महाड दुर्घटना शोध मोहिम अधिक तीव्र व व्यापक करावी -पर्यावरण मंत्री रामदास कदम

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
     दिनांक :- 08 ऑगस्ट, 2016                                            वृत्त क्र.493
महाड दुर्घटना
शोध मोहिम अधिक तीव्र व व्यापक करावी
                                                                   -पर्यावरण मंत्री रामदास कदम


अलिबाग दि.08 :- महाड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींच्या शोधार्थ सुरु असलेली मोहिम अधिक तीव्र व व्यापक करावी. तसेच दुर्घटनास्थळापासून सावित्री नदी समुद्रास जेथे मिळते तिथपर्यंत नदी काठच्या दोन्ही भागात प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक शोध घ्यावा, यासाठी स्थानिक पातळीवरही सहकार्य घ्यावे असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज महाड येथे दिले.
मंत्री महोदयांनी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत आज सकाळी दुर्घटनास्थळाची पाहणी करुन, मदत व नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली उगले, जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक उपस्थित होते.
शोध मोहिमे संदर्भात मार्गदर्शन करताना मंत्री महोदय म्हणाले, या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींचा व वाहनांचा शोध लागणे आवश्यक आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर आणखी काही मदत हवी असल्यास ती दिली जाईल.
तर गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी शोध कार्यासाठी  आधुनिक साधन सामग्री अथवा तज्ञांची मदत आवश्यक असेल तर ती घेण्यात यावी. शोध कार्य अधिक जोमाने करावे असे सांगितले. यावेळी मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडून  शोध कार्य व मदत केंद्राबाबतची सविस्तर माहिती घेतली.
आपतग्रस्त कुटुंबातील नातेवाईकांची भेट
          दोन्ही मंत्री महोदयांनी या दुर्घटनेतील बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना शोध कार्याबद्दल माहिती देऊन बेपत्ता व्यक्तींचा शोध लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच  स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी ही त्यास दुजोरा दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी  श्रीमती सुषमा सातपुते, तहसिलदार संदिप कदम व इतर अधिकारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक