Posts

Showing posts from July 17, 2022

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग, दि.23 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.19 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.01 जून 2022 पासून आज अखेर एकूण सरासरी 1 हजार 726.49 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.             आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-7.00 मि.मी., पेण-15.00 मि.मी., मुरुड-7.00 मि.मी., पनवेल-2.40 मि.मी., उरण-3.00 मि.मी., कर्जत-28.20 मि.मी., खालापूर-9.00 मि.मी., माणगाव-8.00 मि.मी., रोहा-11.00 मि.मी., सुधागड-7.00 मि.मी., तळा-12.00 मि.मी., महाड-26.00 मि.मी., पोलादपूर-19.00 मि.मी, म्हसळा-7.00 मि.मी., श्रीवर्धन-11.00 मि.मी., माथेरान-6.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 179.00 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 11.19 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 55.67 टक्के इतकी आहे.               रायगड जिल्ह्यात मागील वर्षी दि.23 जुलै 2021 रोजी सरासरी 100.13 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच दि.01 जून पासून दि.23 जुलै 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 2 हजार 319.34 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
         अलिबाग, दि.23 (जिमाका):-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात   त्यांच्या प्रतिमेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.     यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000

महाड प्रांताधिकाऱ्यांनी दिली मौजे कातळी (कामतवाडी) आणि कोंढवी या दरडप्रवण गावांना भेट

Image
अलिबाग, दि.21 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दि.20 जुलै 2022 रोजी पोलादपूर तालुक्यातील मौजे कातळी (कामतवाडी) आणि कोंढवी या दरडप्रवण गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी दरडप्रवण भागाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना अतिवृष्टीच्या कालावधीत स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. तसेच दरडीची लक्षणे ओळखणे, आपत्ती येण्यापूर्वी सतर्क राहणे, रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट याबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितलेल्या समस्यांवर उपाययोजना कराव्यात अशा संबंधित कर्मचाऱ्यांना महाड प्रांताधिकारी श्रीमती पुदलवाड यांनी सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यावेळी पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई, मंडळ अधिकारी, तलाठी, संपर्क अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 00000

दरडप्रवण गावांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली टेहळणी आपत्ती व्यवस्थापन तयारीची झाली उजळणी..!

Image
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची अभिनव संकल्पना.. “ टेहळणी दिन ” अलिबाग, दि.21 (जिमाका):-  सध्याच्या मान्सून कालावधीमध्ये रायगड जिल्ह्याच्या दरडप्रवण भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडल्यास तात्काळ मदत पोहोचविणे, स्थलांतरीत करण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणे तसेच मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे दरडप्रवण गावांमध्ये दरड कोसळण्याची लक्षणे आढळतात किंवा कसे याची टेहळणी करण्यासाठी तसेच तेथील नागरिकांशी संपर्क साधून अतिवृष्टीच्या वेळी सतर्क राहणे व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी दि.16 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून टेहळणी दिन ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. त्यानुषंगाने उपवनसंरक्षक- रोहा, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी- माणगाव, श्रीवर्धन, रोहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तहसिलदार- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, निवासी नायब तहसिलदार- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, गटविकास अधिकारी- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा,

जिल्ह्यातील लसीकरण व “हर घर तिरंगा” उपक्रमाबाबत ऑनलाईन आढावा बैठक संपन्न

Image
  अलिबाग,दि.18(जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.18 जुलै 2022 रोजी जिल्ह्यातील लसीकरण व  “ हर घर तिरंगा ”  उपक्रमाबाबत ऑनलाईन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. केंद्र शासनाने कोविड-19 प्रिकॉशनरी डोस घेण्याचा कालावधी 09 महिन्यांवरून 06 महिने इतका करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे 18 वर्षांवरील नागरिकांसाठी दि.15 जुलै ते दि.30 सप्टेंबर 2022 असे पुढील 75 दिवस सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर प्रिकॉशनरी डोस मोफत देण्यात येणार आहे. हा प्रिकॉशन डोस घेण्यापूर्वी 18 वर्षांवरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 06 महिने किंवा 26 आठवड्याचा कालावधी पूर्ण केला असावा. त्यानुषंगाने जिल्ह्यातही विविध लसीकरण केंद्रांवर न

रोह्यातील पशूंच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल - पशुधन विकास अधिकारी डॉ.सांगळे

  अलिबाग,दि.18(जिमाका):-  रोहा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील पशुपालकांनी पशूसंवर्धन विभाग, रोहा यांच्याशी दि.17 जुलै 2022 रोजी संपर्क साधून गावातील पशू मृत पावल्याचे कळविले. ही माहिती मिळताच रोहा पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले. प्रथमदर्शी घटनास्थळी 03 पशूंचे मृतदेह निदर्शनास आले. मात्र संध्याकाळची वेळ झालेली असल्याने व पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याकारणास्तव या मृत पशूंचे शवविच्छेदन दि.18 जुलै रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पशूंच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच लक्षात येईल, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अक्षय सांगळे यांनी कळविले आहे. तसेच गावातील पशुपालकांना मार्गदर्शन करुन इतर आजारी पशूंची तात्काळ तपासणी करून त्या पशूंवर आवश्यक उपचारही करण्यात आले. मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 00000