वाहन योग्यता तपासणीसाठी ऑनलाईन अपॉईन्मेंट


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17:- ज्या वाहन धारकांना आपल्या वाहन योग्यतेसंदर्भात तपासणी करुन वाहन योग्यता प्रमाणपत्र घ्यावयाचे असते अशा वाहनधारकांच्या वेळेत बचत व्हावी व त्यांना योग्य सुविधा मिळावी यासाठी परिवहन विभागाने ऑनलाईन अपॉईन्मेंट घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या वाहनधारकांनी आपली वेळ निश्चित करुन वाहन व कागदपत्रांसह तपासणीसाठी हजर रहायचे आहे.
यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल परिवहन यांनी कळविले आहे की,  उच्च न्यायालयाच्या 18 फेब्रुवारी 2016 व त्यानंतर वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशान्वये परिवहन वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी याबाबतच्या कार्यपध्दती बाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वेळोवळी निर्देश जारी केलेले आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहन धारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात योग्य प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी एनआयसी ने विकसीत केलेल्या Vhan-4.0 या संगणक प्रणालीवरील https://parivahan.gov.in या वेब साईटवर अपॉईटमेंट घेण्याची सुविधा 12 डिसेंबर पासून उपलब्ध करुन दिलेली आहे.
योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करावयाचे आहे. त्या वाहनासाठी संगणक प्रणालीवरील https://parivhan.gov.in या वेब साईटवर अपॉईटमेंट घेऊन ज्या दिवशीची अपॉईटमेंट मिळालेली आहे. त्या दिवशी आपले वाहन सर्व वैध कागदपत्रांसह तपासणीसाठी सादर करावे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक