Posts

Showing posts from September 17, 2017

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.23:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.04 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3526.87 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग-00.00 मि.मि., पेण-00.00 मि.मि., मुरुड-00.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-02.00 मि.मि., कर्जत-00.00 मि.मि., खालापूर-00.00 मि.मि., माणगांव-28.00 मि.मि., रोहा-00.00 मि.मि., सुधागड-30.00 मि.मि., तळा-00.00 मि.मि., महाड-34.00 मि.मि., पोलादपूर-14.00,म्हसळा-00.00मि.मि., श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-0.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 112.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.04 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   112.23 टक्के इतकी आहे. 00000

सहकारी पतसंस्थांनी शासन निर्णय व कायद्याचा आदर करावा --- शेखर चरेगांवकर

Image
                अलिबाग,(जिमाका)दि.23:-   रायगड जिल्ह्यात कार्यरत सर्व नागरी सहकारी पतसंस्थांनी आपले कामकाज करत असताना शासनाचे निर्णय व कायदे यांचा आदर करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी आज येथे केले.     अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्या. अलिबाग व सहकार भारती सहकारी प्रशिक्षण सहकारी संस्था मर्या.कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पतसंस्था संचालक,कर्मचारी प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.   या कार्यक्रमाला सहकार भारतीचे अखिल भारतीय महासचिव उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनचे संचालक सुरेश पाटील, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडकर, चार्टंड अकाऊटंड धुळे श्रीराम देशपांडे, रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे   अध्यक्ष ॲड.जे.टी.पाटील, उपाध्यक्ष दिलीप जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.   यावेळी मार्गदर्शन करताना श्री. चरेगावकर पुढे ते म्हणाले की, पतसंस्था चालविण्यासाठी प्रशासन व व्यवस्थापन या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यासंबंधी ज्ञान मिळण्य

नारीशक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अलिबाग,(जिमाका)दि.22:-     महिला व बालविकास विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या सन्मानार्थ 8 मार्च या जागतिक महिला दिनी नारीशक्त्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  या पुरस्काराचे स्वरुप रु.एक लाख व सन्मानचिन्ह असे आहे. विधवा,परितक्त्या,निराधार,अपंग महिलांचे पुनर्वसन करणे अशा कार्यात ज्या महिलांनी तसेच शैक्षणिक प्रशिक्षण कार्य,पर्यावरण क्षेत्र,महिला स्वावलंबन या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे आणि शेती व्यवसायात काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे ज्या महिलांनी श्रम कमी करण्यासाठी  जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.  तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी ज्या महिलांनी प्रयत्न केले आहेत अशा महिलांना केंद्र शासनामार्फत पुरस्कार देण्यात येतात. यासाठी सदरचे प्रस्ताव हे इंग्रजीमध्ये सादर करावेत.  अधिक माहितीसाठी माहितीसाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांच्या www.wed.in    या संकेतस्थळावर भेट द्यावी.   तसेच  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग. पत्

माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांसाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

अलिबाग,(जिमाका)दि.22:-   केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली व सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग, या कार्यालयास रायगड जिल्हयातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांची माहीती त्वरीत मागविली असून ती पुढीलप्रमाणे आहे. आधार कार्ड नंबर.,ई-मेल आडी.,मोबाईल नंबर.,बँक ऑकाउन्टं नंबर.,बँकेचे व शाखेचे नाव.,आय. एफ. एस. सी कोड नंबर. तरी  जिल्हयातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांनी आपली माहिती माजी सैनिक विश्रामगृह, महाड, माणगांव, पोलादपूर व विश्रामगृह, शासकीय विश्रामगृह, पनवेल (बुधवार - कल्याण संघटक दौरा) येथे जमा करावी.असे आवाहन मेजर प्रांजल. पी जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 00000

शेखर चरेगांवकर,अध्यक्ष,(राज्य मंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य सहाकरी परिषद यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 अलिबाग,(जिमाका)दि.22:-   शेखर सुरेश चरेगांवकर,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहाकरी परिषद पुणे हे आज रायगड जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा रायगड जिल्हा  जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.22 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वसंतगड येथून अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. रात्रौ साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग ता.अलिबाग जि.रायगड येथे आगमन व मुक्काम. शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे राखीव.   सकाळी दहा वाजता सहकार भारती प्रशिक्षण संस्था आयोजित सहकारी संस्था पदाधिकारी प्रशिक्षण वर्गास उपस्थिती.  स्थळ: रविकिरण हॉटेल अलिबाग.  दुपारी सोईनुसार अलिबाग येथून कराड जि.साताराकडे प्रयाण. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 67मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.22:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 67.03 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3519.83 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग-26.00 मि.मि., पेण-105.20 मि.मि., मुरुड-82.00 मि.मि., पनवेल-20.00 मि.मि., उरण-60.00 मि.मि., कर्जत-32.20 मि.मि., खालापूर-44.00 मि.मि., माणगांव-55.00 मि.मि., रोहा-88.00 मि.मि., सुधागड-94.00 मि.मि., तळा-59.00 मि.मि., महाड-54.00 मि.मि., पोलादपूर-47.00,           म्हसळा-137.20मि.मि., श्रीवर्धन-102.00 मि.मि., माथेरान-67.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1072.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 67.03 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   112.00 टक्के इतकी आहे. 00000

नारीशक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नारीशक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अलिबाग,(जिमाका)दि.21:-     महिला व बालविकास विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या सन्मानार्थ 8 मार्च या जागतिक महिला दिनी नारीशक्त्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  या पुरस्काराचे स्वरुप रु.एक लाख व सन्मानचिन्ह असे आहे. विधवा,परितक्त्या,निराधार,अपंग महिलांचे पुनर्वसन करणे अशा कार्यात ज्या महिलांनी तसेच शैक्षणिक प्रशिक्षण कार्य,पर्यावरण क्षेत्र,महिला स्वावलंबन या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे आणि शेती व्यवसायात काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे ज्या महिलांनी श्रम कमी करण्यासाठी  जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.  तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी ज्या महिलांनी प्रयत्न केले आहेत अशा महिलांना केंद्र शासनामार्फत पुरस्कार देण्यात येतात. यासाठी सदरचे प्रस्ताव हे इंग्रजीमध्ये सादर करावेत.  अधिक माहितीसाठी माहितीसाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांच्या www.wed.in    या संकेतस्थळावर भेट द्यावी.   तसेच  जिल्हा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 55 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.21:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 55.55 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3452.80 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 115.00 मि.मि., पेण-60.20 मि.मि., मुरुड-56.00 मि.मि., पनवेल-50.40 मि.मि., उरण-72.00 मि.मि., कर्जत-56.60 मि.मि., खालापूर-56.00 मि.मि., माणगांव-38.00 मि.मि., रोहा-47.00 मि.मि., सुधागड-37.00 मि.मि., तळा-39.00 मि.मि., महाड-37.00 मि.मि., पोलादपूर-25.00, म्हसळा-70.20मि.मि., श्रीवर्धन-59.00 मि.मि., माथेरान-70.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 888.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 55.55 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   109.87 % इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 152 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.20:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 152.86 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3397.25 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 118.00 मि.मि., पेण-220.00 मि.मि., मुरुड-60.00 मि.मि., पनवेल-254.00 मि.मि., उरण-240.00 मि.मि., कर्जत-204.00 मि.मि., खालापूर-153.00 मि.मि., माणगांव-114.00 मि.मि., रोहा-62.00 मि.मि., सुधागड-101.00 मि.मि., तळा-92.00 मि.मि., महाड-88.00 मि.मि., पोलादपूर-105.00, म्हसळा-152.00मि.मि., श्रीवर्धन-120.00 मि.मि., माथेरान-362.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2445.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 152.86 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   108.10 % इतकी आहे. 00000

रायगड जिल्ह्यात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग दि.19 (जिमाका)-   प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून पुढील 24 तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 से.मी ते 12 से.मी) ते त्यापेक्षा अधिक (12 से.मी. ते 24 से.मी.)   होण्याची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे दरडग्रस्त, नदी किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना व मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.  अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, दरड कोसळणे इत्यादील आपत्कालीन परिस्थितीस  समोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रुग्णवाहिका इ. सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत.  कोणत्याही आपत्तीची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322/ 9763646326 या क्रमांकावर द्यावी, अशा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 37 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.19:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 37.53 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3244. 39 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 49.00 मि.मि., पेण-05.00 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-0.0 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-11.00 मि.मि., खालापूर-00.00 मि.मि., माणगांव-50.00 मि.मि., रोहा-30.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-60.00 मि.मि., महाड-89.00 मि.मि., पोलादपूर-102.00, म्हसळा-116.40मि.मि., श्रीवर्धन-50.00 मि.मि., माथेरान-02.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 600.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 37.53 मि    इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   103.24 टक्के इतकी आहे. 00000

भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत मुरुड जंजिरा येथे दोन अत्याधुनिक बोटी आजपासून सेवेत दाखल

Image
अलिबाग,(जिमाका)दि.19:- भारतीय तटरक्षक दलाच्या  सेवेत आज दोन अत्याधुनिक बोटी विधीवत दाखल झाल्या. मुरुड जंजीरा येथील दिघी  पोर्ट येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला. भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक के. आर. नौटीयाल यांच्याहस्ते या बोटी सेवेत दाखल करुन घेण्यात आल्या. यावेळी  पश्चिम विभागाचे उप महानिरीक्षक मुकूंद गर्ग, कमांडंट अरूण सिंग,  जे. एल .मेहता यांच्यासह अन्य   मान्यवर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  तटरक्षक दलात दाखल झालेल्या या बोटींचे वैशिष्ट्ये याप्रमाणे-या बोटीची लांबी  27.42 मीटर्स असून वजन 136 टन आहे.  एल ॲण्ड टी शिप बिल्डींग चेन्नई येथे या बोटींची बांधणी झाली असून  20 नॉटस मध्ये 500 नॉटीकल मैल या वेगाने या बोटी प्रवास करु शकतात.  हा वेग 45 नॉट्स पर्यंतही वाढविण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक संचार आणि नाविक सुविधांनी सज्ज असलेल्या या बोटींवर 12.7 मीमी मशिन गन्सनेही सज्ज आहे. वेगवान दळणवळण, किनाऱ्याच्या अगदी जवळून गस्त घालणे, शोध कार्य, सुटकेसाठीचे कार्य आणि सागरी सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा वैशिष्ट्यांनी या बोटी सज्ज आहेत.  या बोटींमुळे राज्याच्या 720 कि.मी लांबीच

जिल्हा न्यायालयात मध्यस्थी कार्यक्रम जागृती कार्यक्रम

Image
अलिबाग,(जिमाका)   दि.18:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने   शनिवार दि.16 रोजी वकील संघटना कक्ष,अलिबाग यांचे न्यायकक्षामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग यांचे मार्गदर्शनानुसार मध्यस्थी जागृती कार्यक्रम पार पडले.              या कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रायगड अलिबाग मु.गो.सेवलीकर, दिवाणी न्यायाधीश व.स्तर,अलिबाग, एल.डी.हुली, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील संतोष पवार, वकील संघटनेचे अतुल मयेकर  तसेच अन्य् न्यायिक अधिकारी, वकील   वर्ग,तसेच पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते.  यावेळी दुसरे सह.दिवाणी व. स्तर न्यायाधीश श्रीमती हेमा पाटील, ज्येष्ठ् विधिज्ञ  श्रीमती मानसी म्हात्रे,यांनी मध्यस्थ संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले.    त्यानंतर प्रमुख जिल्हा   न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मध्यस्थ प्रक्रीया आणि लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त् प्रकरणे तडजोडीने निकाली काढणेसाठी वकील वर्ग व पक्षकार यांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन पल्लवी तुळपुळे यांनी केले. तसेच तिसरे दिवाणी न्यायाधीश,क.स्तर वृ

ग्रामपंचायत निवडणूकः मनाई आदेश जारी

ग्रामपंचायत निवडणूकः मनाई आदेश जारी अलिबाग,(जिमाका)दि.16:- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 वाशी मधील 1) एनआरआय पोलीस ठाण्याचे हद्दीत 1.) वाघिवली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक तसेच परिमंडळ-2 पनवेल विभागातील पनवेल विभागातील पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत नेरे,  चिंध्रण, भाताण,  दिघाटी, केळवणे, कानपोली,नितळस, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक,पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत शिवकर,करंजाडे, शिरढोण ग्रामपंचायत निवडणूक. उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीत- नवीन शेवा,2.बोकडविरा, भेंडखळ, नवघर, पागोटे,  चिर्ले,  धुतूम, वशेणी, सारडे ,पुनाडे , रानसई, पिरकोन, कळंबुसरे ग्रामपंचायत न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरी,पाणजे.जसखार,करळ ग्रामपंचायती तसचे मोरा सागरी ठाणेचे हद्दीत घारापुरी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. निवडणूकीचे मतदान दि.14 ऑक्टोबर 2017 रोजी होणार असून दि.16 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे.              सदर प्रक्रिया पार पाडतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नय

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 14 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.18:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.21 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3206. 87 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 01.00 मि.मि., पेण-30.20 मि.मि., मुरुड-20.00 मि.मि., पनवेल-20.80 मि.मि., उरण-07.00 मि.मि., कर्जत-03.80 मि.मि., खालापूर-23.00 मि.मि., माणगांव-76.00 मि.मि., रोहा-15.00 मि.मि., सुधागड-04.00 मि.मि., तळा-13.00 मि.मि., महाड-02.00 मि.मि., पोलादपूर-01.00, म्हसळा-09.60मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-01.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 227.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 14.21 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   102.04 % इतकी आहे. 00000