Posts

Showing posts from August 7, 2016

महाड दुर्घटना महसूल मंत्र्यांनी दिला वारसाला मदतीचा धनादेश

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad       दिनांक :- 11 ऑगस्ट, 2016                                                        वृत्त क्र.516 महाड दुर्घटना महसूल मंत्र्यांनी दिला वारसाला मदतीचा धनादेश           अलिबाग दि.11 :- महाड सावित्री नदीवरील दुर्घटनेत  मृत झालेल्या एस.टी. वाहन चालक  मयत श्रीकांत शामराव कांबळे यांच्या पत्नी श्रीमती कमल कांबळे यांना आज  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले तालुक्यात मौजे सावर्डे या गावी जावून शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मदतीचे प्रत्येकी 4-4 लाख रुपयांचे  धनादेश देऊन सांत्वन केले. या दुर्देवी दुर्घटनेत श्रीकांत कांबळे यांच्या सोबत त्यांचा मुलगा महेंद्र हा देखील मृत पावला असल्याने एकूण 8 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला.            या दुर्घटनेतील 21 मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये  मदत

महाड दुर्घटना बस शोधण्यास तपास यंत्रणेला यश

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad       दिनांक :- 11 ऑगस्ट, 2016                                                        वृत्त क्र.515 महाड दुर्घटना बस शोधण्यास तपास यंत्रणेला यश             अलिबाग दि.11 :- महाड येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती व वाहनांचा शोध घेणाऱ्या पथकाला एम.एच.40, एन.9739 राजापूर-बोरीवली या बसचा शोध लावण्यास यश मिळाले असून घटनास्थळापासून साधारणत: 200 मीटर अंतरावर ही बस आढळून आली. 10-12 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नौदलाच्या पथकाला बसच्या काही भागाचा शोध होता. त्यानंतर  क्रेनच्या मदतीने ही बस पाण्याबाहेर काढण्यात आली.             शोध मोहिमेमध्ये एन.डी.आर.एफ. चे जवान,  तसेच के.एम.बी. कम्युनिकेशन डिव्हाईस 8 डायव्हर्स तसेच सोनार यंत्रणेसह स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य करीत आहेत. 9 बोटी, 8 डायव्

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महाड नगर परिषद

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग दूरध्वनी -222019, ई मेल- dioraigad@ gmail.com,                dioabg@rediffmail.com फेसबुक :- dioraigad        ट्विटर :- @dioraigad दिनांक 11 ऑगस्ट 2016                                                                                  लेख क्रमांक 20 शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महाड नगर परिषद          छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात   ऐतिहासिक, सामाजिक, नैसर्गिक वैशिष्टांनी नटलेल्या व  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले महाड हे एक महत्वाचे शहर.   जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले महाड पूर्वीपासूनच प्रसिध्द. इतिहासाची महत्वपूर्ण साक्ष असलेल्या या महाड शहरातील नगर पालिकेची स्थापना दीडशे वर्षापूर्वी  म्हणजे 1866 साली झाली.   या दीडशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात नगर परिषदेत अनेक संक्रमणे झाली.  शहराच्या भौतिक विकासाबरोबरच नागरी सुविधा आणि शहराची सांस्कृतिक, सामाजिक ज

महाड दुर्घटना शोध मोहिमेसाठी सोनार यंत्रणेचा वापर

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 10 ऑगस्ट, 2016                                                                                          वृत्त क्र.509 महाड दुर्घटना शोध मोहिमेसाठी सोनार यंत्रणेचा वापर             अलिबाग दि.10 :- महाड येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती व वाहनांचा शोध घेण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. आता पर्यंत 26 मृतदेह हाती आले आहेत. विविध अत्याधुनिक यंत्र सामग्रीच्या माध्यमातून महाड व त्यापुढील नदी पात्र परिसरात ही शोध मोहिम सुरु आहे. यात आता नव्याने सोनार या यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.           या सोनार यंत्रणेत ध्वनी लहरींच्या माध्यमातून प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा बोटीमध्ये बसविलेल्या संगणक पडदयावर दिसते व त्यायोगे पाण्याखाली असलेल्या वस्तूचे आकलन होऊ शकते. या यंत्रणेचा व

महाड दुर्घटना जिल्हा प्रशासनाचे अविरत प्रयत्न स्थानिकांच्या मदतीने नदीकाठी तपास

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad         दिनांक   :- 09 ऑगस्ट, 2016                                                                                         वृत्त क्र.502 महाड दुर्घटना जिल्हा प्रशासनाचे अविरत प्रयत्न स्थानिकांच्या मदतीने नदीकाठी तपास             अलिबाग दि.09 :- महाड सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घनेतील बेपत्ता व्यक्तींच शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय शोध गट तयार केले असून स्थानिकांच्या मदतीने नदीकाठी ही शोध मोहिम सुरु आहे. या शोध मोहिमेत उपविभागीय अधिकारी महाड श्रीमती सुषमा सातपुते व उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन तेजस समेळ यांच्या नियंत्रणात म्हसळा, श्रीवर्धन, महाड येथील तहसिलदार व त्यांची यंत्रणा कार्यरत आहे. आज श्री साई ड्रेजर ऑर्गनायझेशन रे, रोड यांच्या मदतीने के.एम.बी. कम्युनिकेशन डिव्हाईस

महाड दुर्घटना 19 मृतांच्या वारसांना मदत

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad       दिनांक   :- 09 ऑगस्ट, 2016                                                                                       वृत्त क्र.503 महाड दुर्घटना 19 मृतांच्या वारसांना मदत             अलिबाग दि.09 :- महाड दुर्घटनेत एकूण 26 मृतदेह आतापर्यंत हाती आले असून त्यापैकी 19 जणांची वारस कागदपत्रे छाननी पूर्ण झाली आहे. त्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचे प्रत्येकी 4 लाख रुपयांचे धनादेश संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आले असून ते   संबंधितांच्या वारसांना देण्यात येत आहेत. उर्वरित 7 जणांच्या संदर्भातही कार्यवाही सुरु आहे. लवकरच ती पूर्ण होईल. अशी माहिती महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांनी दिली.             या दुर्घटनेतील मृत स्नेहल व सुनिल बैकर, अविना

पशुधन विमा योजना अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad     दिनांक   :- 09 ऑगस्ट, 2016                                                                      वृत्त क्र.505 पशुधन विमा योजना अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा                                                                                      - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर                         अलिबाग दि09 :- पशुधन विमा योजनेमुळे जनावरांना विम्याचे संरक्षण मिळणार असल्याने ही योजना गोर गरीबांसाठी उपयुक्त आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पशुधन मालकांना मिळावा म्हणून ही योजना अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन   पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्य संवर्धन विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी आज माथेरान येथे केले.             माथेरान येथे रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व

विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांची महाड दुर्घटना स्थळाला भेट

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad   दिनांक   :- 09 ऑगस्ट, 2016                                                                                      वृत्त क्र.504 विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांची महाड दुर्घटना स्थळाला भेट           अलिबाग दि. 09 :-   महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटना स्थळ व येथे सुरु असलेल्या   शोध व मदत केंद्राला विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांनी काल संध्याकाळी भेट दिली.                           शोध व मदत कार्याचा आढावा घेऊन या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व बेपत्ता व्यक्तींच्या   नातेवाईकांची विचारपूस करुन त्यांना दिलासा दिला.   यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार माणिकराव जगताप, तहसिलदार संदिप कदम उपस्थित होते. 0000000

महाड दुर्घटना शोध मोहिम अधिक तीव्र व व्यापक करावी -पर्यावरण मंत्री रामदास कदम

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad      दिनांक :- 08 ऑगस्ट, 2016                                            वृत्त क्र.493 महाड दुर्घटना शोध मोहिम अधिक तीव्र व व्यापक करावी                                                                    - पर्यावरण मंत्री रामदास कदम अलिबाग दि.08 :- महाड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींच्या शोधार्थ सुरु असलेली मोहिम अधिक तीव्र व व्यापक करावी. तसेच दुर्घटनास्थळापासून सावित्री नदी समुद्रास जेथे मिळते तिथपर्यंत नदी काठच्या दोन्ही भागात प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक शोध घ्यावा, यासाठी स्थानिक पातळीवरही सहकार्य घ्यावे असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज महाड येथे दिले. मंत्री महोदयांनी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत आज सकाळी दुर्घटनास्थळाची पाहणी करुन, मदत व नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी स्थानिक आमदार भर