणी विशेष अभियान (२ व ३ मार्च) निमित्त जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दोन दिवस जिल्ह्यातील दुर्गम भागातील तसेच अन्य विविध भागातील मतदान केंद्रांची पाहणी केली, शिवाय तेथे होत असलेल्या मतदार नोंदणीचा आढावा ही घेतला. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, शनिवार दि.२व रविवार दि.३ असे दोन दिवस विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या मोहिमेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काल तळा तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तर आज (रविवारी)जिते, खरोशी ता.पेण तसेच पनवेल तालुक्यातील मतदान केंद्रास भेट देऊन तेथील सोयी सुविधांची पाहणी केली.              जिल्ह्याभरात दिवसभर नवीन मतदार नोंदणी, नावे वगळणे, पत्ता बदल आदी कामांसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडे संपर्क करीत होते. दिवसभर नाव नोंदणीसाठी लोक मतदान केंद्रांवर जाताना दिसत होते.यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यातून माहिती संकलित करून नेमकी आकडेवारी