जिल्ह्यात 7 गोवर्धन गोंवश केंद्र मंजूर इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले


अलिबाग, जि. रायगड, दि.4 (जिमाका)- केंद्रशासनाने रायगड जिल्हयामध्ये 7 गोवर्धन गोवंश सेवा केंद्र मंजुर केले आहेत. रायगड जिल्ह्यातील सात उपविभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे हे केंद्र मंजूर असून हे केंद्र चालवून गोसंवर्धनाचे काम करु इच्छिणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे की, सन 2019-20 साठी  अलिबाग, पनवेल, माणगाव, महाड, पेण, रोहा, श्रीवर्धन या महसूली विभागात ही केंद्र मंजूर झाली आहेत. केंद्र शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्ती ची पुर्तता करणाऱ्या संस्थांची निवड या गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांसाठी केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्राथमिक पडताळणी छाननी करुन हे प्रस्ताव आयुक्त पशुसंवर्धन  महाराष्ट्र राज्य औैंध पुणे यांचे कडे सादर करावयाचे आहेत. या करीता शासनाने कालबध्द कार्यक्रम ठरवून वेळापत्रक निश्चीत केले आहे.
1.      अनुदानासाठी संबधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, यांचेकडे अर्ज व इतर अनुषंगीक माहीती सादर करण्याचा अंतिम दिनांक- 30 जुन 2019.
2.      संबधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी प्राप्त झालेल्या अर्जानुसार संबधित गोशाळेमध्ये प्रत्यक्ष भेट देवुन परीशिष्ट ब प्रमाणे स्वाक्षरीसह आयुक्त पशुसंवर्धन यांना माहीती सादर करण्याचा अंतिम करण्याचा अंतिम दिनांक 20 जुलै 2019.
3.      जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त अलिबाग-रायगड यांच्या कडुन प्राप्त झालेल्या अर्जांची प्रार्थमीक छाननी करुन शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2019.
तरी इच्छुक पात्र संस्थेने आवश्यक ती कागदपत्रे, अर्ज परीशिष्ट अ व ब सहीत दिनांक 30 जुन 2019 पर्यंत सादर करावीत. इच्छुक संस्थेने शासनाने निश्चित केलेले अर्ज, परीशिष्ट अ व ब यांचे नमुन तात्काळ जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय रायगड-अलिबाग येथुन कार्यालयीन वेळेत येऊन प्राप्त करुन घ्यावेत. हे अर्जाचे नमुने जिल्ह्याच्या माहीती संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले आहेत.  तरी इच्छुक संस्थांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक