Posts

Showing posts from December 10, 2017

सधन कुक्कुट विकास गटातून कुक्कूटपालनाला चालना

रायगड जिल्ह्यातील एकूण 15 सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी  सन 2018-19 पासून टप्या टप्याने स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.  या योजने अंतर्गत खालीलप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 1) जमीन- 2500 चौ.फुट (1000 चौ.फुटाचे 2 शेड) खाद्य, अंडीसाठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र्य खोल्या. जमीन व खोल्या लार्भीच्या स्वत:च्या मालकीच्या असतील. 2) प्रति 1000 चौ.फुटाच्या 2 पक्षीगृहाचे बांधकाम,स्टोअर रुम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण सहभाग शासन व लाभार्थी  एकूण अंदाजित किंमत चार लाख रुपये. 3) खाद्य व पाण्याची भांडी, ब्रडर, इतर उपकरणे व लसीकरण, सहभाग शासन व लाभार्थी  एकूण अंदाजित किंमत पन्नास हजार रुपये. 4) अंडी ऊबवणूक यंत्र(mini setter cum hatcher) सहभाग शासन व लाभार्थी  एकूण अंदाजित किंमत एक लाख 80 हजार रुपये. 5) 1000 एकदिवसीय मिश्र (नर + मादी) पिले प्रति पक्षी रु.60/- सहभाग शासन व लाभार्थी  एकूण अंदाजित किंमत साठ हजार रुपये. 6) 20 आठवड्यांची अंड्यावरील 500 पक्षी (नर + मादी) प्रती पक्षी रु.150/- सहभाग शास

वाहन योग्यता तपासणीसाठी ऑनलाईन अपॉईन्मेंट

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17:- ज्या वाहन धारकांना आपल्या वाहन योग्यतेसंदर्भात तपासणी करुन वाहन योग्यता प्रमाणपत्र घ्यावयाचे असते अशा वाहनधारकांच्या वेळेत बचत व्हावी व त्यांना योग्य सुविधा मिळावी यासाठी परिवहन विभागाने ऑनलाईन अपॉईन्मेंट घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या वाहनधारकांनी आपली वेळ निश्चित करुन वाहन व कागदपत्रांसह तपासणीसाठी हजर रहायचे आहे. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल परिवहन यांनी कळविले आहे की,   उच्च न्यायालयाच्या 18 फेब्रुवारी 2016 व त्यानंतर वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशान्वये परिवहन वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी याबाबतच्या कार्यपध्दती बाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वेळोवळी निर्देश जारी केलेले आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहन धारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात योग्य प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी एनआयसी ने विकसीत केलेल्या Vhan-4.0 या संगणक प्रणालीवरील https://parivahan.gov.in या वेब साईटवर अपॉईटमेंट

यशकथा :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : पुन्हा जोमाने शेतीकडे….

Image
अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका)-   न फेडलेल्या कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतकरी मंगेश पाटील हे आपल्या शेतीत राबत होते. निसर्गाची अवकृपा, त्यामुळे तोंडचा घास हिरावून घेतला जात होता. शेती करण्यासाठीचे मनोबल संपले होते. परंतू शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे डोक्यावरच कर्जाचं ओझं उतरलं आणि आता पुन्हा नव्या जोमाने पावले शेतीकडे वळली, हे मनोगत आहे शेतकरी कार्ले येथील शेतकरी मंगेश पाटील यांचे. मंगेश पाटील यांनी शेतीच्या कामासाठी  जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून कर्ज घेतलं. कर्जाचे हप्ते फेडण्याचे प्रयत्न सुरु होते. पण खराब हवामान, अवकाळी पाऊस यामुळे पिकाचं नुकसान होत होतं. बँकेकडून  घेतलेलं कर्ज फेडण्याची आर्थिक समस्या निर्माण झाली. झालेल्या नुकसानीमुळे  कुटूंबावर आर्थिक संकट ओढावले, अशा वेळी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे जिल्ह्यातील 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख  9 हजार 846 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यातील मंगेश पाटील हे एक. आज त्यांचे कुटूंब कर्जमाफीमुळे पुन्हा शेती करण्यास सज्ज झालं आहे. कार्ले

मतदार जागृतीसाठी निवडणूक साक्षरता क्लब :जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात होणार स्थापना

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-   निवडणूक विषयक साक्षरता वाढविण्यासाठी, मतदारांमध्ये मतदान विषयक जागृती निर्माण करुन  स्वंयप्रेरणेने होणारे मतदान वाढविण्यासाठी व निवडणूक प्रक्रियेविषयी जनमानसात माहिती पोहोचविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.   या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक साक्षरता जिल्हा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नव मतदारांमध्ये निवडणूक व मतदान या विषयी जागृती व्हावी यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 30 टक्के शाळा व 30 टक्के महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या-त्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाईल. हे शिक्षक त्यांच्या महाविद्यालयातील नव मतदारांना मतदार नाव नोंदणी, मतदान ओळखपत्र, निवडणूक विषयक विविध अर्ज, त्यांचे प्रयोजन इ. बाबत मार्गदर्शन करतील. तसेच शाळां

प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-   दैनंदिन व्यवहारामध्ये प्लास्टीक पिशवीचा (कॅरी बॅग) वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा. नागरीकांनी हि जागरुकता ठेवल्यामुळे प्लास्टिक कॅरी बॅग मुळे निर्माण होणाऱ्या   प्रदूषणास आळा बसेल,   असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.   रायगड जिल्हा महिला बचत गट सक्षमीकरण फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या कापडी पिशवीच्या स्टॉलचे उद्घघाटन प्रसंगी   ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्लास्टीक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा.   एकदा निर्माण झालेले प्लास्टीक हे कधीच नष्ट होत नाही.  ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात जाऊन ते जलचर व अन्य प्राण्यांच्या खाण्यात येतात. त्यामुळे प्राण्यांना त्रास होतो.     प्लास्टीक कचरा ही आज सार्वत्रिक समस्या आहे.  हा कचरा  आपल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये अडकून राहतो.  त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पावसाळ्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण हो

स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प :विभागीय कृषि सहसंचालकांची वरसई येथे भेट

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प अंतर्गत वनराई शेतकरी उत्पादक कंपनी, वरसई येथे विभागीय कृषि सहसंचालक विकास पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कंपनीस उत्पादित भाजीपाला संकलन व विक्री करण्यासाठी व्हॅन प्रदान करण्यात आली. जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प सन 2013-14 पासून जिल्ह्यामधील अलिबाग, पेण, खालापूर व माणगांव या चार तालुक्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी गटांची निर्मिती करणे व त्यांचे शेतकरी उत्पादक कंपनीत रुपांतरीत करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आजतागायत 10 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. एम.ए.सी.पी.  अंतर्गत मंजूर व्यवसाय विकास आराखड्यानुसार वनराई शेतकरी उत्पादक कंपनी वरसई ता.पेण या कंपनीच्या संचालकांना विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग ठाणे विकास पाटील यांचे हस्ते भाजीपाला संकलन व थेट विक्रीसाठी व्हॅन देण्यात आली. यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) मंगेश डावरे, प्रकल्प संचालक (आत्मा-2) डी.एस.चव्हाण, तालुका कृषि अधिकारी, पेण,एस.आर.निंबाळकर, तंत्र अधिकारी, ठाणे श्री.ठमके, कृषि प

आंबा मोहोर संरक्षणासाठी 'हॉर्टसॅप' :वेळापत्रकानुसार फवारणी करण्याचे आवाहन

           अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 16 :- कोकणातील आंबा हे महत्त्वाचे फळ पिक.  या पिकावर सध्या  हवामानातील बदलांमुळे किड रोगांची शक्यता लक्षात घेता आंबा पिक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अर्थात 'हॉर्ट सॅप'  राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पामार्फत प्राप्त सुचनांनुसार शेतकऱ्यांसाठी आंबा पिक फवारणीसाठी वेळापत्रक दिले असून त्यानुसार दिलेल्या औषधांची फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकाऱ्यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत 1 डिसेंबर पासून आंबा पिक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाद्वारे नियमित निरिक्षणे घेऊन किड व रोगाच्या नियंत्रणासाठी सल्ला देण्याचे काम करण्यात येत आहे. दिवसेंदिवस हवामानामध्ये होणार अचानक बदल ह्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण व कोंदट हवामान राहिल्यास आंबा पिकावरील तुडतुडे किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढ होत असते.मोहोरावरील तुडतुडे मोहोरातील कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर गळून पडतात. याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात ह्याला स्थानिक भाषेत चिकट्या किंवा गोड्

राष्ट्रीय आरोग्य अभियान त्रैमासिक सभा :रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ त्वरीत द्या- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-   शासकीय रुग्णालयातून अनेक रुग्ण उपचार घेत असतात. यातील एचआयव्ही बाधीत, क्षयरुग्ण अशा विशिष्ट रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार या रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ त्वरीत मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे (दि.15 रोजी) दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली माळरान कृषी पर्यटन केंद्र, मु. राजमाळ, अलिबाग रेवसरोड पो. थळ ता. अलिबाग,  राश्ट्रीय आरोग्य अभियान,  जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, एचआयव्ही टीबी  समन्वय समितीची  त्रैमासिक बैठक घेण्यात आली.  या बैठकीस , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी एआरटी डॉ. पांडुरंग शिंदे ,   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. कोकरे, तालुका आरोग्य अधिकारी मुरुड डॉ. चंद्रकांत जगताप, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेख रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड इ   रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम संपदा मळेकर, आधार

आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी 'मिशन कायापालट' :आरोग्यकेंद्रनिहाय कृति आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी

Image
  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-   जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाकरीता 'मिशन कायापालट' राबविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज व्हावे. प्रत्येक आरोग्य केंद्र हे 'माझा दवाखाना' या  विचाराने सुसज्ज करावा. त्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या आरोग्य केंद्रनिहाय कृति आराखडा तयार करावा, असे सुस्पष्ट निर्देश  'कायापालट मॅन' जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (दि.15 रोजी) येथे दिले.    जिल्ह्यात मिशन कायापालट राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेची पुर्वतयारी बैठक शुक्रवारी माळरान कृषि पर्यटन केंद्र, राजमाळ येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी एआरटी डॉ. पांडुरंग शिंदे ,   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. कोकरे, तालुका आरोग्य अधिकारी मुरुड डॉ. चंद्रकांत जगताप, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेख रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड इ   रश्मी सुंक

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजन:आर्थिक संकटातून झाली कुटूंबाची मुक्तता

Image
अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका)-   शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून कर्ज घेतलं. फेडण्याचे प्रयत्न सुरु होते. पण अतिवृष्टीमुळे शेताची केलेली बांधबंदिस्तीही वाहून गेली. पिकाचं नुकसान झालं. सोसायटीचं घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी समस्या निर्माण झाली. कर्जाच्या बोजामुळे कुटूंबावर आर्थिक संकट ओढवल्याची परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळी शासन मदतीला धावून आलं, कर्जमाफी झाली आणि  शासनाच्या निर्णयामुळे संपुर्ण कुटूंबाची आर्थिक संकटातून मुक्तता झाली. हे भावोद्गार आहेत, सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांचे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे जिल्ह्यातील 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख  9 हजार 846 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यातील मधुकर पाटील हे एक. आज त्यांचे कुटूंब कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थैर्याचा मोकळा श्वास घेत आहे. अलिबाग सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी त्यांच्या 1 एकर शेतीमध्ये ओम-3 व जया ही भाताची बियाणे पेरली होती.  शेताच्या बांधबंदिस्ती करण्यासाठी त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या हाशिवरे शाखेतून सन 2015-16

केंद्रीय मंत्री ना. अनंत गीते यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:-   केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते   हे दि.15 डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम.   शुक्रवार दि. 15 रोजी रात्री साडेनऊ वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे जि.रायगड येथे आगमन मुक्काम.   शनिवार दि.16 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे जि.रायगड येथून रोहाकडे प्रयाण.   सकाळी पावणे अकरा वाजता रोहा येथे आगमन व सायंकाळी सहा वाजता रोहा येथून मुंबईकडे प्रयाण. 0000 ०

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:-   क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगडद्वारा देण्यात येणाऱ्या   जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. येत्या 2 जानेवारी 2018 पर्यंत हे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालयात पाठवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात सन 2002 पासून हा पुरस्कार देण्यात येतो.    जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा संघटक,कार्यकर्ता यांना हा पुरस्कार 26 जानेवारी 2018 रोजी देण्यात येणार आहे.   सन 2017-18 च्या पुरस्कार वितरणासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले आहे. पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह आणि रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.   पुरस्काराकरिता   30 जून 2017 पर्यंतची कामगिरी,कार्य ग्राह्य धरले जाईल.        पुरस्कारासाठीचे निकष याप्रमाणे- गुणवंत खेळाडू :   या पुरस्कराअंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळा

जलयुक्त शिवार अभियान :113 गावांच्या आराखड्यास तत्वतः मान्यता

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी सन 2017-18 करीता 113 गावांच्या प्राथमिक आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. यात  लोकसहभागातून कामे करावयाची कर्जत तालुक्यातील 7 गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील 9 गावे व  तालुकास्तरीय समितीने निवडलेली 41 तसेच ग्राम सामाजिक परीवर्तन अभियानांतर्गत 56 अशा एकुण 113 गावांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात (दि. 13 रोजी) पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके,  आत्मा प्रकल्प संचालक     उपवनसंरक्षक मनिषकुमार,  उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती जैतू तसेच  कृषि विभाग, वन विभाग, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग या विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्ग

राष्ट्रीय लोकअदालतीत 3185 प्रकरणे निकाली

अलिबाग,(जिमाका)दि.12- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाराष्ट्रातील उच्च न्यायालये व खंडपीठे, सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, इतर सर्व न्यायालये व न्यायाधिकरणे येथे   शनिवार दि.9 रोजी 'राष्ट्रीय लोक अदालत' आयोजित करण्यात आली.  या लोकअदालतीत 3185 प्रकरणे  तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यात  भूसंपादनाची 258 प्रकरणे होती, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे. या लोक अदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा सदस्य सचिव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एल.डी.हुली, डी.आर.देशपांडे,दिवाणी न्यायाधीश व. स्तर पनवेल यांचे व जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, इन्श्युरन्स् कंपन्या,बँका  आणि   वकील वर्ग उपस्थित होते.   लोक अदालतीत   जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघण्याच्या दृष्टीने सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या   लोकअदालतमध्ये प्रलंबित प्रकरणांमध्ये 1406 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यापैक

जिल्ह्यात 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख रुपयांची कर्जमुक्ती

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अलिबाग,(जिमाका)दि.12- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख  9 हजार 846 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 934 शेतकरी हे कर्जमाफी अंतर्गत तर 10 हजार  शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तो शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ( कर्जमाफी) व बचत खात्यात  ( प्रोत्साहनपर) वर्ग करण्यात आला आहे.             यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत प्राप्त माहिती अशी की,  शासनाकडून प्राप्त ग्रीन यादीनुसार, जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत  कर्ज घेतलेले 54 शेतकरी होते.  या शेतकऱ्यांना एकूण 27 लाख 14 हजार 544 रुपयांचे कर्ज देण्यात आले होते, जे थकीत होते.  तर नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ द्यायचा होता अशा शेतकऱ्यांची संख्या 9723 इतकी असून त्यांना द्यावयाच्या लाभाची रक्कम  13 कोटी 53 लाख 13 हजार 302 रुपये इतकी आहे.  रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत एकूण 9777 शेतकऱ्यांना 13 कोटी  80 लाख 27 हजार