Posts

Showing posts from August 13, 2017

अतिवृष्टीची पुर्वसुचना; सतर्कतेचा इशारा

अलिबाग दि.19 (जिमाका)-   प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून येत्या 48 तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 से.मी ते 12 से.मी)  होण्याची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच दरडग्रस्त, नदी किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना साधवगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. पुरस्थिती उद्भवल्यास त्यास समोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रुग्णवाहिका इ. सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्तीची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322 या क्रमांकावर द्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त कुरुळ येथे रक्त तपासणी शिबीर

अलिबाग दि.19, (जिमाका)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग व जिल्हा परिषद शाळा, कुरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड अलिबाग यांच्या सहकार्याने कुरुळ येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन व एच. आय. व्ही. तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, संकेत घरत,   एच. आय. व्ही. विभागाचे रुपेश पाटील, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार,   रा.जी.प. शाळा कुरुळचे मुख्याध्यापक विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर आदी मान्यवर उपस्थित   होते.   या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. प्रतिम सुतार यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.  तसेच जंतांचा प्रादुर्भाव हा अस्वच्छता व मलिनता, तीव्र संसर्गाची लक्षणे आदींबाबत माहिती देण्यात आली.   यावेळी शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट व ग्रामस्थांची रक्तगट, हिमोग्लोबिन व   एच. आय. व्ही. तपासणी करण्यात आली. हा कार्यक्रम

केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग दि.19 (जिमाका)- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गीते यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दि.20 रोजी सकाळी नऊ वाजता मुंबई येथून शासकीय वाहनाने महाडकडे प्रयाण. दुपारी एक वाजता महाड विश्रांतीगृह येथे आगमन. दुपारी दोन वाजता महाड येथून शासकीय वाहनाने रत्नागिरीकडे प्रयाण.

ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा

  अलिबाग दि.19 (जिमाका) राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क  मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दिनांक 23 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. बुधवार दिनांक 23  रोजी सकाळी साडे दहा वाजता. शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आगमन व राखीव. सकाळी अकरा  ते दुपारी  एक वाजता जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी राखीव. स्थळ- अधिक्षक अभियंता,महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह. दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद, स्थळ- अधिक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह. दुपारी चार वाजता  पनवेल येथून मुंबईकडे मोटारीने प्रयाण.

सीडीएस परीक्षेसाठी पुर्वतयारी प्रशिक्षण: जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या 22 रोजी मुलाखती

 अलिबाग दि.19,(जिमाका)- संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली यांचे मार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी Combined Defence Services (CDS) ची परीक्षा 19 नोव्हेंबर, 2017 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी  नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे  दि.29 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित  प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना लाभ घेता यावा, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड- अलिबाग येथे  मंगळवार, दि.22 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड- अलिबाग यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे की, सीडीएस  परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर, 2017 अशी आहे. सदर परीक्षेची जाहिरात 9 ऑगस्ट, 2017 या तारखेच्या एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर (रोजगार समाचार) मध्ये आणि संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली यांची वेबसाईट https:// www.upsconline.nic.in   येथे प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी Combined Defence Services (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून

पुणे येथे 18 सप्टेंबर पासून क्रीडा निवड चाचणी

 अलिबाग दि.19, (जिमाका) :-   आर्मी स्पोर्टस्‍ इन्स्टीट्युट,पुणे यांचेमार्फत दि.18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत आरचेरी(तिरंदाजी) ॲथलेटिक्स्(मैदानी खेळ) बॉक्सिंग (मूक्केबाजी) डायविंग, फेन्सिंग, वेट लिफ्टिींग (भारोत्तोलन), रेसलींग (कूस्ती) या खेळासाठी संपूर्ण देशातून   खुल्या निवड व प्रवेश प्रक्रियेचे आयोजन केले आहे. वयोमर्यादा- दिनांक 1 सप्टेंबर 2017 रोजी 8 ते 14 वर्षे, शैक्षणिक पात्रता- कमीत कमी 4 थी पास(बरोबर इंग्रजी व हिंदी चे चांगले ज्ञान असावे), मेडीकल फिटनेस- मेडीकल चाचणी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टीट्युट पुणे यांचेडून घेतली जाईल.डायविंग साठी फक्त्‍- उमेदवाराला स्वीमिंग (100 मीटर)आणि जिम्नॅस्टिकचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विशेष सूचना- उमेदवाराच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा टॅटू (गोंदण नसावे.) खेळ प्रकारानुसार आवश्यक शारिरीक क्षमता व वयोमर्यादा यापमाणे- आरचेरी(तिरंदाजी) वय- 8 ते 14 आहे., उंची 134से.मी.वजन 29 कि.ग्रॅ. ॲथलेटिक्स्(मैदानी खेळ) वय-09 उंची 139से.मी.वजन 31 कि.ग्रॅ. बॉक्सिंग (मूक्केबाजी) वय-10 वर्ष,उंची 143से.मी.वजन 34 कि.ग्रॅ.,   फेन्सिंग, वय-11,वर्ष,उंची 150स

स्त्री समस्या जनजागृतीपर देखावे उभारण्याचे गणेश मंडळांना आवाहन

सर्वोत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या मंडळांना पारितोषिके अलिबाग दि.19,(जिमाका):-   स्त्री भृणहत्या,हुंडाबळी,कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, बाल लैंगिक शोषणापासून संरक्षण, मुलगी वाचवा मुलगी शिकवा,मुलगा व मुलीस घरामध्ये समान वागणूक या सारख्या स्त्री समस्याप्रधान विषयांवर जनजागृती व्हावी यासाठी अलिबाग नगरपरिषद   हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी जनजागृतीपर देखावे, नाटिका आदी सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या विषयांवर जनजागृतीपर देखावे सादर करणाऱ्या मंडळांना प्रथक क्रमांक दोन हजार, द्वितीय क्रमांक एक हजार व पाचशे रुपये तसेच प्रशस्तीपत्र तसेच स्मृतीचिन्ह या स्वरुपात पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.  इच्छुक मंडळांनी आपल्या मंडळाचे नाव सविस्तर पत्ता,सादर करण्यात येणाऱ्या नाटीका कार्यक्रम,पोस्टरचा विषय याबाबत  ‘जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय’ श्रीबाग नं.2,डॉ.वाजे हॉस्पीटल जवळ, ता.अलिबाग,जि. रायगड येथे गुरुवार, दि.24 ऑगस्ट पर्यंत माहिती नोंदवावीत. पुरस्कारासाठी समिती नोंदविलेल्या मंडळाचे परिक्षण करुन तीन गणेश उत्सव म

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन

अलिबाग दि.19,(जिमाका):-   सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या   शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्राधान्यांने निकाली काढण्याचे आदेश दि.10 ऑगस्ट 2017 रोजी निर्गमित झाले आहेत. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता केवळ Undertaking देवून प्रवेश घेतला आहे,   अशा   विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश रद्द होणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी नंतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, प्रशासकीय इमारत,गोंधळपाडा,ता.अलिबाग जि.रायगड येथे प्रस्ताव सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र समिती,अलिबाग-रायगड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना प्रतिज्ञा

Image
अलिबाग दि.19 (जिमाका), सद्भावना दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीधर बोधे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांना  प्रतिज्ञा दिली. प्रारंभी माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर  उपजिल्हाधिकारी बोधे यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी सर्वसाधारण शाखेचे तहसिलदार के.डी.नाडेकर, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.19, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.46 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2360.54  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 0.00 मि.मि., पेण-13.20 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-35.60 मि.मि., उरण-2.00 मि.मि., कर्जत-04.40 मि.मि., खालापूर-26.00 मि.मि., माणगांव-01.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-8.00 मि.मि., महाड-13.00 मि.मि., पोलादपूर-21.00, म्हसळा-08.20 मि.मि., श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-11.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 183.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.46 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   75.91 % इतकी आहे. 00000

राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव; आणि पारितोषिक वितरण समारंभ यंदा अलिबाग येथे; आज पासून महोत्सवास प्रारंभ; 21 रोजी पारितोषिक वितरण

अलिबाग दि.18(जिमाका), सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत   56 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.   तर 21 तारखेला राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पुरस्कार प्रदान होणार आहे. या महोत्सवात पी.एन.पी. नाट्यगृह   येथे दि.19 ऑगस्ट 2017 रोजी सायंक 7 वाजता हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते नाटक   एम.एच.12 जे 16   हे प्रयोग,पुणे ही संस्था सादर करणार आहे. दि.20 ऑगस्ट   2017 रोजी दुपारी 12.30 वाजता संस्कृत नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते   बिंदू संदेश:   हे नाटक संक्रमण, पुणे ही संस्था सादर करणार आहे. याच दिवशी दुपारी 2 वाजता बालनाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक   हॅलो ब्रदर   हे बालनाटक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगांव दाभाडे शाखा ही संस्था सादर करणार असून याच दिवशी सायं. 7 वाजता हिंदी नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते   ये कौन चित्रकार है   हे नाटक अविष्कार, मुंबई ही संस्था सादर करणार आहे. पारि

माथेरान संनियंत्रण समितीची बैठक 23 रोजी

  अलिबाग दि.18,(जिमाका) :-   पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिल क्षेत्रातील विकास कामांच्या मान्यतेसाठी घ्यावयाच्या माथेरान संनियंत्रण समितीची बैठक बुधवार दि.23 रोजी सकाळी माथेरान ता. कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील अधिसूचनेनुसार रायगड व ठाणे जिल्ह्यातील 89 गावांचा भाग संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.  या गावांमध्ये करावयाची विकासकामे करतांना संनियंत्रण समितीच्या पुर्व मान्यतेखेरीज करता येत नाहीत. त्यासाठी सेवानिवृत्त  सनदी अधिकारी वासूदेव गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे.  या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी रायगड हे आहेत. या समितीची तिसरी बैठक बुधवार दि.23 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृह, दस्तूरी, माथेरान ता. कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विकास कामांविषयक, बांधकामे व बांधकामांचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात करावयाचे कोणतेही खाणकाम, भुगर्भातील पाण्याची विक्री  या सारख्या विषयांना समितीची पूर्वमान्यता आवश्यक आहे. तसेच या समितीकडे कोणासही  तक्रारी अर्ज द्

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग दि.18,(जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.36 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2349.07   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 1.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-10.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-12.40 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-04.00 मि.मि., रोहा-01.00 मि.मि., सुधागड-1.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-2.00 मि.मि., पोलादपूर-05.00, म्हसळा-04.30 मि.मि., श्रीवर्धन-04.00 मि.मि., माथेरान-09.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 53.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.36 मि   इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   74.75 % इतकी आहे. 000000

जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती बैठक:जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 2 कोटी 22 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता

Image
अलिबाग दि.18,(जिमाका) :- जिल्ह्यातील युवकांना स्थानिक भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, अपरंपरागत व्यवसाय उपलब्ध नैसर्गिक संसाधने आदींच्या आधारे विविध क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी स्व. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत 2 कोटी 22 लाख रुपयांच्या कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृ.न.देशमुख, जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस.जी. पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहाय्यक संचालक पवार यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा सादर केला. त्यानुसार बॅंकिंग ॲण्ड अकाऊंटींग, सीएनसी ऑपरेटर, बांधकाम क्षेत्र, वाहतूक आणि पर्यटन, माल वाहतूक, माल साठवणूक आणि पॅकिंग, फॅब्रिक

उद्योगमित्र समितीची बैठक:आजारी उद्योगांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करावा- जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी

Image
अलिबाग दि.18, (जिमाका) :- जिल्ह्यातील आजारी उद्योगांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुनर्वसन कार्यक्रम मंजूर करण्यासाठी आजारी उद्योगांच्या एकत्रित माहितीचा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. जिल्हा उद्योग मित्र व सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षेतखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृ.न.देशमुख, तसेच उद्योग मित्र समितीचे सदस्य अनिल खालापूरकर, महादेव पाटील, अशोक पाटील, सतिष चव्हाण, महेश गोराडे नजिर फोफलूनकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एमआयडीसीच्या समस्या जाणून घेतल्या. या सर्व समस्यांचे  निराकरण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी आणि जिल्हा कौशल्य  विकास केंद्र या तिनही विभागांनी एकत्रित प्रयत्न करुन जिल्ह्यातील 18 ते 35 वयोगटाती

“कातकरी उत्थान” कोकण विभागाचा अभिनव उपक्रम

        महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यातील सर्वच घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात.  तरीदेखील सर्वच योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यास अनेक अडचणी निर्माण होतात.  यासाठी कोकण विभागातील विभागीय महसूल आयुक्त, डॉ.जगदीश पाटील यांनी एक अभिनव योजना प्रत्यक्षात राबविली आहे.  कातकरी लोकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी “ कातकरी उत्थान योजना ” ही योजना आणली आहे.   या योजनेमुळे कोकण विभागातील  कातकरी समाजाला शासकीय योजनांचा प्रत्यक्ष तात्काळ लाभ मिळणार आहे.  त्यासाठी त्यांना “ अनुलोम ” या सामाजिक संस्थेची मदतही घेतली आहे.  ठाणे येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी एक बैठक घेतली  आणि त्या बैठकीत या योजनेचा शुभारंभ केला.  रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय नामदेव सूर्यवंशी यांच्या उपस्थितीतही एक बैठक झाली.             कातकरी या समाजाला कातवडी, काथोडी, काथेडीया या नावानेही ओळखले जाते.  मुळात हा समाज भटक्या आदिवासी समाजामध्ये मोडतो.  कात तयार करणे  हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता.  त्यावरुन त्यांना

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3 मि.मि.पावसाची नोंद

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3  मि.मि.पावसाची नोंद         अलिबाग दि.18, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.36 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2349.07  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 1.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-10.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-12.40 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-04.00 मि.मि., रोहा-01.00 मि.मि., सुधागड-1.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-2.00 मि.मि., पोलादपूर-05.00, म्हसळा-04.30 मि.मि., श्रीवर्धन-04.00 मि.मि., माथेरान-09.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 53.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.36 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   74.75 % इतकी आहे. 0000

गणेशोत्सवपुर्व रस्ते डागडुजीच्या कामांना आला वेग:ना. चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

Image
अलिबाग,दि.17,(जिमाका):- गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान आज सकाळी राज्याचे महसूल, मदत-पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम(सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी आज या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी  सायन ते पनवेल महामार्ग, तेथून पुढे पळस्पे फाटा येथून वडखळ मार्गे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांचे समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधानसचिव  आशिष सिंग, सचिव सी.पी.जोशी, सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम कोकण विभागाचे मुख्य अभियंता श्री. केडगे, विशेष प्रकल्प अधिक्षक आर.टी. पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजीव सिंग व प्रशांत फेगडे आदी वरीष्ठ अधिकारी तसेच स्थानिक बांधकाम व महसूल प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी पळस्पे फाटा मार्गे जितेगाव, वडखळ, नागोठणे, वाकण फाटा मार्गे पाली ते खोपोली रो

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.17, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.54मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2345.72  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 2.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-9.50 मि.मि., कर्जत-13.80 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-20.00 मि.मि., रोहा-08.00 मि.मि., सुधागड-4.00 मि.मि., तळा-5.00 मि.मि., महाड-9.00 मि.मि., पोलादपूर-23.00, म्हसळा-0.00 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-17.30 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 136.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 8.54 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   74.64 % इतकी आहे. 0000

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

अलिबाग दि.16 (जिमाका), राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील हे गुरुवार दिनांक 17 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. गुरुवार दिनांक 17 रोजी सकाळी साडे सात वाजता सीबीडी फ्लाय ओव्हर येथे आगमन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शासकीय वाहनाने पनवेल-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा, सकाळी साडे दहा वाजता शासकीय वाहनाने वाकण-पाली-खोपोली-एक्सप्रेस वे मार्गे मुंबईकडे रवाना. 00000

स्वस्तधान्य दुकानदारांच्या मार्जिन दरात वाढ

अलिबाग,दि.16,(जिमाका):- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वितरणासाठी शिधावाटप,रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिन मध्ये देण्यात येत असलेल्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. रास्त भाव दुकानदारांना ए.पी.एल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य् गट व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गहू,तांदूळ,साखर व भरड धान्याच्या वितरणासाठी सध्या मिळत असलेल्या रु.70/-प्रती क्विंटल या मार्जिनमध्ये रु.80/- इतकी वाढ करुन त्यांना रु.150/- प्रती क्विंटल या प्रमाणे मार्जिन देण्यात येईल. प्रस्तावित वाढीव दराने मार्जिन ही अन्नधान्य व साखर विक्री ऑनलाईन व्यवहाराद्वारे करणाऱ्या रास्तभाव दुकानदारांनाच लागू करण्यात येईल . याची सर्व रास्त भाव दुकानदारांनी याची नोंद घ्यावी.असे जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे. 00000000

एचआयव्ही प्रतिबंधासाठी संयमित जीवन आवश्यक - डॉ.अजित गवळी

Image
अलिबाग,दि.16,(जिमाका):- एच.आय.व्ही एडस या आजाराच्या प्रतिबंधासाठी, संयमित जीवनचर्या  आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी आज येथे केले. खानाव ता. अलिबाग येथे एच.पी.गॅस कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एच.आय.वही एडस बाबत जनजागृती करण्यासाठी जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी  वरिष्ठ व्यवस्थापक कृष्ण नारायण तरबेज, मुकूंद जवंजाळ, विराज नारायण किर, नवनाथ लबडे, डॉ. दीपक गोसावी, समुपदेशक अर्चना जाधव, सुजाता तुळपळे आदी उपस्थित होते. यावेळी  गरोदर मातांना असलेला संसर्ग व त्यावरील उपचार पद्धती,  मोफत तपासणी व समुदेशन सुविधा आदींबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. जनजागृती रॅली जिल्हा एडस्‍ प्रतिबंध व नियंत्रण विभाग,जिल्हा सामान्य रुग्णालय व रुरल अँड यंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त् विद्यमाने एचआयव्ही,एडस् विषयी जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे (12 ऑगस्ट )औचित्य् साधून स्वातंत्र्य दिनी(15ऑगस्ट्) रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी उपस्थितांना श