राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठक खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी ---जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.07-  कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव दि.02 सप्टेंबर पासून सुरु होत आहे.  गणेशोत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून नागरिक येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित राष्ट्रीय महामार्ग 66 च्या झालेल्या दुरुस्तीबाबत आढावा बैठकीत ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी पेण श्रीमती प्रतिमा पुदलवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, राष्ट्रीय महामार्ग पनवेल प्रबंधक अभिषेक अग्रवाल, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पेण रत्नाकर बामणे, शाखा अभियंता,रा.म.विभाग पेण रुपेश सिंगासने, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण संजय उदावत, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, वाहतूक पोलीस विभागाचे सुरेश वार्डे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी,कर्मचारी आदि उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना करतांना जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जावेत. पोलीस विभागाने गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे होईल असे पहावे. महामार्गाच्या कामात विविध तंत्रज्ञानाचा तसेच जादा मनुष्य बळाचा वापर करुन रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पेवरब्लॉक बसविण्याचे  काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी यावेळी अधिका-यांना दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक