महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.5 वी व 8 वी साठी ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ

अलिबागदि.13 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.5 वी व इ.8 वी साठी नव्याने प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि.01 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) कालावधी निश्चित करण्यात आला होता हा कालावधी संपुष्टात येत आहे. उपरोक्त ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास पुनश्च मुदतवाढ देण्यात येत असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यासाठीचा दिनांक:-

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे: शुक्रवार दि.01 एप्रिल 2022 ते शुक्रवार दि.15 एप्रिल 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)

विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे: सोमवार, दि.04 एप्रिल ते सोमवार, दि.18 एप्रिल 2022

संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे: शुक्रवार दि.22 एप्रिल 2022

वरील नमुद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ.5 वी व 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच अर्ज भरण्यासाठीच्या सर्व सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे-04 चे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक