ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा महाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निजामपूर साठी मौजे किंजळोली बुद्रुक येथील शासकीय जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.

            त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

             महाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निजामपूर या  इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

              त्यानुसार मौजे किंजळोली बुद्रुक, ता.महाड जि. रायगड येथील गावठाण क्षेत्र  5-49-00 हे.आर. पैकी 0-04-00 हे.आर.ही जमीन महसूल मुक्त व सारामाफीने ही शासकीय जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र, निजामपूर करिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.

            महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे. 

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक