दरडप्रवण गावांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली टेहळणी आपत्ती व्यवस्थापन तयारीची झाली उजळणी..!

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची अभिनव संकल्पना..टेहळणी दिन



अलिबाग, दि.21 (जिमाका):- सध्याच्या मान्सून कालावधीमध्ये रायगड जिल्ह्याच्या दरडप्रवण भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडल्यास तात्काळ मदत पोहोचविणे, स्थलांतरीत करण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणे तसेच मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे दरडप्रवण गावांमध्ये दरड कोसळण्याची लक्षणे आढळतात किंवा कसे याची टेहळणी करण्यासाठी तसेच तेथील नागरिकांशी संपर्क साधून अतिवृष्टीच्या वेळी सतर्क राहणे व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी दि.16 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून टेहळणी दिन ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली.




त्यानुषंगाने उपवनसंरक्षक- रोहा, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी- माणगाव, श्रीवर्धन, रोहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तहसिलदार- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, निवासी नायब तहसिलदार- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, गटविकास अधिकारी- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत- महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, उपविभागीय अभियंता- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, उपअभियंता- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, परिक्षेत्र वन अधिकारी- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, तालुका कृषी अधिकारी- महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, पाली, उपअभियंता, पाणीपुरवठा- महाड पोलादपूर, श्रीवर्धन म्हसळा, माणगाव, तळा, रोहा या जिल्हास्तरीय तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याशी समन्वय साधला. यासाठी त्यांना रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, तहसिलदार सुरेश काशिद, तहसिलदार दिप्ती देसाई, महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, महसूल व पोलीस व नगरपरिषद प्रशासनातील स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

दरडप्रवण गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देणे, तेथील नागरिकांशी संपर्क व संवाद साधणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची तसेच अन्य गोष्टींची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव त्यांच्या सोबत असल्याचा नागरिकांना विश्वास देणे, दरडप्रवण गावांच्या परिसराच्या टेहळणी दरम्यान आढळलेल्या विशेष बाबींचे निरीक्षण करून त्या बाबी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून देणे, अशा विविध जबाबदाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांना नेमून दिल्या होत्या.



त्याप्रमाणे या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी मांडले, गोंडाळे (कडवेवाडी), काळभैरव नगर (नडगाव), करंजखोल, विर, मराठवाडी (विर), टोळ बु., दासगाव (भोईवाडा), कुर्ले दंडवाडी, पातेरेवाडी (आंबिवली बु.), नातोंडी (धारेचीवाडी), करंजाडी (मस्केकोंड), मोरेवाडी (शिंगरकोंड), पांगारी (मनवेधार), रावतळी (मानेची धार), कोंडीवते (नवीन), कोंडीवते (मूळ गावठाण), चांढवे खुर्द, कोथेरी जंगमवाडी, कोथेरी (तांदळेकरवाडी), कोथेरी (मूळ गावठाण), मुठवली, सव, चोचिंदे, चोचिंदे कोंड, गोठे बु., कोसबी, सापे वामणे, सोनघर, जुई बु., लोअर तुडील (नामावले कोंड), कुंथळे, रोहन, वलंग, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, ओवळे, वराठी (बौद्धवाडी), चिंभावे (बौद्धवाडी), पिंपळकोंड, आंब्याचा कोंड, मुमुर्शी गावठाण, मुमुर्शी (बौद्धवाडी), तळोशी, खर्डी, हिरकणीवाडी, परडीवाडी (गोठण), सांदोशी, हेटकर कोंड (सांदोशी), पाचाडवाडी, पुनाडेवाडी, नानेमाची / नानावाडी / वाकी बु., आड्राई, वाघेरी (आदिवासीवाडी), वाळण बु., झोळीचा कोंड, केतकीचा कोंड, वेरखोले (बिरवाडी), शेलटोली, पिंपळवाडी-शेडगेवाडी, दुधाणेवाडी, जोगळेवाडी, रुपवली-बौद्धवाडी, सुंभेकोंड, निगडे खोतवाडी, मोहोत (सुतारवाडी व भिसेवाडी), खरवली (बौद्धवाडी), भिवघर, आंबेनळी (आंबेशिवथर), बारसगाव, तळीये, माझेरी, पारमाचीवाडी, वरंध (पोकळेवाडी- कुंभारकोंड), वरंध (बौद्धवाडी), माटवण, हावरे, कालवली भोसलेवाडी, लोहारे, पाले, सडवली, धामणदिवी, चरई, बोरावळे कोंडवेकोंड, मोरसडे आडाचाकोंड, मोरसडे बालमाची, मोरसडे सडेकोंड, मोरसडे दिवाळवाडी, कुडपण बु., कुडपण खु., परसुले, चांदके, खोपड, ढवळे आदिवासीवाडी, नानेघोळ कडूवाडी व कदमवाडी, नानेघोळ गावठाण, नानेघोळ बाबरवाडी, साखर चव्हाणवाडी, साखर सुतारवाडी, साखर पेठेवाडी, गोवेले गावठाण, केवनाळे आंबेमाची, रानकडसरी चिरेखिंड, वाकण मुरावाडी, किनेश्वर, किनेश्वर पेठेवाडी, किनेश्वर शिववाडी, भोगाव येलंगेवाडी, कातळी कामतवाडी, कोंढवी, कापडे खु. रयतळवाडी, कापडे कुंभळवणे, कापडे खु. कोसमवाडी, कामथे, कामथे फौजदारवाडी, चिखली, वदघर सोनारवाडी, तुटवली, ओंबळी, कोतवाल खु. लहुळसे, रानकडसरी, दाभोळ, महाळुंगे, वाकण धामणीचीवाडी, चांभारगणी खू., हळदुळे, केवनाळे, चांदले, खांडज, नावाळे, बोरघर महादेवाचा मुरा, आडावळे बु., तुर्भेकोंड या दरडप्रवण गावांना भेट दिली.

या अधिकाऱ्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांना दरडीची पूर्व लक्षणे, घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून अतिवृष्टीच्या काळात सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांना जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या तयारीची, उपलब्ध साहित्य सामुग्रीविषयीची माहिती दिली. तसेच त्यांच्याशी चर्चा करीत, त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबतची कार्यवाही देखील तात्काळ सुरु केली.

या टेहळणी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी पोलादपूर तालुक्यातील मौजे कुडपण, भोगाव (येलंगेवाडी) आणि कोंढवी या दरडप्रवण गावांना भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यांनी मौजे तळीये येथे भेट देऊन दरडग्रस्त गावाचे पुनर्वसन होत असलेल्या कामाची पाहणी करून तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

जिल्हा व स्थानिक प्रशासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी नागरिकांची सुरक्षितता व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सदैव दक्ष आहेत, ग्रामस्थांनी अतिवृष्टीच्या काळात स्वत:ची काळजी घ्यावी, प्रशासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे व कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी स्थानिक प्रशासनाशी तात्काळ साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यावतीने या दरडप्रवण भागात टेहळणी दिनानिमित्त टेहळणी केलेल्या अधिकाऱ्यांनी येथील ग्रामस्थांना केले.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड