Posts

Showing posts from July 3, 2022

जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा दि.07 जुलै पर्यंतचा प्राथमिक अहवाल जाहीर

  अलिबाग, दि.08 (जिमाका):-  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.07 जुलै   2022 रोजी सायंकाळी 6.00   पर्यंतचा जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा जाहीर करण्यात आलेला प्राथमिक अहवाल याप्रमाणे- रायगड जिल्ह्यात दि.07 जुलै 2022 रोजी 125.45 मि.मी.सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस रोहा येथे 197 मिलिमीटर झाला आहे.   दि.07 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6.00   च्या अहवालानुसार सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक:-  रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे जुना पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. अतिधोकादायक/धोकादायक इमारती धरणांबाबत: तळा तालुक्यातील वावा लघुपाटबंधारे योजना ही पूर्ण क्षमतेने भरली आहे. मुरूड तालुक्यातील अंबोली धरणात पूर्ण संचय पातळीपर्यंत साठा होवून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होवू लागला आहे. नदी पातळी:-  सावित्री नदी, धोका पातळी- 6.50 मी., सध्याची पातळी-4.60 मी., कुंडलिका नदी, धोका पातळी-23.95 मी., सध्याची पातळी--23.50 मी., अंबा नदी, धोका पातळी-9.00 मी., सध्याची पातळी-7.70 मी., उल्हास नदी, धोका पातळी-48.77 मी., सध्याची पातळी-45.80 मी.,

25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांचा आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

  अलिबाग, दि.08 (जिमाका):-   मा.राज्य निवडणूक आयोगाचे दि.05 जुलै 2022 च्या आदेशान्वये 25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांचा आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षण सोडतीची सूचना परिशिष्ट मधील नमुन्यात वृत्तपत्र प्रसिद्ध करणे,  कार्यवाही कोणी करावयाची आहे-  जिल्हाधिकारी,  टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा- दि.07 जुलै 2022.   अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे- जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी, कार्यवाही कोणी करावयाची आहे- जिल्हाधिकारी, पंचायत समिती निर्वाचक गणासाठी,  कार्यवाही कोणी करावयाची आहे- तहसिलदार,  टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा दिनांक-  दि.13 जुलै 20122.   सोडतीनंतर निवडणूक विभाग/निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे,  कार्यवाही कोणी करावयाची आहे - जिल्हाधिकारी,   टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा दिनांक-  दि.15 जुलै 2022.   निवडणूक विभाग/निर्वाचक ग

100% अनुदानावर स्टॉल मिळण्यासाठी गटई कामगारांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावेत

  अलिबाग, दि.08 (जिमाका):-   महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या गटई कामगारांची आर्थिक उन्नती व्हावी, याकरिता 100% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पात्र लाभार्थ्याना शासनामार्फत मंजूर करण्यात येते. ही योजना लाभार्थ्यांना गटई व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येऊन उदर निर्वाहाचे साधन प्राप्त होण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्यामार्फत राबविण्यात येते. अनुसुचित जाती प्रवर्गातील गटई कामगारांना हा व्यवसाय करताना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासनाने ही योजना सन 1997 पासून सुरु केली आहे. योजनेच्या अटी:- 1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, 2) अर्जदार हा अनुसूचित जातीतील गटई कामगार असावा, 3) वय 18 ते 50 असावे, 4) वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु.40 हजार, शहरी भागात रु.50 हजार पेक्षा जास्त नसावे, 5) गटई स्टॉलसाठी मागणी केलेली जागा ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी ताबा दिलेला असावा किंवा स्वत:ची असावी. तरी इच्छुक अनुसूचित जातीमधील गटई कामगारांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, रायगड-अलिबाग येथे संपर्क स

25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

  अलिबाग, दि.08 (जिमाका):-   मा.राज्य निवडणूक आयोगाचे दि. 06 जुलै 2022 च्या आदेशान्वये 25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढीलप्रमाणे आहे.   मतदार यादी ग्राह्य धरणाचा दिनांक,  टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख- दि.31 मे 2022.   मा.राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता तयार केलेली मतदार यादी हरकती व    सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात दिनांक,  टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख-  दि.18 जुलै 2022.   मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक,  टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख-  दि.22 जुलै 2022.   निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख,  टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख-  दि.29 जुलै 2022.   निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार यादी माहितीसाठी ठेवण्यात आल्य

वणवे येथे यंत्राद्वारे भात पिक लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

Image
  अलिबाग,दि.08 (जिमाका):-  राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत खालापूर तालुका कृषी विभागाच्या वतीने  “ यंत्राद्वारे भात पिक लागवड प्रात्यक्षिक ”  कार्यक्रमाचे आयोजन वणवे गावातील शेतकरी कानिफनाथ पारठे यांच्या शेतावर खालापूर तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ-नारनवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि वणवे निंबोडे येथील शेतकरी बांधव उपस्थित होते. 00000

महाराजस्व अभियानांतर्गत नावंढे येथे दाखले शिबिराचे आयोजन

Image
  अलिबाग,दि.08 (जिमाका):-  महाराजस्व अभियानांतर्गत खालापूर तहसिल कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक व अन्य कामाकरिता लागणाऱ्या दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांच्या विशेष प्रयत्नातून खालापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये या विशेष दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नावंढे गावात राबविण्यात आलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता खालापूर तहसिल प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. 00000

खरीप हंगाम 2022 करिता शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

Image
  अलिबाग,दि.08 (जिमाका):-  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये भात व नागली पिकाकरिता लागू करण्याबाबत शासन निर्णय प्राप्त झाला आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय विमा कंपनी लि. मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरिता या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे आहे- भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम- रु.51 हजार 760, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर- रु.1 हजार 35.20, अंतिम मुदत- दि.31 जुलै 2022 नागली पिकासाठी विमा संरक्षित रक्कम- रु.20,000/-, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर- रु.400/-, अंतिम मुदत- दि.31 जुलै 2022 हवामान घटकाचा प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकाच्या हंगामामध्ये हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भू:स्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे

नगरपरिषदांच्या मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी ऑनलाईन पाहण्यासाठी दि.09 जुलै पासून होणार उपलब्ध

  अलिबाग,दि.08 (जिमाका):-  मा.राज्य निवडणूक आयोग दि.10 जून व दि.30 जून 2022 च्या आदेशान्वये राज्यातील 208 नगरपरिषदा व 13 नगरपंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड-जंजिरा, उरण, रोहा, महाड, माथेरान, खोपोली व श्रीवर्धन या नगरपरिषदांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या दि.09 जुलै 2022 रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयात तसेच नगरपरिषदेच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  https://raigad.gov.in/  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत. नगरपरिषदांच्या मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार यादी या लिंकवर दि.09 जुलै 2022 पासून पाहावयास मिळतील, त्या लिंक पुढीलप्रमाणे:- अलिबाग-  https://drive.google.com/ drive/folders/1v9sGkPKwJ4- hXaWyi2oT_scvJMKfleHh?usp= sharing पेण-   https://drive.google.com/ drive/folders/ 1Gz3mwZkIMkvT08kyC- 3ihh2M4ROdbhDH?usp=sharing मुरूड- https://drive.google. com/drive/folders/ 1cOr6zKP7W0wmMjLX9qOoaDND6Opd_ _H9?usp=sharing उरण-   https://drive

जिल्हा परिषदा व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Image
अलिबाग, दि.08 (जिमाका):-  महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम ,1961 मधील कलम 12 उपकलम(1),कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हापरिषदा व पंचायत समित्या(जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम,1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेवून अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणी उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.त्याकरीता आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे:- जिल्हा परिषदेचे नाव/पंचायत समितीचे नाव:  रायगड जिल्हा परिषद,  सभेची वेळ व तारीख - दि.13/07/2022 रोजी दुपारी 3.00 वाजता,  सभेचे ठिकाण-  जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन सभागृह,  आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक-  दि.15/07/2022,  आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी-  दि.15/07/2022 ते दि.21/07/2022. पंचायत समिती, अलिबाग: सभेची वेळ व तार

विशेष लेख: वीजेपासून राहा सावध.. “दामिनी अॅप” करील मदत..!

Image
मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषतः माहे मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणतः माहे ऑक्टोबर या महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह पूर्वमौसमी पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच. तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आयआयटीएम) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता हे अॅप विकसित केले आहे.  “ दामिनी ”  अॅपसाठी आयआयटीएमने  “ लाइटनिंग लोकेशन नेटवर्क ”  हे मॉडेल विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून त्यांच्या परिसरातील वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आण

अतिवृष्टी काळात जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन

  अलिबाग, दि.06 (जिमाका):-   भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि.08 जुलै 2022 रोजी पर्यंत रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सखल व दरडप्रवण गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सखल व दरडप्रवण गावातील नागरिकांनी भरतीच्या वेळी अतिवृष्टी होत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रयास जावे, समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छिमारांनी, पर्यटकांनी व नागरिकांनी समुद्रात पोहण्यास जावू नये, पूर व दरडप्रवण भागातील नागरिकांनी आपली महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, पुढील 03 दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्याने घरातील वयोवृध्द व्यक्ती, आजारी व्यक्तींसाठी आवश्यक औषधे, पिण्याचे पाणी, टॉर्च, मेणबत्ती, माचिस, ड्राय फूड यांचा पुरेसा साठा करुन ठेवावा, पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून प्यावे, महिला, लहान मुले यांची काळजी घ्यावी. तरी जिल्ह्यातील सखल व दरडप्रवण गावातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल

आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ॲम्ब्युलन्स स्टेशन सुरु करण्याचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा अभिनव उपक्रम

  उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड, पोलादपूर येथे ॲम्ब्युलन्स स्टेशन तयार आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी आरोग्य सेवेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन   अलिबाग, दि.06 (जिमाका):-   अतिवृष्टी होवून पूरपरिस्थिती, दरड कोसळणे अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणच्या जनतेला तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याकरिता   जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स स्टेशन तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स स्टेशन तयार करण्यासाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, वाहन चालक उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:- उपजिल्हा रुग्णालय माणगाव:  रुग्णवाहिका क्रमांक- एमएच-14 जेएल 3664, रुग्णवाहिका-108, वैद्यकीय अधिकारी, डॉ.सय्यद अफजान उल्हा हसेनी, भ्रमणध्वनी क्रमांक- 7276111598, वाहन चालक श्री.गजानन दळवी, भ्रमण

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू

                                                        अलिबाग, दि.04 (जिमाका):-  पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक श्रीवर्धन तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.    त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये,  याकरिता श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी असलेली पर्यटनस्थळे श्रीवर्धन, हरेश्वर, मारळ, दिवेआगार, कोडीवली व शेखाडी तसेच श्रीवर्धन तालुक्यातील धरण असलेली गावे- कुडकी, कार्ले आणि रानवली, त्याचप्रमाणे धबधबे असलेली ठिकाणे- कोंढे पंचतन व सर्वे  या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा 293 वा स्मृतीदिन अलिबाग येथे संपन्न

Image
कमांडिंग ऑफिसर कमोडोर आदित्य हाडा, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आदी मान्यवरांनी केले समाधीस्थळी अभिवादन   अलिबाग,दि.04 (जिमाका):-  सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या 293 व्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय नौदलाचे पश्चिमी क्षेत्र मुख्यालय भारतीय नौसेना पोत आंग्रे या नौदल तळाचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर आदित्य हाडा यांनी भारतीय नौदलाच्या वतीने पुष्पचक्र तर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रघुजीराजे आंग्रे सरखेल, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंके यांच्यासह विविध मान्यवरांनी मराठा आरमाराच्या सरखेलांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. दरवर्षी दि.04 जुलै रोजी या महान सागर वीराला अलिबाग नगरपरिषदेद्वारे अभिवादन केले जाते. या वर्षी  “ गाज ”  या सरखेल रघुजीराजे आंग्रे यांच्या उपक्रमांतर्गत भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करून नौदल तथा महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात संवाद प्रस्थापित करण्याकरिता जेएसएम महाविद्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत कमोडोर आदित