Posts

Showing posts from April 10, 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी योजनेची कार्यशाळा व संविधान जागर रॅली संपन्न

Image
  अलिबाग,दि.13 (जिमाका):- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दि.06 एप्रिल ते दि.16 एप्रिल 2022 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यास अनुसरुन दि.12 एप्रिल 2022 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी या योजनेचा लाभ देणे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा 22 नवउद्योजकांनी लाभ घेतला. या कार्यशाळेत स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी या योजनेबाबत माहिती तसेच योजनेबाबत नवउद्योजकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचाराकरिता जिल्हा व तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे दि.13 एप्रिल 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर “ संविधान जागर रॅली ” चे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.आंबेडकरांच्या पुर्णाकृती पूतळ्यास अभिवादन करून या रॅलीला स

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमीत्त स्वाधार शिष्यवृत्ती वाटप, रक्तदान शिबीर, ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पथनाट्याद्वारे प्रसिद्धी व महात्मा फुले जयंतीनिमीत्त व्याख्यान उत्साहात शुभारंभ

अलिबाग,दि.13 (जिमाका):- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत डॉ.बाबासाहेब 131 व्या जयंतीनिमित्त दि.06 एप्रिल ते दि.16 एप्रिल 2022 दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने शुक्रवार (दि.08 एप्रिल 2022) रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात (अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड श्रेणी) तथा अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड-अलिबाग डॉ.भरत बास्तेवाड यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार 6 लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात रु.59 हजार 500 प्रत्येकी स्वाधार शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या सहकार्याने दि.09 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, अलिबाग येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अलिबाग शैलेश सणस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी स्वत:रक्तदान केले. या शिबिराकरिता अंदाजे 70 व्यक्ती उपस्थित राहिल्या. त्यापैकी 30 व्यक्तींनी रक्तदान केले. तसेच जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरिकांचा मेळावा श्री सम

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता सन 2022-23 साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना

अलिबाग,दि.13 (जिमाका):-  जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता रायगड जिल्ह्यात सन 2022-23 साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात येत आहे. या भरारी पथकामध्ये खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथक प्रमुख:  रायगड जिल्हा परिषद, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकूटे. सदस्य:  उपविभागीय कृषी अधिकारी, अलिबाग/माणगाव श्री.कैलास वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी, खोपोली/महाड श्री.बालाजी ताटे, रायगड जिल्हा परिषद, मोहिम अधिकारी श्री.मिलींद चौधरी, निरिक्षक वैद्यमापनशास्त्र रायगड श्री.बी.आर.चव्हाण. सदस्य सचिव:  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक श्री.गोरक्षनाथ मुरकूटे. जिल्हास्तरावर नियुक्त केलेल्या भरारी पथकाने कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी व त्याचा अहवाल वेळोवेळी या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले व रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकूटे यांनी केले आहे. 00000

महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी “एकरकमी परतावा (OTS)” योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे - जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर

अलिबाग ,  दि. 13  ( जिमाका):-  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि., रायगड यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. रायगड जिल्ह्यातील  “ ओबीसी ”  महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50% सवलत देण्याबाबतची  “ एकरकमी परतावा (OTS) योजना ”  दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी  “ एकरकमी परतावा (OTS) ”  योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे. 00000

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.5 वी व 8 वी साठी ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ

अलिबाग ,  दि. 13  ( जिमाका):-  महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.5 वी व इ.8 वी साठी नव्याने प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि .01  फेब्रुवारी  2022  ते  31  मार्च  2022  (रात्री 11.59 वाजेपर्यंत) कालावधी निश्चित करण्यात आला होता हा कालावधी संपुष्टात येत आहे. उपरोक्त ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास पुनश्च मुदतवाढ देण्यात येत असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे: नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यासाठीचा दिनांक:- विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे:   शुक्रवार दि.01 एप्रिल 2022 ते शुक्रवार दि.15 एप्रिल 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे:  सोमवार, दि.04 एप्रिल ते सोमवार, दि.18 एप्रिल 2022 संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे:  शुक्रवार दि.22 एप्रिल 2022 वरील नमुद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ.5 वी व 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्या

जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प वेगाने पूर्ण करावेत -जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील

Image
अलिबाग,दि.12 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात मोठे 01, मध्यम 02, लघु 51 असे एकूण 54 जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाले आहेत, मात्र बांधकामाधीन 09 प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करावेत, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, सर्वश्री आमदार रविंद्र पाटील, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) सुषमा सातपुते, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, जलसंपदा विभाग कोकण प्रदेश मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता ठाणे पाटबंधारे मंडळ श्री.धाकतोडे, अधीक्षक अभियंता

जवाहर नवोदय विद्यालय सत्र 2022-2023 करीता इयत्ता 6 वी ची दि.30 एप्रिल रोजी निवड परीक्षा

अलिबाग , दि. 12 ( जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय , रायगडची सत्र 2022-2023 करीता इयत्ता 6 वी ची निवड परीक्षा दि. 30 एप्रिल 2022 ( शनिवार) रोजी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. प्रवेशपत्र जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या https://cbseitms.nic.in/ व https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर. चिंचकर - 9881351601 , श्री.कैलास. पी. वाघ – 9527256185 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तरी रायगड जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी व पालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय , रायगडचे प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी केले आहे. 00000

डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत पोलीस पाटलांना अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले मार्गदर्शन

Image
अलिबाग,दि.11(जिमाका):- रायगड जिल्हा पोलीस व स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत “ पोलीस पाटील यांचे हक्क व कर्तव्य ” या विषयावर झूम मीटिंगच्या माध्यमातून अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. यावेळी स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. पोलीस पाटलांचा “ क्षमता बांधणी ” हा कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार असून त्यामध्ये शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध विषयावर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला पोलीस पाटलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 00000

राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्ताने नियोजन भवनात भूमापन दिनाचा कार्यक्रम संपन्न

Image
  अलिबाग,दि.11 (जिमाका):- दि.10 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्तरावर भूमापन दिनाचा कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत करून दीपप्रज्वलन व मोजणी साहित्यांचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भूमापनाचे महत्व सांगून भूमी अभिलेख व महसूल विभाग यांनी एकत्र येवून सामान्य जनतेला न्याय देण्याबाबत आवाहन केले. त्याचप्रमाणे सामान्य जनतेची मोजणीची कामे, शासकीय मोजणी कामे, भूसंपादन मोजणी कामे वेळेवर पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून उपलब्ध आधुनिक मोजणी साहित्याचा वापर करण्याबाबत आग्रही सूचना केली. रायगड जिल्हा भूमी अभिलेख विभागासाठी अत्याधुनिक रोव्हर मशिन उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.सचिन इंगळी यांनी आपल्या प्रास्ताविकात भूमापन दिनाचे महत्व व

विशेष लेख: गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके व किशोरवयीन मुलींनी घ्या योग्य आहार अन् राहा निरोगी..!

शासन महिला व बालकांच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे. गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुली यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार घेवून आपले आरोग्य निरोगी ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेवू या या लेखाच्या माध्यमातून..! 1.     गरोदर स्त्रिया:- ·          दररोज आयरन आणि व्हिटॅमिनयुक्त विविध पौष्टिक आहार घ्यावा. ·          पौष्टिक असलेले दूध आणि तेल तसेच आयोडीनयुक्त मीठ खावे. ·          आई.एफ.ए. ची लाल गोळी चौथ्या महिन्यापासून ते 180 दिवसांपर्यंत दररोज खावी. ·          कॅल्शियमची ठराविक मात्रा घ्यावी. ·          नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. ·          1 एल्बेण्डाजोलची गोळी दुसऱ्या तिमाहीत घ्यावी. ·          उंच जागी झाकून ठेवलेले शुद्ध पाणीच प्यावे. ·          डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सोनोग्राफी करून घ्यावी. ·          प्रसूतीआधी कमीत कमी 4 ए.एन.सी तपासण्या ए.एन.एम. ताई किंवा डॉक्टरांकडून नक्की करून घ्यावी. ·          जवळचे रुग्णालय किंवा चिकित्सा केंद्रामध्येच आपली प्रसूती करवून घ्यावी. ·          स्वतः च्या स्वच्छते

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  अलिबाग, दि.11 (जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील ,   तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासहित जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000