सुधारीत वृत्त्:पनवेल येथे शुक्रवारी रोजगार मेळावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड व  पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 29 रोजी सकाळी 10 वा. पनवेल येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,शिवाजी पुतळ्याजवळ,ओल्ड पनवेल, येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सदर कंपन्याना  10 वी, 12 वी, पदवी, पदवीधर (उद्योजकांकडील रिक्तपदांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे.
       या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.in या वेबपोर्टलला भेट देवून नोंदणी व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारीत संकेतस्थळावर आपला जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन ROJGAR MELAVA Panvel  यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे ॲप्लाय करावे. यामध्ये काही अडचण आल्यास किंवा सहाय्यासाठी हेल्पलाईन 18602330133 किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या खालील बाजुस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline या सुविधेचा उपयोग करावा. तरी  प्रशिक्षित लाभार्थी, उमेदवार व बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची  प्रमाणपत्रे त्याच्या छायांकीत प्रतींसह वरील ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड यांनी केले आहे.      

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक