पुणे येथे 18 सप्टेंबर पासून क्रीडा निवड चाचणी

 अलिबाग दि.19, (जिमाका) :- आर्मी स्पोर्टस्‍ इन्स्टीट्युट,पुणे यांचेमार्फत दि.18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत आरचेरी(तिरंदाजी) ॲथलेटिक्स्(मैदानी खेळ) बॉक्सिंग (मूक्केबाजी) डायविंग, फेन्सिंग, वेट लिफ्टिींग (भारोत्तोलन), रेसलींग (कूस्ती) या खेळासाठी संपूर्ण देशातून  खुल्या निवड व प्रवेश प्रक्रियेचे आयोजन केले आहे.
वयोमर्यादा- दिनांक 1 सप्टेंबर 2017 रोजी 8 ते 14 वर्षे,
शैक्षणिक पात्रता- कमीत कमी 4 थी पास(बरोबर इंग्रजी व हिंदी चे चांगले ज्ञान असावे),मेडीकल फिटनेस- मेडीकल चाचणी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टीट्युट पुणे यांचेडून घेतली जाईल.डायविंग साठी फक्त्‍- उमेदवाराला स्वीमिंग (100 मीटर)आणि जिम्नॅस्टिकचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
विशेष सूचना-उमेदवाराच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा टॅटू (गोंदण नसावे.)
खेळ प्रकारानुसार आवश्यक शारिरीक क्षमता व वयोमर्यादा यापमाणे-
आरचेरी(तिरंदाजी) वय- 8 ते 14 आहे., उंची 134से.मी.वजन 29 कि.ग्रॅ.
ॲथलेटिक्स्(मैदानी खेळ) वय-09 उंची 139से.मी.वजन 31 कि.ग्रॅ.
बॉक्सिंग (मूक्केबाजी) वय-10 वर्ष,उंची 143से.मी.वजन 34 कि.ग्रॅ.,  
फेन्सिंग, वय-11,वर्ष,उंची 150से.मी.वजन 37 कि.ग्रॅ.
वेट लिफ्टिींग (भारोत्तोलन), वय-12 वर्ष,उंची 153से.मी.वजन 40 कि.ग्रॅ.
रेसलींग (कूस्ती) वय-13 वर्ष,उंची 155से.मी.वजन 42 कि.ग्रॅ.
स्विमिंग- 14 वर्ष,उंची 160से.मी.वजन 47 कि.ग्रॅ.
डायविंग, वय-14,उंची 160से.मी.वजन 47कि.ग्रॅ.
सोबत लागणारे कागदपत्र-(ओरीजनल व फोटोकॉफी)-जन्म प्रमाणपत्र (म्यूनिसिपल किंवा रजिस्टार यांनी दिलेले),जातीचा दाखला,शाळेचा शिक्षणाचा दाखला,सरपंच यांनी दिलेले चरित्र प्रमाणपत्र, डोमॅसील सर्टिफिकेट, रहिवासी दाखला फोटोसहीत (तहसिलदार किंवा एसडीएम यांनी दिलेले), 06 फोटोग्राफ,खेळाचे जिल्हा व राज्य्‍ स्तरीय प्रमाणपत्र,आधार कार्ड.
आवश्यक कागदपत्रांसह आर्मी स्पोर्टस्‍ इन्स्टिट्युट, मूंढवा रोड पुणे, येथे दिनांक.18 सप्टेंबर 2017  रोजी सकाळी सात वाजल्या पासून पुढे उपस्थित रहावे.

अधिक माहिती करीता-बॉईज स्पोर्टस्‍ कंपनी, आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युट,नवीन मूंढवा रोड, घोरपडी,पुणे-संकेतस्थळ- www.armysportsinstitute.com ई-मेल-armysports@rediffmail.com दूरध्वनी क्र. 020-20265355, 26022928, 26881753  येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर प्रांजल.पी.जाधव (निवृत्त) जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, रायगड-अलिबाग, दूरध्वनी क्र.02141-222208 येथे संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक