Posts

Showing posts from December 24, 2017

सुधारीत: जिल्ह्यात मनाई आदेश

    अलिबाग,जि. रायगड, दि.30 (जिमाका)- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून   जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) दि. 10 जानेवारी 2018 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) चे मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रायगड अलिबाग यांनी लागू केले आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी   कळविले आहे. 00000

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प : काढणी पश्चात यंत्र सामुगी खरेदी प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 30 :- सन 2017-18 साठी काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन (पी.एच.एम.) अंतर्गत प्रकल्प कार्यक्षेत्रात रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग,पेण,माणगांव,खालापूर या चार तालुक्यात प्रकल्प राबविण्यात येणार आहे.   यामध्ये डाळ मिल,राईस मिल व काढणी पश्चात कृषिमाल प्रक्रिया यंत्र सामुग्री खरेदीसाठी यंत्र किंमतीच्या कमीत कमी 50 टक्के किंवा  जास्तीत जास्त रुपये 40 हजार (अक्षरी रु.चाळीस हजार मात्र) जी रक्कम असेल तेवढे अनुदान देण्यात येईल. संबंधित यंत्र सामुगी खरेदी प्रस्ताव प्रकल्प संचालक (आत्मा) रायगड कार्यालय, राऊतवाडी,वेश्वी नर्सरी रायगड-अलिबाग या कार्यालयात सादर करावेत. प्रस्ताव प्रथम सादर करणाऱ्यास  प्रथम प्राधान्य देण्यात येईल.  अधिक माहितीसाठी 02141-226487 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 0000

पेण अर्बन बॅंकेच्या कर्जदारांना आवाहन; एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्या

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 29 :- पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, यांचे निर्गमित परिपत्रकान्वये कर्जाची प्रभावीपणे वसुली व्हावी याकरिता पेण को ऑपरेटीव्ह अर्बन बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी शासनाने एकरकमी परतफेड योजना अमलात  आणण्याचा ठराव  दि. 22 नोव्हेंबर रोजीच्या सभेत करण्यात आला आहे. या एकरकमी परतफेड योजनेसाठी कर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी 2018 अशी आहे. या मुदतीत प्राप्त  अर्जांचा विचार करण्यात येईल. एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या शर्ती व अटीनुसार यापुढे कोणत्याही कर्जदारांस पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजनेजेचा लाभ घेता येणार नाही. तरी बँकेच्या सर्व थकीत कर्जदारांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेऊन आपली कर्जखाती बंद करावीत व तसा बेबाकी दाखला घ्यावा, असे आवाहन प्रशासक मंडळ,दि.पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. पेण यांनी केले आहे. ०००००

सहकार पुरस्कार 2016-17 साठी संस्थांकडून प्रस्ताव मागविले

अलिबाग, जि. रायगड, दि.29-   शासनातर्फे दरवर्षी सहकारी संस्थांना पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी संस्थांकडून प्रत्येक जिल्ह्यातून सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविणे, छाननी करणे, मुख्यालयास प्रस्ताव सादर करणे यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, तो याप्रमाणे-  सोमवार दि.1 जानेवारी 2018रोजी सहकार पुरस्कार कार्यक्रमास प्रसिद्धी देणे. मंगळवार दि.2 ते 16 जानेवारी सहकारी संस्थांनी आपले पुरस्कारासाठीचे प्रस्ताव  आपापल्या तालुका सहाय्यक निबंधक/ उपनिबंधक यांच्याकडे सादर करणे. बुधवार दि.17 ते शनिवार दि.20 जानेवारी तालुका सहाय्यक निबंधक/ उपनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे छाननी करुन प्रस्ताव सादर करणे , सोमवार दि.22 ते 29 जानेवारी जिल्हा उपनिबंधक समितीने छाननी करुन प्रस्ताव विभागीय सहनिबंधक यांच्याकडे सादर करणे, मंगळवार दि.30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी  विभागीय सहनिबंधक समितीने छाननी करुन प्रस्ताव सहकार आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे,  बुधवार, दि.7 ते 16 फेब्रुवारी  सहकार आयुक्त स्तरावरील समितीने प्रस्ताव छाननी करुन  शासनाकडे पाठविणे.  शनिवार दि.17 ते 26 फेब्रुवारी शासनस्तराव

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे शनिवार व रविवार दि.30 व 31  रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.             शनिवार दि.30 रोजी दुपारी साडे बारा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड येथे आगमन. दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड येथून रोहा जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता अप्पा देसाई यांचे निवासस्थान रोहा, जि.रायगड येथे आगमन. दुपारी साडे तीन वाजता रोहा येथून मुरुड जि.रायगड कडे प्रयाण. सायं. साडे पाच वाजता मुरुड येथे आगमन. रात्री आठ वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड कडे प्रयाण. रात्री साडे नऊ वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड येथे आगमन व मुक्काम.             रविवार दि. 31 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण. ०००००

राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम : ग्राहक चळवळीत जनतेचा सहभाग आवश्यक- अपर जिल्हाधिकारी शितोळे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28 - प्रत्येक व्यक्ती ही ग्रहक असते. ग्राहकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्याबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या ग्राहक चळवळीत जनतेचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये जनजागृती होऊन त्यांच्या हितांचे रक्षण होईल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी आज येथे केले.  राष्ट्रीय ग्राहक दिन 2017 निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे हे होते. यावेळी  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य श्रीकांत कुंभार, राज्य ग्राहक सल्लागार परिषदेच्या सदस्या कल्पना दस्तानी, ग्राहक संरक्षण परिषदेचे मुश्ताक घट्टे, भगवान ढेबे,  जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम दुफारे तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी श्रीकांत कुंभार यांनी  उपस्थितांना

महामार्गावरील अवजड वाहतूक बंदचे वेळापत्रक

अलिबाग, जि. रायगड, दि.28-   जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 30 ते 31 डिसेंबर व 1 जानेवारी 2018 (शनिवार ते सोमवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार या अवजड वाहतूकीचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. ते याप्रमाणे-  पर्यटक येण्याच्या वेळा गृहित धरुन हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. शनिवार दि.30 रोजी सकाळी 8 ते रात्री 10 यावेळात अवजड वाहतूक बंद. रविवार दि.31 रोजी सकाळी 8 ते रात्री 10 आणि सोमवार दि. 1जानेवारी 2018 रोजी  दुपारी 12 ते रात्री 10 यावेळात अवजड वाहतुक बंद ठेवण्यात येईल.  यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यात महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.  या वाहतुकीचे संपुर्ण नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागा

पशुसंवर्धन मंत्री ना.महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री ना.महादेव जनाकर हे शुक्रवार दि.29 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.             शुक्रवार दि.29 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता दिघोडा-कंठवली ता.उरण, जि.रायगड येथे आगमन व रासुन डॉक मत्सउद्योग सहकारी संस्थेच्या निर्यात प्रधान सुरिमी संस्करण प्रकल्पाचे उद्घाटन. सोईनुसार दिघोडे-कंठवली, ता.उरण, जि.रायगड येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. ००००० 

जिल्हा बॅंक समन्वय समिती बैठक :अर्थसहाय्य प्रकरणे 10 जानेवारीपर्यंत निकाली काढा :जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27 - शासकीय योजनांअंतर्गत स्वयंरोजगार स्थापन करु इच्छिणाऱ्या व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणाऱ्या क्षेत्राला बॅंकांनी पतपुरवठा वाढवावा. याचा संबंध थेट गरीबी निर्मुलनाशी असून याकडे बॅंक अधिकाऱ्यांनी सकारात्मकतेने पहावे. शासन योजनेंतर्गत अर्थसहाय्य प्रकरणे येत्या 10 जानेवारी पर्यंत तर स्वयंसहाय्यता बचत गटांना करावयाच्या अर्थसहाय्याची प्रकरणे 7 जानेवारी 2018 पर्यंत निकाली काढावे, असे निर्देश आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व बॅंक अधिकाऱ्यांना दिले. जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, रिजर्व बॅंकेचे बी.एम कोरी, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी भोर, नाबार्डचे एस.एस.राघवन, जिल्हा अग्रणी बॅंक मॅनेजर ए. नंदनवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती एम.एन. देवराज, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, स्टेट बॅंक ऑफ

महामार्गावरील अवजड वाहतूक 29 ते 31 डिसेंबर दरम्यान बंद : जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

अलिबाग, जि. रायगड, दि.26- रायगड जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 29 ते 31 डिसेंबर (शुक्रवार ते रविवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या. या कालावधीत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. नुकत्याच दि. 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढल्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांची तात्काळ बैठक बोलावून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सरक, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी डी.एच. पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक पी.एम. राऊळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, येत्या 29 डिसेंबर पासून पुन्हा पर्यटकांचा ओघ वाढण्य

सुधारीत वृत्त्:पनवेल येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , रायगड व   पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 29 रोजी सकाळी 10 वा. पनवेल येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,शिवाजी पुतळ्याजवळ,ओल्ड पनवेल, येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सदर कंपन्याना   10 वी , 12 वी , पदवी , पदवीधर ( उद्योजकांकडील रिक्तपदांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे.        या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.in या वेबपोर्टलला भेट देवून नोंदणी व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारीत संकेतस्थळावर आपला जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाक

पनवेल येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

       अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 :- पनवेल महापालिका व महाराष्ट्र शासनाचे   जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र , रायगड यांच्या संयुक्त विदयमाने पनवेल महापालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,शिवाजी पुतळ्याजवळ,ओल्ड पनवेल, पनवेल-410206 येथे शुक्रवार दिनांक 29/12/2017 रोजी सकाळी 10.00 वाजता बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आला आहे. सदर मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सदर कंपन्याना   10 वी , 12 वी , पदवी , पदवीधर ( सदर रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उदयोजकांकडील रिक्तपदांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे.        या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.in या वेबपोर्टलला भेट देवून नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारीत संकेतस्थळावर