संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात शिवकर ग्रामपंचायत कोकण विभागात विशेष पुरस्काराने सन्मानित

 



 

अलिबाग, दि.08 (जिमाका):-संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 कोकण विभागांतर्गत करण्यात आलेल्या तपासणी मध्ये पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीला तीन ही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात  सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा स्व.वसंतराव नाईक पुरस्कार, शौचालय व्यवस्थापनासाठी देण्यात येणारा स्व.आबासाहेब खेडेकर पुरस्कार व पाणी गुणवत्ता व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

           ग्रामीण भागातील जनतेसाठी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा शाश्वत वापर करणे, गावातील संपूर्ण परिसर, शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालये व इतर परिसर संपूर्णपणे स्वच्छ ठेवणे, सांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन करणेसाठी  व लोकसहभागातून स्वच्छता सुविधा निर्माण होणेसाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान महत्वपूर्ण ठरत आहे.

          या विजेत्या ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे व ग्रा.पं.चे सदस्य यांचे अभिनंदन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) डॉ.ज्ञानदा फणसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) निलेश घुले, उप मुख्य कार्यकारी (ग्रा.पं.) राजेंद्र भालेराव यांनी केले. यावेळी उपसरपंच लक्ष्मण तुपे, सदस्य सुरज भगत, विष्णू पाटील, ज्योती पाटील, भात गिरणी संचालक नारायण तुपे,ज्येष्ठ पत्रकार सुधाकर लाड हे उपस्थित होते. 

तसेच  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील  इतर ग्रामपंचायतीने यापुढे सक्रीय सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन केले आहे. या करिताजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, रविकिरण गायकवाड, आनंद धिवर व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोये, विस्तार अधिकारी  विश्वास म्हात्रे, अविनाश घरत, ग्रामसेवक सचिन पाटील यांचेही योगदान महत्वपूर्ण राहिले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक