महाडीबीटी संगणक प्रणाली 30 जून पर्यंत पूर्ववत


अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- सन 2018-19 या शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकरच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (MAHADBT) पोर्टल दि.1 ऑक्टोबर 2018 पासून नव्याने कार्यान्वित झाली असून https://mahadbt.gov.in या संकेत स्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभा, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती,फ्रिशिप योजनांकरिता आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले आहेत.  सदर अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करण्यात येत आहेत.   महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अर्जावर जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून ऑनलाईन मान्यता देण्यात येत आहेत.
            महाडीबीटी संगणक प्रणाली सन 2018-19 मधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, अर्ज अद्ययावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करणे इत्यादी करिता महाडीबीटी संगणक प्रणाली दि.11 जूनपासून दि.30 जून पर्यंत पुन:श्च पूर्ववत सुरु झाली आहे.  सर्व महाविद्यालयस्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज दिलेल्या कालावधीत पडताळणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी.  तसेच विद्यार्थ्यांनी सन 2018-19 या वर्षातील महाडीबीटी संगणक प्रणालीमधील विद्यार्थी स्तरावरील प्रलंबित अर्ज म्हणजेच विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, अर्ज अद्ययावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज  पुढील कार्यवाहीसाठी महाविद्यालय स्तरावर पाठविण्याची कार्यवाही तात्काळ करावी.   दिलेल्या कालावधी नंतर महाविद्यालय स्तरावरील व विद्यार्थी स्तरावरील प्रलंबित अर्ज महाडीबीटी संगणक प्रणालीमध्ये प्रलंबित राहिल्यास आपोआप नामंजूर करण्यात येतील.  तसेच दिलेल्या कालमर्यादेत सदर प्रलंबित अर्जवार योग्य ती कार्यवाही करावी.
            महाविद्यालयांसाठी पुढील सुचना:आपल्या विद्यालयातील, विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी (UR,GS,SR) यांना आपल्या स्तरावरुन उपरोक्त सूचना विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना त्वरेने कळविण्याचे आवाहन  करावेत.  आपल्या स्तरावरुन सदर जाहिर आवाहन महाविद्यालयाच्या मुख्य सूचना फलक तसेच आवश्यकता असल्यास परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात यावेत.
            उपरोक्त सुचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा न झाल्यास त्याची जबाबदार सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक