Posts

Showing posts from June 2, 2019

जावळी ता.माणगाव येथे शैक्षणिक वर्षे 2019-20 करिता मोफत प्रवेश

अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- सामाजिक न्याय व दि.विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा जावळी ता.माणगाव येथे शैक्षणिक वर्षे 2019-20 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्याकरिता मोफत प्रवेश दिला जात आहे.             या शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे आरक्षण आहे.   अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, अपंग प्रवर्ग 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के.    शासकीय निवासी शाळेची वैशिष्टये पुढीलप्रमाणे- शाळा विभाग व निवासकरिता स्वतंत्र इमारती.   शासनामार्फत विनामूल्य राहण्याची, जेवाणाची सोय.   विनामूल्य गणवेश व शैक्षणिक साहित्य आणि निवासी साहित्य.   सुसज्य ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, भव्य खेळाचे मैदान व क्रीडा साहित्य, डिजिटल स्कूल,म्युझिक सिस्टीम व दुरदर्शन संच.             कार्यालयात उपलब्ध्‍ प्रवेश अर्ज विहित नमुन्यात पुढील कागदपत्रासह सादर करावा. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला स्वत:चा नसल्यास वडिलांचा.   पालकांचा उत्पन्नाचा दाखला.   रहिवाशी दाखला (सरपंच,पोलीस पाटी

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे   आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.             शनिवार दिनांक 8 जून रोजी सकाळी साडे आठ वा. डोंबिवली निवासस्थान येथून खालापूर, जि.रायगडकडे प्रयाण.    दहा वा. वावोशी ता.खालापूर येथे   आगमन व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.   दुपारी एक ते दीड वा. राखीव.   दीड वा. वावोशी ता.खालापूर येथून अलिबागकडे प्रयाण.   अडीच वा. अलिबाग येथे आगमन व भाजपा जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. स्थळ : मेघा टॉकीज,चेंढरे अलिबाग.   सायं. सहा वा. अलिबाग येथून पलावा डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण. 000000

शिवराज्याभिषेक सोहळा शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज रायगड

Image
किल्ले रायगड, ता. महाड, जि.रायगड,दि.6 (जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी उपस्थित हजारो शिवप्रेमींनी केलेल्या शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुर्गराज रायगड दुमदुमला. शिवकाळात घेऊन जाणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या सोहोळ्याला राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण,माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, किल्ले रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे, बल्गेरियाचे राजदूत एलेनोरा दिमित्रोवा, तुनुशियाचे राजदूत नेजमेद्दिन लाखाल, पोलंड दूतावास सल्लागार दामियान इरझिक व श्रीमती इव्हा स्टॅकिन्किझ, चिन दुतावासाचे सल्लागार ल्यू बिंग आणी डॉ. संग झिंपू आ.अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी,शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सर्वत,महाडचे प्रांताधिकारी इनामदार, तहासिलदार पवार, नायब तहसिलदार कुडल आदी मान्यवर उपस्थित होते. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहोळ्यामध्ये छत्रपती शिवरायांवर अभिषेक करण्याचा मान

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.4 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.             बुधवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी सहा वा. डोंबिवली निवासस्थान येथून महाड, जि.रायगडकडे प्रयाण.   रात्रौ दहा वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह महाड येथे आगमन व राखीव.   गुरुवार दिनांक 6 जून रोजी पहाटे पाच वा. महाड येथून किल्ले रायगडकडे प्रयाण.   सहा वा. किल्ले रायगड येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्यास उपस्थिती.   साडे नऊ वा. किल्ले रायगड येथून पलाव डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण. 000000

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

अलिबाग, जि. रायगड, दि.4 (जिमाका)- जिल्ह्यात काही ठिकाणी शासनाच्या परवानगी शिवाय अनधिकृत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.   या संबंधित शाळा चालकांनी   सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात   शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय शाळा सुरु करु नये, तसेच पालकांनी अनधिकृतशाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमि शैलजा दराडे यांनी केले आहे.   अशा अनधिकृत शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास   संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी   शिक्षणाचा अधिकारी कायदा 2009 च्या व महाराष्ट्र शासन नियमावली 2011 च्या अनुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.   तरी पालकांनी जागरुक राहून आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत विद्यालयात घेऊ नये. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही अन्य मान्यता प्राप्त प्राथमिक शाळांमधून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास पालकच जबाबदार राहतील, याची पालकांनी नोंद द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळा अलिबाग तालुक्यात एक, पनवेल मध्ये 10,   रोह्यात दोन, म्हसळा तालुक्यात 4, क

जिल्ह्यात 7 गोवर्धन गोंवश केंद्र मंजूर इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले

अलिबाग, जि. रायगड, दि.4 (जिमाका)- केंद्रशासनाने रायगड जिल्हयामध्ये 7 गोवर्धन गोवंश सेवा केंद्र मंजुर केले आहेत. रायगड जिल्ह्यातील सात उपविभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे हे केंद्र मंजूर असून हे केंद्र चालवून गोसंवर्धनाचे काम करु इच्छिणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे की, सन 2019-20 साठी  अलिबाग, पनवेल, माणगाव, महाड, पेण, रोहा, श्रीवर्धन या महसूली विभागात ही केंद्र मंजूर झाली आहेत. केंद्र शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्ती ची पुर्तता करणाऱ्या संस्थांची निवड या गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांसाठी केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्राथमिक पडताळणी छाननी करुन हे प्रस्ताव आयुक्त पशुसंवर्धन  महाराष्ट्र राज्य औैंध पुणे यांचे कडे सादर करावयाचे आहेत. या करीता शासनाने कालबध्द कार्यक्रम ठरवून वेळापत्रक निश्चीत केले आहे. 1.       अनुदानासाठी संबधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, यांचेकडे अर्ज व इतर अनुषंगीक माहीती सादर करण्याचा अंतिम दिनांक- 30 जुन 2019. 2.  

राष्ट्रीय लोकअदालत 13 जुलै रोजी

अलिबाग,रायगड,दि.4 (जिमाका)  :  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यात शनिवार दि. 13 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिली आहे.             या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे,  138 एन.आय.ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत.  तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकांबाबतची वादपूर्व प्रकरणे,भारत दूरसंचार निगम,विज वितरण,राष्ट्रीयकृत बँका,पतसंस्था यांचे वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील.  राष्ट्रीय लोक अदालतीत प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्यास लोकांचा वेळ व पैसा यांचा अपव्यय होत नाही.  पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो.  तरी या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग अभय वाघवसे यांन

निवासी क्रीडा प्रबोधिनी प्रवेश चाचणी 24 जून पासून जिल्ह्यातील खेळाडूंना लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,रायगड,दि.4 (जिमाका) :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत निवाडी क्रीडा प्रबोधिनी करिता प्रवेश दिला जातो.   त्यासाठी प्रवेश चाचण्यांचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. प्रवेश प्रक्रिया ही सरळ प्रवेश प्रक्रिया पध्दतीने राबविली जाणार आहे.   राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्व केलेले 19 वर्षे वयाच्या आतील खेळाडूंच्या चाचण्या तज्ज्ञ समिती घेईल.   त्यात पहिल्या टप्प्यात सरळ प्रवेश प्रक्रिया 24 ते 25 जून   रोजी होईल.   दुसऱ्या टप्प्यात खेळनिहाय कौशल्य चाचणी 25 ते 26 जून रोजी होईल.             या चाचण्या क्रीडाप्रकार निहाय होणार आहेत.   त्यात आर्चरी क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथे, हॅन्डबॉल क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे तर ॲथेलेटिक्स, जलतरण शुटिंग, सायकलिंग, हॉकी,टेबलटेनिस, वेटलिप्टिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती,बॅडमिंटन या क्रीडा प्रकारांच्या चाचण्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे-45 येथे होतील.   चाचण्यांच्या दिवशी खेळाडूंनी त्या त्या तारखेस व ठिकाणी सकाळी   10 वा. उपस्थित रहावय

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -   दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त   प्रातिनिधी स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.   केंद्रशासनाने सन 2018-19 या वर्षाच्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. त्यासाठी   MHRD ( www.mahrd.gov.in ) या बेवसाईटवरील http;//www.nationalawardtoteachers.com या लिंकवर नावनोंदणी सुरु झाली आहे. इच्छुक शिक्षकांनी   दि.15 जून पर्यंत आपले ऑंनलाईन अर्ज नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

सैनिकांच्या पाल्यांसाठी नवेनगर येथे वसतिगृह

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -   सैनिकी मुलांचे वसतिगृह नवेनगर, महाड येथे युद्धविधवांच्या पाल्यांना विनाशुल्क तर माजी सैनिक, विधवा, आजी/ माजी सैनिकांचे पाल्य   व अन्य नागरिकांच्या पाल्यांना   वाजवी दरात भोजन शुल्क आकारुन   प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2019-20 करीता प्रवेश अर्ज   मागविण्यात आले आहेत. हे अर्ज वस्तिगृह अधिक्षकांकडे उपलब्ध आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत   15 जुलै पर्यंत असून अधिक माहिती साठी मुलांचे वसतिगृह नवेनगर, महाड येथे (दूरध्वनी-02145-225451) संपर्क साधावा. 00000

वसतिगृह अधिक्षक पदासाठी तात्पुरती नेमणूक; अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड- अलिबाग यांच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह महाड येथे एकत्रिक मासिक मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात वसतिगृह अधिक्षक या पदावर अशासकिय   कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.   त्यासाठी सैन्यातून नायब सुभेदार या हुद्यावरुन निवृत्त झालेल्या एस.एस.सी पास व ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक नाही अशा उमेदवारांनी अर्ज पाठवावे. बायोडाटासह   हे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड- अलिबाग येथे स्वहस्ते अथवा कार्यालयाच्या इ-मेल आयडी zswo_raigad@mahasainik.com वर 15 जून पर्यंत   कार्यालयीन वेळेत पाठवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी   डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही त्यांनी कळविले आहे. 00000

जिल्ह्यात 3271 शाळांमध्ये मिळणार 11 लाख 35 हजार मोफत पाठ्यपुस्तके

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -   समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते   इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 11 लाख 35 हजार 119 मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार असून   17 जून या शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी   विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील ,अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे यांनी   दिली आहे.   कोणत्याही बालकाचे शिक्षण हे पुस्तकाअभावी वंचित राहू नये,   तसेच सर्व दाखलपात्र मुलांची शाळांमध्ये 100 टक्के   उपस्थिती टिकवून गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना   सुरु करण्यात आली आहे. इयत्ता पहिले ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. रायगड जिल्ह्यात   11 लाख 35 हजार 119 पाठ्य पुस्तके शासनातर्फे मोफत पुरविण्यात येणार आहेत.   रायगड जिल्ह्यातील 3271 शाळांना या योजनेचा लाभ होणार असून मराठी, उर्दू,   हिंदी, गुजराती व इंग्रजी अशा माध्यमांतील शाळांचा यात समावेश आहे. जिल्ह्