25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

 

अलिबाग, दि.08 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोगाचे दि. 06 जुलै 2022 च्या आदेशान्वये 25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढीलप्रमाणे आहे.

 मतदार यादी ग्राह्य धरणाचा दिनांक, टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख-दि.31 मे 2022.

 मा.राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता तयार केलेली मतदार यादी हरकती व  सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात दिनांक, टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख- दि.18 जुलै 2022.

 मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक, टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख- दि.22 जुलै 2022.

 निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख, टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख- दि.29 जुलै 2022.

 निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार यादी माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबत सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख, टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख- दि.29 जुलै 2022.

 मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे, टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख- दि.08 ऑगस्ट 2022.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक