ग्रामपंचायत निवडणूकः मनाई आदेश जारी

ग्रामपंचायत निवडणूकः मनाई आदेश जारी
अलिबाग,(जिमाका)दि.16:-महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 वाशी मधील 1) एनआरआय पोलीस ठाण्याचे हद्दीत 1.) वाघिवली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक तसेच परिमंडळ-2 पनवेल विभागातील पनवेल विभागातील पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत नेरे,  चिंध्रण, भाताण,  दिघाटी, केळवणे, कानपोली,नितळस, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक,पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत शिवकर,करंजाडे, शिरढोण ग्रामपंचायत निवडणूक. उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीत- नवीन शेवा,2.बोकडविरा, भेंडखळ, नवघर, पागोटे,  चिर्ले,  धुतूम, वशेणी, सारडे ,पुनाडे , रानसई, पिरकोन, कळंबुसरे ग्रामपंचायत न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरी,पाणजे.जसखार,करळ ग्रामपंचायती तसचे मोरा सागरी ठाणेचे हद्दीत घारापुरी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. निवडणूकीचे मतदान दि.14 ऑक्टोबर 2017 रोजी होणार असून दि.16 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे.
             सदर प्रक्रिया पार पाडतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून निवडणूक क्षेत्रात कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्याचे आदेश नवी मुंबई विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त् राजेश बनसोडे यांनी दिले आहेत. तसेच  सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध  कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  तसेच कलम 36 अन्वये  पनवेल शहर, पनवेल तालुका, उरन, न्हावा शेवा, मोरा सागरी पोलीस ठाणेचे स्वाधीन अधिकारी यांना  कायदा व सुव्यवस्था राकहण्यासाठी  लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले असल्याचे  पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कळविले आहे. हे आदेश ग्रामपंचायत हद्दीत दि. 17 ऑक्टोबर 2017  रोजी मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील, असेही कळविण्यात आले आहे.
            
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक