Posts

Showing posts from September 24, 2023

जिल्ह्यात दि.1 ऑक्टोंबर रोजी श्रमदान मोहीम नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे

  रायगड दि.26 (जिमाका) :  केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.1 ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम राबवून महात्मा गांधीजींना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. श्रमदान मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यात गावागावात सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, मंदिरे, बाजार, बस स्थानक, समुद्रकिनारे, नदी किनारी, तलाव ठिकाणी तसेच इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेसाठी जागा निवडतील. ही सर्व ठिकाणे नकाशावर उपलब्ध असतील,

मतदान केंद्र सुसुत्रीकरण, पुनर्रचनेबाबत 7 दिवसात सूचना, हरकती नोंदवाव्यात --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

Image
  रायगड दि.26 (जिमाका) :  1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जिल्ह्यातील  एकूण 7 विधानसभा मतदारसंघांत राबविण्यात येत आहे. पूर्वपुनरीक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून  22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनादेखील करण्यात येत आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सूचना द्यावयाची असल्यास या कार्यालयास सूचना, आक्षेप किंवा हरकत असल्यास पुढील 7 दिवसांच्या आत त्या नोंदविण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.      जिल्ह्यातील एकूण 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्रांच्या स्थानातील बदलाचे, विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील 1500 मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सु

लोकशाही दिन दि.3 ऑक्टोबरला

रायगड,दि.25(जिमाका):   लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्त् रीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु माहे ऑक्टोबर 2023 मधील पहिल्या सोमवारी दि.02 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार दि.03 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकरी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केला आहे. असे विठ्ठल इनामदार,उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

  रायगड,दि.25(जिमाका) :   मा. भारत निवडणूक आयोग तसेच मा. मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी  पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यासाठी 1 नोव्हेंबर, 2023  या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे, या कार्यक्रमाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मा. भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघातील मतदारयादया नव्याने तयार करण्याबाबतचा घोषित केलेला कार्यक्रम खालीलप्रमाणे - पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधी :- मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करणे- दि. 30 सप्टेंबर, 2023 (शनिवार). मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी-दि.16 ऑक्टोबर, 2023 (सोमवार). मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिद्धी- दि. 25 ऑक्टोबर, 2023 (बुधवार), नमुना 18 व्दारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख- दि.6 नोव्हेंबर, 2023 (सोमवा

भाडे तत्वावरील गस्ती नौकेसाठी निविदा सादर 27 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

    रायगड,दि.25(जिमाका) :  महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी गस्ती नौका भाडेतत्वावर घेण्याबाबत मुख्य कार्यालयीन स्तरावर ई- निविदा प्रक्रिया सुरु आहे.  गस्तीकामी नौका उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या नौका मालकांनी 20 सप्टेंबरपूर्वी निविदा 2 लिफाफा (2 बिड) पद्धतीने आवश्यक त्या कागदपत्रासह या कार्यालयास सादर करावे, असे कळविण्यात आले होते. या निविदा सादर करण्यास दि.27 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुक असलेल्या नौका मालकांनी 27 सप्टेंबर 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत निविदा 2 लिफाफा (2 बिड) पद्धतीने आवश्यक त्या कागदपत्रासह या कार्यालयास सादर करावे, आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) संजय पाटील यांनी केले आहे.  सदरील नौका गस्तीकामी उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित नौकामालक यांच्यामार्फत खालील अटी-शर्तींची पुर्तता होणे आवश्यक आहे. कृपया याची नोंद घ्यावी. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा)अध्यादेश, 2021 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भाडयाने घ्यावयाच

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

    रायगड25 (जिमाका)दि.:- पंडीत  दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.      यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे मॅनेजर श्री.कुलकर्णी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.