पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.05:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे बुधवार दि.06 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
बुधवार दि.6 रोजी सकाळी  अकरा वा. ते दुपारी साडेबारा वा. मुक्ताई नगर पेण येथे आगमन व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेतील विविध विकास कामे, मुक्ताईनगर येथील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती.  शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पेण नगरपरिषदेच्या उर्वरित कामाचे भुमिपुजन.  चिंचपाडा गावठाण येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे या कामाचा भुमिपुजन.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बाह्य रस्ते प्रकल्प (OARDS) अंतर्गत पेण बाह्यवळण रस्ता टप्पा क्र.2 या  18 कि.मी. रुंदीच्या रस्त्याचा भूमिपुजन समारंभ.  शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत विश्वेश्वर क्षेपणभूमीवर भराव करुन मैदान विकसित करण्याचे कामाचा उद्घाटन कामाचा समांरभ,  रोहिदासनगर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रवेशद्वार उद्घाटन व लोकार्पण सोहळा.  शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदेच्या स्टेडीयममध्ये पॅव्हेलियन बांधण्याच्या कामाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा.  दु. साडेबारा वा. रविशेठ पाटील, माजीमंत्री यांच्या निवासस्थानी भेट व राखीव.   दु. पावणेदोन वा. जांबोशी कोळेटी रस्ता डांबरीकरण कामाचे भुमिपुजन.  दु.सव्वा दोन वा. वरसई फाटा ते वरसई गाव या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमीपुजन.  दु.अडीच वा. शासकीय आश्रमशाळा वरसईकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भुमिपुजन.  दु. चार वा. पेणे येथून महाडकडे प्रयाण.  सायं.सहा वा.हॉटेल विसावा महाड येथे आगमन व राखीव.
गुरुवार दि. 7 रोजी सकाळी नऊ वा. शासकीय विश्रामगृह महाड येथे आढावा बैठक. स. अकरा वा. महाड एस.टी.स्थानकाचे भुमिपुजन.  दुपारी बारा वा. महाड   येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक