Posts

Showing posts from December 17, 2017

अलिबाग महोत्सव 2017 अलिबाग हे एकमेकाद्वितीय पर्यटनस्थळ- ना.जयकुमार रावल

Image
        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23-  अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रीत प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्र किनारा असे एकमेवाद्वितीय पर्यटन स्थळ आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्त्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करु, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांनी आज येथे केले. अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग, नगर परिषद अलिबाग व महिला बचत गट फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित अलिबाग महोत्सव 2017 च्या उद्घाटन प्रसंगी ना.जयकुमार रावल बोलत होते.             यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी,अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला बचत गट फेडरेशनच्या  चित्रेलखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ना.रावल म्हणाले की, अलिबागाला पर्यटनाच्या दृष्टीने आगळे

पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- राज्याचे रोजगार हमी, पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल हे शनिवार दि. 23  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे- शनिवार  दि. 23 रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने अलिबाग कडे प्रयाण. दुपारी चार वाजता श्री.आंग्रे होरिया बंगला, मोतीबाग अलिबाग यांची भेट. दुपारी साडे चार वाजता मोतीबाग अलिबाग येथून अलिबाग महोत्सव कार्यक्रमाकडे प्रयाण. सायं. पाच वाजता अलिबाग पर्यटन महोत्सव येथे आगमन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ अलिबाग समुद्र किनारा, सायं. सहा वाजता येथून शासकीय वाहनाने मांडवाकडे प्रयाण. सायं. सात वाजता मांडवा येथे आगमन व बोटीने मुंबईकडे प्रयाण. 00000

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त गुरुवारी कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विद्यामाने गुरुवार दि.28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात  राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच रायगड-अलिबागचे सदस्य श्रीकांत कुंभार  हे असून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन रायगड आणि वैद्यमापन शास्त्र रायगड या विभागातील वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तरी सर्वांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रम उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम.दुफारे यांनी केले आहे. 00000

पशुसंवर्धन मंत्री ना.महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-  पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री ना.महादेव जानकर हे रविवार दि. 24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे. रविवार दि. 24 रोजी दुपारी बारा वाजता रायगड जिल्हा शैक्षणिक वसतीगृह-समाज भवन भूमिपूजन सोहळा व समाज मेळाव्यास उपस्थिती. स्थळ :- मु.भादाव, ता.माणगांव, जि.रायगड. दुपारी दोन वाजता मु.भादाव, ता.माणगांव, जि.रायगड येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. 00000

राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिूकू इदाते यांचा रायगड जिल्हा दौरा

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-  राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष, भिकू इदाते हे सोमवार दि. 25  रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे- सोमवार दि. 25 रोजी सकाळी सात वाजता पनवेल शासकीय शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोईनुसार मुंबईकडे प्रयाण. 00000

भूसंपादन अधिसुचनेबाबत हरकती मागवल्या

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21-   माणगांव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग क्र.66(जुना-17) च्या चौपदरीकरणासाठी मौजे इंदापूर ते वडपाले या 84 कि.मी . ते 108.430 कि.मी. या दरम्यानची मौजे कशेणे, विघवली, तिलोरे, कळमजे, नाणोरे, जावळी, गारळ, तळेगांव त.गोरेगांव, रेपोली, उसरघर, लोणेरे या गावांच्या भूसंपादन क्षेत्राची राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 (1956 चा 48) मधील कलम 3A ची अधिसूचना 17 नोव्हेंबर रोजी भारत सरकारच्या राजपत्रामध्ये (असाधारण, भाग-II, खंड-3 उपखंड(ii)) प्रसिध्द झाली असून सदरची अधिसूचना 15 डिसेंबर रोजी स्थानिक वर्तमान पत्र दै.रामप्रहर व दै.रत्नागिरी टाईम्स मध्ये प्रसिध्द झाली आहे. अधिसूचनेमधील जमीनी संबंधी कोणत्याही हितसंबंधीत व्यक्तींची तक्रार/हरकत असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आपले अर्ज उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांच्याकडे अधिसूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून 21 दिवसांत सादर करावेत, असे उपविभागीय अधिकारी माणगांव विभाग, माणगांव यांनी कळविले आहे. 0000 ०

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:-   केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते   हे दि.22 व 23  डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम.   शुक्रवार दि. 22 रोजी दुपारी दीड वाजता महाड एमआयडीसी रायगड येथे आगमन. दुपारी चार वाजता महाड एमआयडीसी रायगड येथून भरणे ता.खेड,जि.रत्नागिरीकडे प्रयाण. सांय.आठ वाजता महाड एमआयडीसी रायगड येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.23 रोजी दुपारी दीड वाजता महाड एमआयडीसी रायगड येथून पोलादपूरकडे प्रयाण. दुपारी दोन वाजता पोलादपूर येथे आगमन. दुपारी साडे तीन वाजता पोलादपूर येथून चिपळूण जि.रत्नागिरी कडे प्रयाण. 0000 ०

कृषि योजनाः शेतकऱ्यांच्या सुचनांसाठी टोल फ्री क्रमांक

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत शेतकरी हिताच्या विविध योजना राबविल्या जातात.  या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषि सचिन्द्र प्रताप सिंग यांनी केले आहे. तसेच या योजनांसंदर्भात व अंमलबजावणीसंदर्भात येणाऱ्या अडचणी, सुचना शेतकऱ्यांनी  मोफत टोल फ्री क्रमांक, एसएमएस व ई-मेलद्वारे कळवाव्यात असेही आवाहन केले आहे.             कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचनाकरिता 367 कोटी रुपये, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेडनेट, पॉलीहाऊस करिता 50 कोटी रुपये, कांदाचाळ उभारणीकरिता 50कोटी रुपये, शेततळे अस्तरीकरणाकरिता 25कोटी रुपये आणि कृषि यांत्रिकिकरणासाठी 98कोटी रुपये  याप्रमाणे कृषि विभागाकडे अनुदान उपलब्ध आहे. एवढया मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. या योजनांना शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील आहे.             ज्या शेतकऱ्यांना तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून संबधित योजनेच्या लाभाकरिता पुर्व संमती दिलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी घटकांची अंमलबजावणी करुन तालुका कृषि

जिल्ह्यात मनाई आदेश

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून  जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) दि. 27 पर्यंत  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) चे मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रायगड अलिबाग यांनी लागू केले आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी  कळविले आहे. 00000

मोटार वाहन निरीक्षकांचा शिबीर कार्यक्रम

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांचे कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा जानेवारी 2018 ते जुन 2018 या कालावधीचा शिबीर (कँम्प) कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. जानेवारी-2018 मध्ये रोहा- दि.15, मुरुड- दि.16, अलिबाग- दि.17 व 30, माणगाव- दि.10 व 25, श्रीवर्धन- दि.24, महाड- दि.12 व 13. फेब्रुवारी-2018 रोहा- दि.14, मुरुड- दि.16, अलिबाग- दि.16 व 27, माणगाव- दि.6 व 23, श्रीवर्धन- दि.22, महाड- दि.9 व 21. मार्च-2018 रोहा- दि.14, मुरुड- दि.15, अलिबाग- दि.16 व 27, माणगाव- दि.6 व 23, श्रीवर्धन- दि.22, महाड- दि.9 व 21. एप्रिल-2018 रोहा- दि.16, मुरुड- दि.17, अलिबाग- दि.18 व 27, माणगाव- दि.10 व 25, श्रीवर्धन- दि.24, महाड- दि.13 व 23. मे-2018 रोहा- दि.14, मुरुड- दि.15, अलिबाग- दि.16 व  30, माणगाव- दि.8 व 25, श्रीवर्धन- दि.24, महाड- दि.11 व 23. जुन-2018 रोहा- दि. 13, मुरुड- दि.14, अलिबाग- दि.15 व 29, माणगाव- दि.5 व 27, श्रीवर्धन- दि.26, महाड- दि.8 व 25.             वर दर्शविल्यापैकी कोणत्याही तारखेला आकस्मिक सुट्टी जाहिर झाल्यास त्यापुढील कामक

अल्पसंख्याक हक्क दिवस :कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने पुढे यावे :जिल्हाधिकारी कार्यालयातील चर्चेत आवाहन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- अल्पसंख्याक समाजाच्या हितांचे रक्षण करुन त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी अल्पसंख्याक विकासाच्या विविध योजना शासन राबवते.या योजनांचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्याक समाज घटकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चर्चेत करण्यात आले.  अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक समाज प्रतिनिधींसोबत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेस  भूसंपादन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वेटकोळी, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रेमलता जैतू, सामान्य शाखेचे तहसिलदार काशिनाथ नाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.एम.आवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक  प्रकाश निकम,  अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी श्रीकांत ओसवाल, आकाश ओसवाल, नसीम शेख आदी उपस्थित होते.  उपजिल्हाधिकारी वेटकोळी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्त्व सांगितले. यादिनाच्या निमित्ताने अल्पसंख्याक कल्याण योजनांची व त्यांच्या अंमलबजावणी यंत्रणांची माहिती  संबंधित समाज घटकाला करुन देण्यात येते.  यावेळी श्रीमती जैतू यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तर शिक्