Posts

Showing posts from August 4, 2019

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.09 -    : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी , अशा सूचना राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी आज पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित अतिवृष्टी व पूरपरिस्थिती आढावा बैठकीत दिल्या. यावेळी आ.प्रशांत ठाकूर, माजी आ.रविशेठ पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी महाड विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी  आदि उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागात पाणी साचल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, आर्मी

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 21 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.09 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3371.83 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-5.00 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-2.60 मि.मि., उरण-1.00 मि.मि., कर्जत-18.40 मि.मि., खालापूर-90.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-35.00 मि.मि., तळा-16.00 मि.मि., महाड-20.00मि.मि., पोलादपूर-40.00, म्हसळा-17.00मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-34.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 347.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 21.69 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   107.29 टक्के इतकी आहे.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग दि.8 ऑगस्ट- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. पलावा, डोंबिवली निवासस्थान येथून वाहनाने उरण जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. उरण येथे आगमन व चिरनेर येथील नाला काँक्रीटीकरण कामांचे उद्घाटन स्थळ :- चिरनेर उरण जि.रायगड. सकाळी 10.30 वा. पक्ष प्रवेश कार्यक्रम. स्थळ :- पी.पी.खारपाटील हायस्कूल, चिरनेर-उरण जि.रायगड. दुपारी 12 ते 12.45 वा.राखीव. दुपारी 12.45 वा. उरण येथून कर्जत जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. कर्जत येथे आगमन व औषधी वनस्पती लागवड व जागृती अभियान कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कृषी संशोधन केंद्र कर्जत, जि.रायगड. दुपारी 2.30 वा. कर्जत येथून जांबरुंग ता.कर्जत जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. जांबरुंग येथे आगमन व पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :- जांबरुंग ता.कर्जत, जि.रायगड. दुपारी 4.30 वा. जांबरुंग येथून वांजळे, ता.कर्जत जि.रायगडकडे प्रयाण. सायं. 5 वा. वांजळे येथे आगमन व श्री किरण ठाकरे यांच्या कार्यालय

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री रविंद्र चव्हाण

अलिबाग दि.8 ऑगस्ट- रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जिल्ह्यात शेतपिकांचे, जमिनीचे, बांधबंधिस्ती, घरांचे झालेले नुकसान, रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच गोठ्यांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. मोठी, लहान दुधाळ, ओढकाम करणारी जनवारे इत्यादींचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना वेळेत अनुदान देणे गरजेचे असल्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अनुदान देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना दिले आहेत. 00000

हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.08-   उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेची तालुकास्तरीय कार्यशाळा भाग्यलक्ष्मी हॉल चेंढरे अलिबाग येथे संप्पन्न झाली. या कार्यशाळेला आमदार सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, अलिबाग पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, तहसिलदार अलिबाग सचिन शेजाल, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड-अलिबाग प्रकाश देवऋषी, सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता अलिबाग एस.जी.पवार, गटविकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग गणेश वाडेकर, जिल्हा समन्वयक श्रीम.उज्वला भोसले, श्रीम.एस.बी.पाटील आदि उपस्थित होते. हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना जिल्ह्यातील बचत गटांच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणार असून योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहेत.   या समितीद्वारे प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करुन त्यातून बचत गटांची निवड करण्यात येणार आहे.   त्यानंतर तालुकास्तरीय निवड झालेल्या ब

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 36 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.08 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 36.71 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3350.14 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 11.00 मि.मि., पेण-20.20 मि.मि., मुरुड-20.00 मि.मि., पनवेल-10.00 मि.मि., उरण-26.00 मि.मि., कर्जत-37.20 मि.मि., खालापूर-26.00 मि.मि., माणगांव-45.00 मि.मि., रोहा-31.00 मि.मि., सुधागड-97.00 मि.मि., तळा-41.00 मि.मि., महाड-78.00मि.मि., पोलादपूर-84.00, म्हसळा-25.00मि.मि., श्रीवर्धन-13.00 मि.मि., माथेरान-23.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 587.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 36.71 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   106.60 टक्के इतकी आहे. 0000

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कमिटी आढावा बैठक संपन्न

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 07-   जिल्ह्याधिकारी रायगड डॉ.   विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली    आज जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कमिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड - अलिबाग या विभागाची   त्रैमासिक आढावा बैठक घेण्यात आली.                      यावेळी    ओएनजीसी कंपनी, उरण   प्लॅन्ट   यांच्याकडून पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याचे अनावरण करण्यात आले व   जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कमिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड - अलिबाग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी   श्री. नरेंद्र असीजा,   ED-Plant Manager,   श्री. जॉर्ज केरकेट्टा,   GM-I/C HR ER,   श्री. भूपेंद्र श्रुंगी   ,   GM-Instrumentation,   श्री. प्रभाकर कुमार,   Manager(HR),   श्री. गौरव पतंगे,   Sr. HR Executive-CSR.   इक्बाल शेख   उपस्थित होते.                          ओएनजीसी उरण   प्लॅन्ट   या कंपनी ने त्याच्या    सीएसआर फंडामधून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक   आयसीटीसी केंद्राकरिता अत्यंत आवश्यक असणारे   लॅब इक्विपमेंट यामध्ये   LG   LED   टी व्ही,   ३२ GB   पेनड्राईव्ह,   टीओआर/रेफ्रिजरेटर,    से

राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठक खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी ---जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.07-   कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव दि.02 सप्टेंबर पासून सुरु होत आहे.   गणेशोत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून नागरिक येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित राष्ट्रीय महामार्ग 66 च्या झालेल्या दुरुस्तीबाबत आढावा बैठकीत ते अधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी पेण श्रीमती प्रतिमा पुदलवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, राष्ट्रीय महामार्ग पनवेल प्रबंधक अभिषेक अग्रवाल, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पेण रत्नाकर बामणे, शाखा अभियंता,रा.म.विभाग पेण रुपेश सिंगासने, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण संजय उदावत, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, वाहतूक पोलीस विभागाचे सुरेश वार्डे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी,कर्मचारी आदि उपस्थि

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 100 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.07 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 100.29 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3313.43 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 14.00 मि.मि., पेण-28.00 मि.मि., मुरुड-161.00 मि.मि., पनवेल-20.40 मि.मि., उरण-36.00 मि.मि., कर्जत-65.00 मि.मि., खालापूर-40.00 मि.मि., माणगांव-316.00 मि.मि., रोहा-65.00 मि.मि., सुधागड-90.00 मि.मि., तळा-223.00 मि.मि., महाड-210.00मि.मि., पोलादपूर-144.00, म्हसळा-120.00मि.मि., श्रीवर्धन-28.00 मि.मि., माथेरान-44.30 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1604.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 100.29 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   105.43 टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.06 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 79.74 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3213.14 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 11.00 मि.मि., पेण-25.20 मि.मि., मुरुड-40.00 मि.मि., पनवेल-15.80 मि.मि., उरण-13.00 मि.मि., कर्जत-74.80 मि.मि., खालापूर-72.00 मि.मि., माणगांव-126.00 मि.मि., रोहा-52.00 मि.मि., सुधागड-112.00 मि.मि., तळा-96.00 मि.मि., महाड-195.00मि.मि., पोलादपूर-201.00, म्हसळा-89.00मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-83.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1275.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 79.74 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   102.24 टक्के इतकी आहे. 0000

आपत्कालीन परिस्थितीच्या निवारणासाठी प्रशासन सज्ज नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

Image
अलिबाग दि.5 ऑगस्ट :-   जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या निवारणासाठी प्रशासन सज्ज असून यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, वोंढागी, बोरजे व वढाव या पूरग्रस्त गावांची आज पाहणी त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.र्धेर्यशील पाटील, उपविभागीय अधिकारी पेण श्रीमती प्रतिमा पुदलवाड, मेजर हिमांशू सलुजा, तहसिलदार पेण श्रीमती अरुणा जाधव   आदि उपस्थित होते. यावेळी पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, गेल्या तीन ते चार दिवसांत पडलेल्या पाऊसामुळे अतिवृष्टी होऊन ज्या गावातील लोकांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्याची कारवाई तातडीने करावी असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. कणे गावातील खारबंदीस्ती मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पेण तालुक्यात पुढील काही काळात पूरपरिस्थिती उदभवल्यास सुरक्षिततेचा उपाय म्हणून पेण येथे मिलिटरीची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. पुरपरिस्थिती काळात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व ग्र

लोकशाही दिनी दोन अर्ज दाखल

Image
अलिबाग दि.5 ऑगस्ट :-   या महिन्याचा लोकशाही दिन आज निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी एकूण 2 अर्ज प्राप्त झाले. ते 2 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे सूपूर्द करण्यात आले. विभागनिहाय प्रलंबित अर्ज संख्या याप्रमाणे- महसूल विभाग-6, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-1, मुख्य नियंत्रक अनाधिकृत बांधकामे (सिडको) भवन, सीबीडी बेलापूर-1, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड-अलिबाग-1, उपविभागीय अधिकारी पेण व खार लॅण्ड पेण-1 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 252 मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.04 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 252.40 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3026.74 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 331.00 मि.मि., पेण-493.00 मि.मि., मुरुड-235.00 मि.मि., पनवेल-170.60 मि.मि., उरण-183.00 मि.मि., कर्जत-288.80 मि.मि., खालापूर-240.00 मि.मि., माणगांव-165.00 मि.मि., रोहा-206.00 मि.मि., सुधागड-245.00 मि.मि., तळा-266.00 मि.मि., महाड-197.00मि.मि., पोलादपूर-152.00, म्हसळा-210.00 मि.मि., श्रीवर्धन-216.00 मि.मि., माथेरान-440.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 4038.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 252.40 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   96 .31 टक्के इतकी आहे. 0000