Posts

Showing posts from April 3, 2022

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

    अलिबाग, दि.08 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मार्च 2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु   असून, या सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर Em

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात शिवकर ग्रामपंचायत कोकण विभागात विशेष पुरस्काराने सन्मानित

Image
    अलिबाग, दि.08 (जिमाका):- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 कोकण विभागांतर्गत करण्यात आलेल्या तपासणी मध्ये पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीला तीन ही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात   सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा स्व.वसंतराव नाईक पुरस्कार, शौचालय व्यवस्थापनासाठी देण्यात येणारा स्व.आबासाहेब खेडेकर पुरस्कार व पाणी गुणवत्ता व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.             ग्रामीण भागातील जनतेसाठी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा शाश्वत वापर करणे, गावातील संपूर्ण परिसर, शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालये व इतर परिसर संपूर्णपणे स्वच्छ ठेवणे, सांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन करणेसाठी   व लोकसहभागातून स्वच्छता सुविधा निर्माण होणेसाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान महत्वपूर्ण ठरत आहे.           या विजेत्या ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे व ग्रा.पं.चे सदस्य यांचे अभिनंदन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) डॉ.ज्ञानदा फणसे,

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे

      अलिबाग, दि.08 (जिमाका):- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शासनाने दि. 06 एप्रिल ते दि. 14 एप्रिल 2022 या कालावधीत “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ” संपूर्ण राज्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्र मां तर्गत विविध शासकीय योजनांबाबत जनजागृतीसाठी जिल्हास्तरावर बहुविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानुसार अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान या वर्गात शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थी व त्यां च्या पालक यां च्या करिता जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त कर ण्या कामी अर्ज सादर करताना घ्यावयाची दक्षता व अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना ( जात प्रमाणपत्राची पडताळणी ) याविषयी जनजागृतीसाठी मंगळवार, दि.12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वा.सेमिनार, हॉल, जे.एस.एम.महाविद्यालय, अलिबाग येथे एकदिवसीय कार्यशा ळेचे आयोजन करण्यात आले आहे.     तरी इ च्छू क सर्व नागरिकांनी या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामाजिक समता कार्यक्रमांची सुरुवात

Image
जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन  सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांची माहिती                                          अलिबाग, दि.07 (जिमाका):- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त   सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील 10 दिवस रायगड जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे महामानव डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि.06 एप्रिल ते दि.16 एप्रिल या कालावधीत "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार, रायगड जिल्ह्यातही पुढील दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष श्री.प्रकाश सोनवडेकर, ज्येष्ठ प्रेस

विशेष लेख: सप्तसूत्री कातकरी उत्थान अभियानाची..!

रायगड जिल्हा हा पश्चिमेकडील अरबी समुद्र व पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा यामुळे भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. रायगड जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 11.58% लोकसंख्या आदिवासी बांधवांची आहे. यापैकी 40% लोकसंख्या कातकरी बांधवांची आहे. शासन स्तरावरुन आदिवासींचा आर्थिक, सामाजिक विकास करण्याकरीता अनेक योजना राबविल्या जातात. परंतु तरीही, आदिवासी बांधव अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून एक सप्तसूत्री निश्चित करण्यात आली आहे व त्या माध्यमातून आदिवासींच्या कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन व नियंत्रण केले जात आहे. आदिवासी बांधवांकरिता अस्तित्वात असलेल्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळण्याकरिता शासनाच्या सर्व विभागांचा समन्वय असणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हास्तरावर “ जिल्हा आदिवासी कल्याणकारी समन्वय समिती ” , तालुकास्तरावर “ तालुका आदिवासी कल्याणकारी समन्वय समिती" व ग्रामपंचायत स्तरावर "ग्राम आदिवासी कल्याणकारी समन्वय समिती" या 3 समित्यांची स

किल्ले रायगड येथे 15 व 16 एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

Image
छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता शिवभक्तांनी मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन अलिबाग, दि.06 (जिमाका):-  छत्रपती शिवाजी महाराज यांची दि.16 एप्रिल 2022 रोजी 342 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रमुख पाहुणे म्हणून त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.15 व 16 एप्रिल 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम पुढीलप्रमाणे:- शुक्रवार दि.15 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 07.00 वा., राजदरबारात सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांच्या मुलाखती व शाहिरी कार्यक्रम  “ ही रात्र शाहिरांची ”  तसेच रा

जिल्ह्यात दि.07 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

अलिबाग, दि.06 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यात दि.07 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग श्री.संदीप वि. स्वामी यांनी सांगितले. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे अॅक्टखालील प्रकरणे दिवाणी अपिले, तडजोडपात्र पालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था इतर थकबाकी बाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेले शुल्क परत मिळते. त्यामुळे शनिवार, दि.07 मे 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्याव

महाराष्ट्र विधीमंडळाच्या वतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन

Image
  पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व आमदार निरंजन डावखरे यांचाही सहभाग   अलिबाग, दि.05 (जिमाका):- महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 05 आणि 06 एप्रिल 2022 रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .   महाराष्ट्र राज्याच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच सभागृहातील इतर ज्येष्ठ सदस्य या प्रशिक्षणास उपस्थित आहेत. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसह एकूण 110 आमदारांनी नोंदणी केली आहे.   उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकैय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच महाराष्ट्र विधीमंडळाचे पिठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत . या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्यांची व्याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे असे लोकप्रतिनिधीभिमुख कार्यक्रम होणार आहेत. 00000

“क्षयरोग मुक्त भारत” होण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय अन् आरोग्य विभागाने कसली कंबर

Image
    अलिबाग, दि.05 (जिमाका):- जागतिक क्षयरोग दिन दि.24 मार्च 2022 रोजी असतो. त्यानिमित्ताने जिल्ह्यात दि.24 मार्च ते दि.01 एप्रिल 2022 या कालावधीत “ क्षयरोग मुक्त भारत ” ही शपथ घेऊन विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा क्षयरोग कार्यालयात क्षयरोग उपचार पद्धतीचे जनक डॉ.राबर्ट कौच यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व कर्मचाऱ्यांनी “ क्षयरोग मुक्त भारत ” ही शपथ घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे क्षयरोगाचे पोस्टर प्रदर्शन आयोजित करून त्याबाबतची माहिती येथील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. ही पोस्टर्स ANM व GNM ला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बनविली होती. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश ठोकळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घासे, जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री.सतीश दंतराव, आरोग्य सहाय्यक श्री.उदय चव्हाण, फार्मसिस्ट श्री.दत्तात्रय शिंदे, डेटा एन्ट्री ऑपरेटर सौ.वृषाली पाटील, सौ.धनश्री कोळी, श्रीमती गीता गोरेगावकर, श्री.कृष्णा नाईक व राजू पालवनकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. महाड तालुक्यात सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांना क्षयरोगाचे मार्गदर्शन करू

उरण नगरपरिषद माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयामध्ये गरुडझेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू

Image
    अलिबाग, दि.05 (जिमाका):- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत “ गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ” जिल्ह्यातील विविध तालुक्यात सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून महिन्यातील दर शनिवार व रविवारी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उरण नगरपरिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालय येथे “ गरूडझेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रा ” ची स्थापना करण्यात आली. यासाठी तहसिलदार श्री.भाऊसाहेब अंधारे आणि मुख्याधिकारी श्री.संतोष माळी यांनी पुढाकार घेतला. या अभ्यासिकेचे उद्घाटन तहसिलदार श्री.भाऊसाहेब अंधारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार श्री.अंधारे आणि मुख्याधिकारी श्री.माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात मिळणाऱ्या सुविधा आम्हाला त्याकाळी उपलब्ध नव्हत्या. अथक परिश्रमाने, संघर्षाने प्रत्येक गोष्ट मिळवावी

विशेष लेख: महिला व बालकांच्या विकासासाठी शासन सदैव सज्ज..!

Image
शासन महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध माध्यमातून प्रयत्नशील असते. यासाठी शासनाचा महिला व बालविकास विभाग हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत महिला व बालकांसाठी निरनिराळ्या योजना राबविण्यात येतात. काही महत्वाच्या योजना समजून घेवू या लेखाद्वारे..!   माझी कन्या भाग्यश्री योजना लाभाचे स्वरुप:- एक मुलगी असल्यास 50 हजार रु. दोन मुली असल्यास 25 हजार मुदत ठेव. मुलगी 6 वर्षाची, 12 वर्षाची झाल्यास ठेवी रक्कमे वरील व्याज मिळेल व 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुद्दल व व्याज मिळेल. लाभार्थी मुलगी व तिची आई यांचेसंयुक्त बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत (बँक ऑफ महाराष्ट्र) उघडून दोघींना 1 लाख अपघात विमा, 5 हजार ओव्हरड्राफ्ट व इतर लाभ घेता येतील. अंतिम लाभ घेताना मुलीचे वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे व अविवाहीत असणे असवश्यक. पात्रता:- दि.01 ऑगस्ट 2017 रोजी किवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुली कुटुंबात एक किवा दोन मुली अपत्य असल्यास योजनेचा लाभ घेता येईल. तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभार्