Posts

Showing posts from November 10, 2019

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

अलिबाग दि .15, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत (CMEGP) राज्याच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना जिल्हा उद्योग केंद्र , रायगड अलिबाग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ , रायगड अलिबाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे . मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरु केली आहे . जिल्ह्यातील युवक - युवतींच्या औद्योगिक प्रगतीसाठी प्रथमच सुरु केलेल्या या योजने द्वारे कृषी व कृषीवर आधारीत उद्योग , उत्पादन व सेवा आदी उद्योग प्रकल्पांसाठी संबंधितांची निवड केली जाणार आहे . यामध्ये उत्पादन उद्योगांकरीता रु .50 लाख व सेवा उद्योगांकरीता रु .10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते . यामध्ये शासनमार्फत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 25 ते 35 टक्के व शहरी भागातील लाभार्थ्यांकरीता 15 ते 25 टक्के अनु

बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह

अलिबाग दि .15, संयुक्त राष्ट्रसंघाचे बालकांचे हक्क यावरील झालेले अधिवेशन यास 20 नोव्हेंबर 2019 रोजी 30 वर्ष पूर्ण होत आहेत . याचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात सर्वत्र बालकांची सुरक्षितता (Safety for Children Every Where) बालकांचे हक्क व त्यांची सुरक्षि तता सप्ताह महाराष्ट्र पोलीस व बाल कल्याण विभाग , शिक्षण विभाग , चाईल्ड लाईन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 ते 20 नोव्हेंबर 2019 या कालावधित राबिण्यात येणार आहे . 0000

शामराव पेजे इ.मा.व. (ओबीसी) महामंडळाची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

अलिबाग दि .15, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत रायगड जिल्ह्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील होतकरु व बेरोजगार व्यक्तींना व्यवसाय / स्वयंरोजगार करण्याकरीता अल्प दराने विविध योजनांतर्गत कर्ज देण्यात येते . त्यानुसार रायगड जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील होतकरु , गरजू   व बेरोजगार व्यक्तींना वैयक्तिक कर्ज परतावा योजना ( रु . 10 लाख पर्यंत ) व गट कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती पुढील प्रमाणे आहे . उद्देश :- फक्त महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रम , लघु उद्योग व मध्यम उद्योग , उत्पादन , व्यापार व विक्री सेवा क्षेत्र इ . व्यावसायाकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे . कर्जाची उच्चतम मर्यादा :- रु .10 लाख स्वरुप :- बँकेने रु .10 लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळेत / नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत ) अर्जदाराच्या आधार लिं