Posts

Showing posts from June 9, 2019

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.00 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 111.62 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 8.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-8.00 मि.मि., पनवेल-00.00 मि.मि., उरण-63.00 मि.मि., कर्जत-1.80 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-10.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-13.00 मि.मि., महाड-4.00मि.मि., पोलादपूर-2.00, म्हसळा-00.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-3.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 144.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.00 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   3.55 टक्के इतकी आहे. 0000

जिल्हा नियोजन भवनाचे थाटात उद्घाटन नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास मान्यता देऊ-मुख्यमंत्री श्री.फडणवीस

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 : येथील जिल्हा नियोजन भवन या नवीन इमारतीचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते   थाटात ई-उद्घाटन करण्यात आले.   या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस   यांनी व्हिडिओ संदेश पाठवून रायगड जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या.   तसेच अलिबाग येथे जिल्हा प्रशासनाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या रु.50 कोटी रुपायांच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देऊ अशी घोषणाही फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केली.               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणा शेजारी आयोजित या सोहळ्यास राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, आ.बाळराम पाटील, विधानसभा सदस्य सर्वश्री   आमदार सुरेश लाड, आ.भरतशेठ गोगावले, आ.धैर्यशील पाटील, आ.सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, आ.मनोहर भोईर तसेच प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, पनवेल महानगरपालिका आ

जिल्हा नियोजन समिती बैठक : 211 कोटींच्या कामांना मंजूरी : जिल्हा विकासाचा निधी वेळेत खर्च होणे अपेक्षित- पालकमंत्री चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 : जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या आढावा बैठकीत वार्षिक आरखड्यातील 211 कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजूरी देण्यात आली.   जिल्हा नियोजन समितीचा निधी यंत्रणाकडून वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी दिले.               आज जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.   या बैठकीस पालकमंत्री चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, आ.बाळराम पाटील, विधानसभा सदस्य सर्वश्री   आमदार सुरेश लाड, आ.भरतशेठ गोगावले, आ.धैर्यशील पाटील, आ.सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, आ.मनोहर भोईर तसेच प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.             बैठकीच्या प्र

कंत्राटी कामगार व प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देऊ -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 : मौजे रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तसेच एचओसी प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन   राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिले.   शासकीय विश्रामगृह येथे आयोजित मौजे रासळ येथील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत   ते बोलत होते.             यावेळी आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, आ.मनोहर भाईर, आ.बाळाराम पाटील,   प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), श्रीमती वैशाली माने आदि उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, की रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या असलेल्या अडीअडचणी जाणून घेऊन कंपनी व्यवस्थापनाने त्यांना योग्य त्या सुविधा देऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले.   कंपनी व्यवस्थापनाला पुरविण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित न होता नि

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 29 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 29.63 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 102.62 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 45.00 मि.मि., पेण-31.00 मि.मि., मुरुड-44.00 मि.मि., पनवेल-18.50 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-9.00 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-39.00 मि.मि., रोहा-42.00 मि.मि., सुधागड-12.00 मि.मि., तळा-22.00 मि.मि., महाड-10.00मि.मि., पोलादपूर-28.00, म्हसळा-80.00मि.मि., श्रीवर्धन-48.00 मि.मि., माथेरान-25.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 474.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 29.63 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   3.27 टक्के इतकी आहे. 0000

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत कौशल्य विषयक कार्यशाळा संपन्न

Image
नवी मुंबई, दि. 14  : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कौशल्य विषयक कार्यशाळेचे आयोजन आज ग्रामविकास भवन,  खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय ग्राम विकास विभागाच्य अतिरिक्त सचिव अलका उपाध्याय, केंद्रीय कौशल्य विभागाचे सह सचिव चरणजित सिंग,  ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला हे उपस्थित होते. केंद्र शासनामार्फत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबविला जातो. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्था यांच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येते व त्यामधून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतात. या कार्यशाळेची थीम  “ कौशल्य विकास ”  ही होती. कुठलेही काम करताना त्यामध्ये कौशल्य असणे खूप महत्वाचे असते. कौशल्य विषयक प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. या योजने अतंगर्त ग्रामीण भागातील तरुण सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.45 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 72.99 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 14.00 मि.मि., पेण-12.10 मि.मि., मुरुड-14.00 मि.मि., पनवेल-1.00 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-13.40 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-16.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-24.00 मि.मि., महाड-18.50मि.मि., पोलादपूर-6.00, म्हसळा-57.00मि.मि., श्रीवर्धन-32.00 मि.मि., माथेरान-27.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 295.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 18.45 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   2.32 टक्के इतकी आहे. 0000

ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजनेतील कामांची माहिती उपलब्ध

अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण या प्रकल्पाच्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजने अंतर्गत सन 2018- मध्ये अनुसूचित जमातीच्या आदिवासी वाड्याकरिता विविध सुविधा उपलबध होण्याकरिता अंतर्गत रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे, समाज मंदिर बांधणे, व्यायाम शाळा बांधणे, रस्ता तयार करणे, स्मशानभूमि बांधणे, स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तयार करणे, जोडरस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे, विहिर बांधणे, नळपाणी पुरवठा योजना, विहिर दुरुस्ती व खोलीकरण करणे, नदी काठी घाट बांधणे, इत्यादी कामांना मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे.  या मंजूर झालेल्या कामांचा दर्जा, मंजूर निधी, गुणवत्ता याबाबतची अनुसूचित जमातीच्या जनतेस व्हावी.   सदर यादी कार्यालयात पहावयास मिळेल, तसेच मंजूर कामाचा दर्जा व गुणवत्ता चांगल्या प्रकारे व्हावा यासासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ यांनी सदर कामाबाबत लक्ष द्यावे.  या कामांबाबत काही शंका-कुशंका असल्यास अथवा तक्रारी असल्यास योजनेची संबंधित कार्यान्वित यंत्रणा यांचेकडे मांडू शकता असे आवाहन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी

महाडीबीटी संगणक प्रणाली 30 जून पर्यंत पूर्ववत

अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- सन 2018-19 या शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकरच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (MAHADBT) पोर्टल दि.1 ऑक्टोबर 2018 पासून नव्याने कार्यान्वित झाली असून https://mahadbt.gov.in या संकेत स्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभा, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती,फ्रिशिप योजनांकरिता आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले आहेत.  सदर अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करण्यात येत आहेत.   महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अर्जावर जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून ऑनलाईन मान्यता देण्यात येत आहेत.             महाडीबीटी संगणक प्रणाली सन 2018-19 मधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, अर्ज अद्ययावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करणे इत्यादी करिता महाडीबीटी संगणक प्रणाली दि.11 जूनप

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे   जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.             शुक्रवार दि. 14 रोजी दुपारी पावणे चार वा. पनवेल येथे आगमन. दुपारी चार वा. विस्तारकांसमवेत बैठक. स्थळ:भाजपा कार्यालय, पनवेल. सायं.पाच वा. पनवेल येथून महाडकडे प्रयाण. सायं.साडे सात वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह महाड येथे आगमन व राखीव.             शनिवार दि. 15 रोजी सकाळी सहा वा. महाड येथून किल्ले रायगडकडे प्रयाण. सकाळी सात वा. किल्ले रायगड येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्यास उपस्थिती. सकाळी नऊ वा. किल्ले रायगड येथून   अलिबागकडे प्रयाण.   सकाळी साडे अकरा वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.   दुपारी बारा वा.   मौजे रासळ येथील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत बैठक. स्थळ: राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, दुपारी साडे बारा वा. एचओसी रसायनी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत बैठक. स्थळ : राजस्व सभागृह

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज(दि.15) जिल्हा नियोजन भवनाचे ई-पद्धतीने उद्घाटन

अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन आज दिनांक 15 जून रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.  या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग असणार आहे.              या सोहळ्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड ना. रविंद्र चव्हाण यांची  विशेष उपस्थिती राहणार आहे.  तर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, आ.निरंजन डावखरे, आ.बाळराम पाटील, आ.अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य सर्वश्री  आमदार सुरेश लाड, आ.प्रशांत ठाकूर, आ.भरतशेठ गोगावले, आ.धैर्यशील पाटील, आ.सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, आ.मनोहर भोईर, आ.अवधूत तटकरे, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य सर्व यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी डॉ

जागतिक रक्तदान दिन सर्वांसाठी सुरक्षित रक्त

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -      कार्ल लँडस्टेनर(Karl Landsteiner) ए,बी,ओ 'रक्तगटाचा जनक 'यांच्या जयंतीदिनी 14 जून   हा ‘जागतिक   जागतिक रक्तदान दिन सर्वांसाठी सुरक्षित रक्त कार्ल लँडस्टेनर(Karl Landsteiner) ए,बी,ओ 'रक्तगटाचा जनक 'यांच्या जयंतीदिनी 14 जून   हा ‘जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. सहानुभूती व सामाजिक बांधिलकी व स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा ‘जागतिक रक्तदाता दिवस’ साजरा करतात. या वर्षी या दिनानिमित्त शासनाचे घोषवाक्य ‘Safe   Blood For All.’ अर्थात ‘सर्वांसाठी सुरक्षित रक्त’ असे आहे. ऑस्ट्रेलियातील डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी मानवी रक्तगटाचा शोध लावला.      सन २००४ मध्ये जागतिक आरोग्य संघटना,रेड क्रॉस, रेड क्रेसेन्ट सोसायटीचे आतंरराष्ट्रीय फेडरेशन यांनी १४जून रोजी सर्व प्रथम रक्तदाता दिवस साजरा केला. जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटी (Red Crescent Societies)आंतरराष्ट्रीय फेडरेशन आँफ ब्लड डोनर आँर्गनायझेशन्स (IFBDO)आणि इंटरनॅशनल सोसाय

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील बालकांना रविवारी (दि.16)लसीकरण

अलिबाग, जि.रायगड, दि.13 (जिमाका) – जिल्ह्यातील पनवेल, उरण , कर्जत आणि खालापूर या चार तालुक्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दि.16 रोजी पल्स पोलिओचा जादा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली.या संदर्भात बुधवारी (दि.12 ) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन पूर्वतयारीचा आढाव घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई आदि उपस्थित होते. उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या चारही तालुक्यातील मिळून शहरी व ग्रामीण भागात 99 हजार 484 बालकांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरी भागात 67 तर ग्रामीण भागात 832 अशा एकूण 899 बुथवर पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 8 ते सायं. 5 या वेळात या केंद्रावर बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येईल. या लसीकरणासाठी 2152 आराग्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत

समुद्रात पोहण्यास, मासेमारीस प्रतिबंध

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13 -    वायु चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शनिवार दि.15 जून पर्यंत वादळी वारे वाहणार असून समुद्र खवळलेला असणार आहे, अशी पूर्वसूचना इंडियन कोस्ट गार्ड, मुरुड यांचेकडून जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे.   त्या अनुषंगाने मच्छिमार, पर्यटक व नागरिकांना समुद्रात पोहण्यास, मासेमारी करण्यासाठी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा.   त्यासाठी बिचेसवर आवश्यक पोलिस बंदोबस्त लावावा.   जीवरक्षक, बचाव साहित्य बीचेसवर   उपलब्ध करावे.   तसेच कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322/9763646326 या क्रमांकांवर संपर्क साधावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे यांनी जारी केल्या आहेत. 00000

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा पनवेल येथे 22 रोजी भव्य आयोजन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13 -    जिल्हा उद्योग केंद्र रायगड-अलिबाग मार्फत शनिवार दि.22 जून रोजी पिल्लई कॉलेज ऑफ   इंजिनिअरिंग नवीन पनवेल येथे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   या मेळाव्याची   माहिती अधिकाधिक लोकापर्यंत पोहचवा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी आज येथे दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रोजगार मेळाव्या संदर्भात आयोजित कार्यबल समितीच्या बैठकीत   ते बोलत होते.               यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.             यावेळी माहिती देण्यात आली   की,   या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून 10 वी, 12 वी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण ते सर्व शाखांच्या पदवी, पदविकाधारक उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.    उमेदवारांनी दि.12 ते 20 जून 2019 दरम्यान www.balasahebthackerayrojgarmelava.com या संकेतस्थळावर, मोबाईल ॲपवर किंवा 74001 55509/

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.49 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 54.54 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 14.00 मि.मि., पेण-11.00 मि.मि., मुरुड-69.00 मि.मि., पनवेल-2.20 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-8.60 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-16.00 मि.मि., रोहा-63.00 मि.मि., सुधागड-30.00 मि.मि., तळा-86.00 मि.मि., महाड-12.00मि.मि., पोलादपूर-17.00, म्हसळा-50.00मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-12.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 487.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.49 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   1.74 टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.60 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 24.06 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 1.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-2.00 मि.मि., कर्जत-2.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-12.00 मि.मि., रोहा-7.00 मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-7.00 मि.मि., महाड-1.60 मि.मि., पोलादपूर-8.00, म्हसळा-4.00मि.मि., श्रीवर्धन-4.00 मि.मि., माथेरान-2.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 57.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.60 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   0.77 टक्के इतकी आहे. 0000

दाखलपूर्व वैवाहिक वाद मध्यस्थी केंद्राचे जिल्हा न्यायालयात उद्घाटन

Image
अलिबाग, जि. रायगड दि.11(जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग या कार्यालयाकरिता दाखल पूर्व वैवाहिक वाद प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग अभय सो.वाघवसे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.             यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जयदिप माहिते, अन्य वकील वर्ग   तसेच जिल्हा न्यायालयातील कर्मचारी वर्ग   उपस्थित होते.   00000

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.11 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे   आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.             बुधवार दिनांक 12 जून रोजी सकाळी साडे आठ वा. डोंबिवली निवासस्थान येथून पनवेल, जि.रायगडकडे प्रयाण.      साडे नऊ वा. पनवेल येथे आगमन व चेतन जाधव, ॲडव्होकेट यांच्या कार्यालयाचे उद्घाटन. स्थळ : प्रांत कार्यालयाजवळ पनवेल.   साडे दहा वा. पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे आढावा बैठक.   दुपारी दोन वा पनवेल येथून पलावा डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण. 000000

किनारपट्टीलगत 14 पर्यंत सतर्कतेचा इशारा

अलिबाग, जि.रायगड, दि.11 (जिमाका) – अरबी समुद्रात लक्षदीप बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या वादळाचा केंद्रबिंदु लक्षदिप बेटाच्या उत्तर पश्चिम दिशेस 200 किमी दूर आहे. हे वादळ मुंबईपासून 840किमी दूर दक्षिण पिश्चिम दिशेने व गुजरातच्या दक्षिण पूर्व दिशेला वेरावल येथून 1020 किती अंतरावर जाणार आहे. वादळ दूर समुद्रात असले तरी या काळात समुद्र खवळलेल्या अवस्थेत राहणार आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी लगत सर्व जिल्ह्यात (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई) येत्या 14 तारखेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यता आला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच आगामी 72 तासात हे वादळ उत्तर पश्चिम दिशेला वळणार असल्याचे भाकीत वेधशाळेने वर्तविले आहे. त्या अनुषंगानेही सतर्कता व खबरदारी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. 000000

इपिलेप्सी/आकउी/अपस्मार (फेफरे/फिट) बाबत रविवारी मार्गदर्शन शिबिर

अलिबाग, जि. रायगडदि.10(जिमाका) :-   राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग व इपिलेप्सी फाऊंडेशनच्या सहकार्याने इपिलेप्सीच्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी न्युरॉलॉजिस्ट किंवा इपिलेप्टॉलॉजिस्ट (अपस्मार चिकित्सक) कडून निदान व उपचार करण्याच्या दृष्टीने रविवार दि. 16 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळा शिबिरामध्ये डॉ.निर्मल सुर्या (न्यूरोलॉजिस्ट) संस्थापक व अध्यक्ष इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई हे इपिलेप्सी आजाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 000000

श्री शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत क्रीडा प्रबोधिनींकरीता प्रवेशासाठी चाचणी

अलिबाग, जि. रायगडदि.10(जिमाका) :-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीकरीता प्रवेशासाठी चाचण्याचे आयोजन करण्यात येणार असून त्याचा सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.             सरळ प्रवेश प्रकीया :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देवून प्रवेश निश्चित केला जाईल. 1) आर्चरी 24 ते 25 जून 2019 उपस्थिती 24 जून रोजी सकाळी 10.00 वाजता. क्रीडा प्रबोधिनी अमरावती.              2) हॅण्डबॉल 24 ते 25 जून 2019 उपस्थिती 24 जून रोजी सकाळी 10.00 वाजता क्रीडा प्रबोधिनी नागपूर. 3) बॉक्सिंग 24 ते 25 जून 2019 उपस्थिती 24 जून रोजी सकाळी 10.00 वाजता क्रीडा प्रबोधिनी अकोला. 4) अथलेटिक्स, जलतरण, शुटींग, सायकलिंग, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स, कुस्ती, बॅटमिंटन   24 ते 25 जून 2019 उपस्थिती 24 जून रोजी सकाळी 10.