पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- राज्याचे रोजगार हमी, पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल हे शनिवार दि. 23  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शनिवार  दि. 23 रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने अलिबाग कडे प्रयाण. दुपारी चार वाजता श्री.आंग्रे होरिया बंगला, मोतीबाग अलिबाग यांची भेट. दुपारी साडे चार वाजता मोतीबाग अलिबाग येथून अलिबाग महोत्सव कार्यक्रमाकडे प्रयाण. सायं. पाच वाजता अलिबाग पर्यटन महोत्सव येथे आगमन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ अलिबाग समुद्र किनारा, सायं. सहा वाजता येथून शासकीय वाहनाने मांडवाकडे प्रयाण. सायं. सात वाजता मांडवा येथे आगमन व बोटीने मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक