Posts

Showing posts from June 13, 2021

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 48 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 48.94 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 783.13   मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 50.00 मि.मी., पेण- 45.00 मि.मी., मुरुड- 28.00 मि.मी., पनवेल- 58.40 मि.मी., उरण-26.00 मि.मी., कर्जत- 43.60 मि.मी., खालापूर- 49.00 मि.मी., माणगाव- 25.00 मि.मी., रोहा- 17.00 मि.मी., सुधागड-80.00 मि.मी., तळा- 21.00 मि.मी., महाड- 69.00 मि.मी., पोलादपूर- 66.00 मि.मी, म्हसळा- 35.00 मि.मी., श्रीवर्धन- 54.00 मि.मी., माथेरान- 116.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 783.00 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 48.94 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 24.92 टक्के इतकी आहे. 00000

ई.टी.एस.मशीनमुळे जमीन मोजणी होणार जलद ! माणगाव येथील कार्यक्रमात पालकमंत्री कु.आदिती तटकरेंनी व्यक्त केला विश्वास

  अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनी मोजण्याची पद्धत खूप वेळखाऊ होती. परंतु आता ई.टी.एस. मशीन प्रत्येक तालुक्यात उपलब्ध होत असल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील जमीन मोजणीचे काम आता जलद गतीने होणार असल्याची माहिती   पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी माणगाव येथील प्रशासकीय भवन सभागृहात आज (दि.19 जून)रोजी   आयोजित कार्यक्रमात दिली.             माणगाव येथे प्रशासकीय भवनातील सभागृहात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते तसेच महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्याधुनिक जमीन मोजणी यंत्र ई.टी.एस.मशीन वितरण सोहळा संपन्न झाला.               यावेळी जिल्हा भूमीलेख अधीक्षक चारुशीला चव्हाण, प्रांताधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, तहसिलदार प्रियंका आयरे-कांबळे, पोलीस निरीक्षक श्री. अश्वनाथ खेडकर,सुभाष केकाणे, माजी सभापती संगिता बक्कम, माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदिप खरंगटे, नगरसेवक जयंत बोडेरे, श्रीमती श्रद्धा यादव, महसूल तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी- कर्मचारी, स्थानिक पदाधिक

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास शासनाची मंजूरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश

    अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- राज्यात वैद्यकीय पदविधारकांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार कमी असल्यामुळे शासनाने वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग,जि.रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश- क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नीत 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम, यंत्रसामुग्री व पद निर्मितीस नुकतीच   मान्यता प्रदान केली आहे.       जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा ध्यास घेतलेल्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या बाबीसाठी अहोरात्र केलेल्या पाठपुराव्याचे हे अभूतपूर्व असेच यश म्हणावे लागेल.      अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे.       अलिबाग येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती क

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमी अभिलेख कार्यालयांना ई. टी.एस.मशीनचे वितरण आमदार भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती

    अलिबाग,जि.रायगड, दि.19 (जिमाका):- पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व आमदार श्री.भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत आज (दि.19) रोजी   ई.टी.एस.मशीनचा वितरण सोहळा मध्यवर्ती प्रशासकीय भवन, माणगाव येथे संपन्न झाला.                 यावेळी करोना काळात उत्तम सेवा दिलेल्या डॉक्टरांना "करोना योद्धा" म्हणून गौरविण्यात आले. समानार्थी डॉक्टर्स एकूण 40 होते, मात्र प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.गौतम राऊत, डॉ.अजय मेहता, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ.संजय माळी, डॉ. जगदीश बेडेकर, डॉ.आशिष जाधव, डॉ. अमित मेहता, डॉ.अभिजित पाटसकर या डॉक्टर्सना सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.               यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्यासह महाड पोलादपूर विधानसभा आमदार श्री.भरत गोगावले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड श्रीमती चारुशीला चव्हाण, माणगाव प्रांताधिकारी प्रशाली जाधव - दिघावकर, तहसिलदार प्रियांका आयरे, पोलीस निरीक्षक श्री.अश्वनाथ खेडकर, श्री. सुभाष केकाणे, श्रीमती संगीत बक्कम, सर्व नगरसेवक, रायगड जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी, स्थानिक प

अलिबाग तालुक्यातील रंगीत छायाचित्र मतदारयादीत नसलेल्या मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र दि.30 जून पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे जमा करावेत

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :-192-अलिबाग विधानसभा मतदारसंघातील अलिबाग तालुक्यातील मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.          तरी ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदारयादीत नाही, अशा मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र दि. 30 जून 2021 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत.जे मतदार आपले रंगीत छायाचित्र जमा करणार नाहीत, अशा मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा अलिबाग उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत ढगे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा अलिबाग तहसिलदार श्री.सचिन शेजाळ यांनी केले आहे.        192-अलिबाग विधानसभा मतदारसंघात अलिबाग तालुक्यात एकूण 266 मतदार यादी भाग असून एकूण मतदारांपैकी 5 हजार 868 मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदारयादीत नसल्याचे आढळून आले आहे.       मतदारांची छायाचित्रे गोळा करण्याचे काम मतदार केंद्रस्तरीय अधिकारी करीत आहेत. मतदारयादीतील छायाचित्र नसलेल्या स्थलांतरीत मतदारांच्या मतदार यादीतील पत्त्यावर जाऊन जे मतदार यादीतील पत्त्यावर आढळले नाहीत, त्याबाबत पंचनामे तयार

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 99 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 99.14 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 640.75   मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 27.00 मि.मी., पेण- 85.00 मि.मी., मुरुड- 31.00 मि.मी., पनवेल- 167.60 मि.मी., उरण-60.00 मि.मी., कर्जत- 100.20 मि.मी., खालापूर- 126.00 मि.मी., माणगाव- 102.00 मि.मी., रोहा- 120.00 मि.मी., सुधागड-140.00 मि.मी., तळा- 112.00 मि.मी., महाड- 74.00 मि.मी., पोलादपूर- 81.00 मि.मी, म्हसळा- 68.00 मि.मी., श्रीवर्धन- 65.00 मि.मी., माथेरान- 227.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 586.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 99.14 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 20.39 टक्के इतकी आहे. 00000

इंडियन कोस्ट गार्ड विभागाने हेलिकॉप्टरमधून बचाव कार्य करीत एकूण 16 खलाशांपैकी 3 खलाशांना बोटीने वाचविण्यात आले तर उर्वरित 13 खलाशांना इंडियन कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टरने वाचविण्यात यश

Image
  रेवदंडा खाडीमध्ये मुंबईवरून जेएसडब्ल्यू कंपनीकरिता येणारे मंगलम नावाचे कार्गो शिप एका बाजूला कलंडले होते.             या जहाजावर 16 खलाशी होते व त्यांना रेस्क्यू करण्यासाठी मुरुड वरून कोस्ट गार्ड टीम आली होती.      इंडियन कोस्ट गार्ड विभागाने हेलिकॉप्टरमधून बचाव कार्य करीत एकूण 16 खलाशांपैकी 3 खलाशांना बोटीने वाचविण्यात आले तर उर्वरित 13 खलाशांना इंडियन कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टरने वाचविण्यात आले, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन लेपांडे यांनी दिली आहे.

सुयोग्य बदलासह पीक स्पर्धा खरीप हंगाम 2021 साठी नव्याने स्पर्धा जाहीर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्याचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.               या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात आहे.           या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत :-     पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.          खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी). तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईम

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.30 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.15 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.40 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.19 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.10 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.70 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 66 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.03 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 541.61   मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 104.00 मि.मी., पेण- 36.00 मि.मी., मुरुड- 99.00 मि.मी., पनवेल- 52.60 मि.मी., उरण-78.00 मि.मी., कर्जत- 20.40 मि.मी., खालापूर- 14.00 मि.मी., माणगाव- 101.00 मि.मी., रोहा- 53.00 मि.मी., सुधागड-52.00 मि.मी., तळा- 84.00 मि.मी., महाड- 67.00 मि.मी., पोलादपूर- 78.00 मि.मी, म्हसळा- 81.00 मि.मी., श्रीवर्धन- 100.00 मि.मी., माथेरान- 36.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 56.40 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 66.03 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 17.23 टक्के इतकी आहे. 00000

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हास्तरीय योजनांना स्वतंत्र लेखाशिर्ष मिळविण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना यश नियोजन विभागाने जिल्हास्तरीय योजनांसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास दिली मान्यता

  अलिबाग,जि.रायगड, दि.16 (जिमाका):- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या विविध विकास कामांना मूर्त स्वरूप देण्याचे काम केले जाते. मात्र काही जिल्हास्तरीय योजनांसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध नसल्याने या योजनांचे काम गतीने पूर्ण करण्यात तसेच या जिल्हास्तरीय योजनांसाठी शासन स्तरावरून निधी देण्यातही तांत्रिक अडचणी उद्भवतात.     या बाबींचा सखोल अभ्यास करुन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी वित्त व नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला आहे. आता रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय योजनांसाठी नियोजन विभागाने प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेला अनुदान, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्राची देखभाल व दुरुस्ती, वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शासकीय निवासी इमारती, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरण करणे, शासकीय रुग्णालयांकरिता यंत्र सामुग्री व साधन सामुग्री खरेदी या जिल्हास्तरीय योजनांसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार याबाबतच

एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी मौजे महाड येथील जागा देण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभाग सकारात्मक -राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे

  अलिबाग, जि.रायगड,दि. 16 (जिमाका): रायगड जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण पाहता, येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरुपी असावे, अशी राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती सुनील तटकरे यांची मागणी आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी आवश्यक सुमारे 5 एकर दुग्धव्यवसाय विभागाची जमीन उपलब्ध करुन देण्यास दुग्धव्यवसाय विभागाने तत्वत: सहमती दर्शविली आहे. याबाबत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री. सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.   कोकण विभागामध्ये विशेषत: रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्य शासनाने महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्प कायमस्वरुपी स्थापित करण्याचा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनास सादर केला आहे. या लोकोपयोगी व अत्यावश्यक कार्यासाठी   दुग्धव्यवसाय विभागाची जागा देण्याबाबत तत्वत: मान्यता देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री कु.तटकरे यांनी स्पष्ट केले.   जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे अतिवृष्टी होणे, दरड कोसळणे, चक्रीवादळ, त्सु

फणसाड-कर्नाळा अभयारण्यात भटकंतीसाठी युवक-युवतींमधून तयार होणार "टुरिस्ट गाईड" पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांतून स्थानिकांना रोजगार होणार उपलब्ध

    अलिबाग,जि.रायगड, दि.16 (जिमाका):- जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्यास पर्यटक, पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमी यांची कायम पसंती असते. शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, अभ्यास दौरे या दोन्ही पर्यटनस्थळी आयोजित होत असतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांविषयीची माहिती व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे, मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा, अशी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची संकल्पना होती. त्यानुसार भारत सरकारचा ऑनलाईन "पर्यटन सुलभ मार्गदर्शक" हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या   प्रमाणित करून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.      या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील फणसाड व कर्नाळा अभयारण्य येथील एकूण 31 आदिवासी स्थानिक युवक-युवतींना "टुरिस्ट गाईड प्रशिक्षण" देण्यात येणार असून त्यासाठी येणाऱ्या रु.3 लक्ष 66 हजार 500 इतक्या खर्चास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.       कर्नाळा व फणसाड अभयारण्यात पायाभूत सोयी-सुविधा

जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी जून ते सप्टेंबर 2021 या कालावधीत मान्सून अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- सध्याच्या मान्सून हंगामामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी जून 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत मान्सून अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.             रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण 3 हजार 228 इतके पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र आहेत. तसेच 2 हजार 254 इतक्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत. अशा एकूण 5 हजार 482 इतक्या स्त्रोतांची व उपागांची (पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्या, स्टँड पोस्ट) पाणी नमुने यांची जैविक तपासणी करण्यात येणार आहे.   पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली राहावी आणि मान्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र दूषित होऊ नये, पर्यायाने दूषित पाण्यामुळे गावात कोणतेही साथीचे रोग उद्भवू   नयेत, याकरिता ही तपासणी केली जाते. ग्रामपंचायत मधील जलसुरक्षकांकडून टिसीएल (ब्लिचिंग पावडर) द्वारे पाणी शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरणानंतर या पाण्याच्या तपासणीसाठी सुमारे 150 ते 200 मिलीलिटरच्या प्र

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करण्यासाठी दि.18 जून पर्यंत मुदतवाढ

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पी.एच.डी) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2021-22 शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्ती अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2021 पर्यंत होती. यात मुदतवाढ करण्यात आली असून आता दि. 18 जून 2021 पर्यंत या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी होता येईल, असे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.        सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.   पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.   विद्यार्थ्यांनी नमुन्यातील अर्ज swfs.applications.२१२२@gmail.com   या ईमेलवर पाठवून त्याची प्रत मुदतीत आवश्यक का

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 जून 2021 पर्यंत अंतिम मुदत वाढ

    अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका) :-शासनाच्या वतीने महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-21 चे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून दि.30 जून 2021 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करावेत. ही मुदत अंतिम असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीतच अर्ज करावेत.   शासनामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना, राजर्षी शाहू गुणवत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती इत्यादी योजना राबविल्या जातात.   या योजनांकरिता विद्यार्थी महाडीबीटी या ऑनलाइन अर्ज करू शकतात.     ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी तसेच ज्या विद्यार्थ्यांचे त्रुटीअभावी अर्ज प्रलंबित आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा.   मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्

अलिबाग आगारातील वाहन चालक व वाहक यांचा प्रामाणिकपणा प्रवाशाचे विसरलेले 35 हजार रुपये केले परत

    अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका):-अलिबाग आगारातील बसचालक व वाहक यांनी बसमधील प्रवाशाची विसरलेली बॅग व त्याचे पैसे प्रामाणिकपणे परत करून एक आदर्श निर्माण केला आहे.      दि.15 जून 2021 रोजी सकाळी 08:15 वाजता रेवदंडा व 09:15 वाजता अलिबागहून जाणाऱ्या रेवदंडा-बोरिवली गाडी क्र.3234 मधील एक प्रवासी त्याची बॅग विसरला   होता. बसचालक निलेश पाटील व वाहक जितेंद्र पवार यांनी या प्रवाशाची विसरलेली बॅग व बॅगमधील रोख रु. 35 हजार, ओळख पटवून त्यास परत केली.     त्यांच्या या प्रामाणिक कृत्यामुळे अलिबाग आगाराची व एस.टी महामंडळाची प्रतिमा जनमानसात उज्ज्वल केल्याबद्दल या दोन्ही प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा   आगार व्यवस्थापक श्री.अजय वनारसे यांच्या हस्ते आज अलिबाग आगारात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 000000

ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा सुधागड-पाली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पेडली साठी मौजे तिवरे येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.                 त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.             या पार्श्वभूमीवर सुधागड- पाली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पेडली या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                त्यानुसार मौजे तिवरे, ता.सुधागड जि. रायगड येथील स.नं.38, क्षेत्र   0-58-0

ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा सुधागड-पाली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दहिगाव साठी मौजे दहिगाव येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.             त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.                या पार्श्वभूमीवर सुधागड- पाली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दहिगाव या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.             त्यानुसार मौजे दहिगाव, ता.सुधागड, जि. रायगड येथील स.नं.113/5, क्षेत्र   0-64-

ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा खालापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, देवन्हावे साठी मौजे सांगडेवाडी येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.             त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.               खालापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, देवन्हावे या   इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.               त्यानुसार मौजे सांगडेवाडी, ता.खालापूर, जि.रायगड येथील स.नं.1/2 (जुना 1/ब) क्षेत्र   0-35-00 हे.आर. पैक

ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा महाड तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्र, मांडले साठी मौजे मांडले येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती.     मात्र पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.             त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.               महाड तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्र, मांडले या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.             त्यानुसार मौजे मांडले, ता.महाड, जि. रायगड येथील सर्व्हे नं.2/3 एकूण क्षेत्र   00-07-80 हे.आर. पैकी 0-03-00 ह

ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा महाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निजामपूर साठी मौजे किंजळोली बुद्रुक येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.             त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.               महाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निजामपूर या   इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                त्यानुसार मौजे किंजळोली बुद्रुक, ता.महाड जि. रायगड येथील गावठाण क्षेत्र   5-49-00 हे.आर. पैकी 0-04-00 हे.आर.ह

ध्यास पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचा ... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा रोहा तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्र, आमडोशीसाठी मौजे वरवठणे येथील शासकीय जागा हस्तांतरित

      अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.     त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.     या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्र, आमडोशी या  इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती,  याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.               त्यानुसार मौजे वरवठणे, ता.रोहा जि. रायगड येथील गट.नं.77 एकूण क्षेत्र  0-12-50 हे.आर. पैकी 0-05-00 हे

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 63 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 63.25 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 475.59   मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 74.00 मि.मी., पेण- 13.00 मि.मी., मुरुड- 150.00 मि.मी., पनवेल- 2.40 मि.मी., उरण-11.00 मि.मी., कर्जत- 35.00 मि.मी., खालापूर- 53.00 मि.मी., माणगाव- 48.00 मि.मी., रोहा- 107.00 मि.मी., सुधागड-23.00 मि.मी., तळा- 71.00 मि.मी., महाड- 48.00 मि.मी., पोलादपूर- 57.00 मि.मी, म्हसळा- 96.00 मि.मी., श्रीवर्धन- 213.00 मि.मी., माथेरान- 10.60 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 12.00 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 63.25 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 15.13 टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.60 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.90 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.20 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.80 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.30 मी. इतकी आहे. 00000