भाडे तत्वावरील गस्ती नौकेसाठी निविदा सादर 27 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 

 

रायगड,दि.25(जिमाका) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी गस्ती नौका भाडेतत्वावर घेण्याबाबत मुख्य कार्यालयीन स्तरावर ई- निविदा प्रक्रिया सुरु आहे.  गस्तीकामी नौका उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या नौका मालकांनी 20 सप्टेंबरपूर्वी निविदा 2 लिफाफा (2 बिड) पद्धतीने आवश्यक त्या कागदपत्रासह या कार्यालयास सादर करावे, असे कळविण्यात आले होते.

या निविदा सादर करण्यास दि.27 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुक असलेल्या नौका मालकांनी 27 सप्टेंबर 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत निविदा 2 लिफाफा (2 बिड) पद्धतीने आवश्यक त्या कागदपत्रासह या कार्यालयास सादर करावे, आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) संजय पाटील यांनी केले आहे.

 सदरील नौका गस्तीकामी उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित नौकामालक यांच्यामार्फत खालील अटी-शर्तींची पुर्तता होणे आवश्यक आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा)अध्यादेश, 2021 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भाडयाने घ्यावयाच्या गस्ती नौकांच्या अटी शर्ती व तांत्रिक तपशील खालीलप्रमाणे:

यांत्रिक स्वरुपाची नौका असावी.  नौका Merchant Shipping Act, 1958 अंतर्गत नोंदणीकृत असलेली व सागरी कायद्याच्याअटी शर्तीची पुर्तता केलेली असावी.यांत्रिक नौकेची इंजिन क्षमता राज्याच्या जलधी क्षेत्रात गस्त घालण्यासाठी सक्षम असावी. यांत्रिक नौकेवर एकावेळी किमान 8 ते 10 व्यक्ती बसतील अशी बैठक सुविधा असणारी किमान 3.04 x 2.13 x1.82 मी. (लांबी x रुंदी x उंची) आकाराची केबिन असावी. यांत्रिक नौकेवर सर्व सोयीनी युक्त शौचालय व अल्पोपहारासाठी व चहापाणी करण्यासाठी जागा असावी. याचबरोबर नौकेवर प्रथमोपचार पेटी असावी. नौकेवर विद्युत दिवे, सर्च लाईट, सिग्नल, इशाऱ्यासाठी भोंगे, Marine & Night vision Binoculars ही यंत्रसामुग्री असावी. नौकावर नौकानयनासाठी संभाषणाची अद्यावत यंत्रसामुग्री जसे की वॉकी टॉकी (Two way. communication V. HF) असावे. तसेच गस्ती दरम्यान गस्ती नौकेची स्थिती दर्शविणारी ग्लोबल पोझीशनींग सिस्टीम (G.P.S.) Automatic Identification System - Vessel Tracking System (AIS-VTS) सी.सी.टी. को (CCTV), बसविलेले असावे. गस्ती नौकेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लाईफ बोयीज लाईफ जॅकेट, अग्निशामक उपकरणे, वाळूने भरलेल्या दोन बादल्या असाव्यात.यांत्रिक नौका समुद्रात गस्तीसाठी सक्षम असल्याचे, सक्षम अधिकाऱ्यांचे विधीग्राह्य प्रमाणपत्र (Seaworthiness Certificate) असणे आवश्यक राहील (Merchant Shipping Act. 1958 नुसार) (निविदेच्या दिनांकास विधीग्राह्य असलेले).

 गस्ती नौकेस महिन्यातून स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टीचा दिवस अथवा रविवार या दोहोपेको एक दिवस सुट्टी वगळून बाकी सर्व दिवस गस्त घालावी लागेल, सुट्टीच्या दिवशी भाडे देय असणार नाही. यांत्रिक नौकेस सागरी गस्तीचे काम महिन्यातून किमान 25 दिवस (आवश्यकतेनुसार 30दिवस) राहील. तसेच आवश्यकतेनुसार रात्रीसुध्दा व इतर सागरी जिल्ह्यात गस्त घालावी लागेल. सागरी गस्तीचे काम एका दिवसांत किमान आठ तास व महिन्यातून किमान 25 दिवस (आवश्यकतेनुसार 30 दिवस राहील.गस्ती नौकेने दररोज किमान 50 नॉटिकल माइल अंतर करणे बंधनकारक असेल व त्याबाबतची नोंद ठेवणे आवश्यक राहील. त्यानुसारच गस्ती नौकेचे देय भाडे अनुज्ञेय असेल. यांत्रिक नौकेने नमूद केलेल्या किमान निकषांपेक्षा कमी तास व कमी नॉटिकल मैल अंतर कापल्यास त्या दिवसाचे / कालावधीचे देय ठरलेल्या दराच्या केवळ 50 टक्के भाडे देय राहील. (अर्धा दिवस ग्राह्य धरण्यात येईल) भाडयाने घेण्यात आलेल्या नौका आवश्यतेप्रमाणे विभागास उपलब्ध राहतील व सुस्थितीत राहतील याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील.

 सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत नौकेस मासेमारी परवाना तसेच नौका व खलाश्यांचे विमा संरक्षण असण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची राहील. गस्ती नौकेवर आवश्यक असणाऱ्या सुविधा, इंधन खर्च, नौका दुरुस्ती व इंजिन दुरुस्ती या सारखे खर्च तसेच आवश्यकतेप्रमाणे तांडेल, खलाशी यांचे भोजन, चहापाणी व वेतन इत्यादी व्यवस्था नौका मालक/ कंत्राटदार यांनी करावयाची आहे. भाड्याने दिलेली गस्ती नौका नादुरुस्त किंवा अपघातग्रस्त झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहणार नाही. तसेच गस्तीसाठी पर्यायी नौका देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील. गस्ती नौकेचे भाडे अदा करण्यास विलंब झाल्यास व्याजाच्या रकमेची मागणी करता येणार नाही. निविदा मंजूर झालेल्या नौका मालकास गस्ती नौकेच्या भाडेपट्टीबाबतचे करारपत्र करुन द्यावे लागेल. राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त नौकामालक देखील अर्ज करु शकतील. भाडयाने घेतलेल्या नौकेला गस्ती व्यतिरिक्त कोणतेही काम करता येणार नाही (मासेमारी करता येणार नाही).

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक