शामराव पेजे इ.मा.व. (ओबीसी) महामंडळाची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना



अलिबाग दि.15, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत रायगड जिल्ह्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील होतकरु बेरोजगार व्यक्तींना व्यवसाय / स्वयंरोजगार करण्याकरीता अल्प दराने विविध योजनांतर्गत कर्ज देण्यात येते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील होतकरु, गरजू  बेरोजगार व्यक्तींना वैयक्तिक कर्ज परतावा योजना (रु. 10 लाख पर्यंत) गट कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती पुढील प्रमाणे आहे.
उद्देश :- फक्त महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषि संलग्न पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार विक्री सेवा क्षेत्र . व्यावसायाकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे.
कर्जाची उच्चतम मर्यादा :- रु.10 लाख
स्वरुप :- बँकेने रु.10 लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळेत / नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीयकृत आहे.
लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी शर्ती :- अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा नॉन क्रिमीलेयर करीता असलेल्या रु.8 लाख इतकी राहील. (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार), कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा, शासकीय महामंडळाचा थकबाकीदार नसावा. तसेच प्रकल्पासाठी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे आधार संलग्न बॅंक खाते असणे अनिवार्य राहील. वेबपोर्टल/ महामंडळाच्या संगणक प्रणाली www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) वर नाव नोंदणी अनिवार्य आहे. त्यानंतर वेबपोर्टलवर कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी शर्तीनुसार संगणकीयकृत सशर्त हेतुपात्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.
व्यवसाय :- सर्व कायदेशीर व्यवसाय.
कार्यपध्दती :- लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली व्याज रक्कम अदा करेल, या व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क Charges/Fees/ देयके अदा करणार नाही. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना अदा करण्यात येणारी व्याज परतावाची रक्कम अनुदान स्वरुपात अदा करण्यात येईल.
परतफेडीचा कालावधी :- बँक निकषांनुसार
तरी इच्छुक गरजू .मा.. (ओबीसी) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीकरीता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि.चे जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, प्रशासकीय इमारत, तळमजला, गोंधळपाडा ता.अलिबाग, जि.रायगड दूरध्वनी क्रमांक 02141-224488 वा Email :- dmobcalibagraigad@gmail.com येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी www.mosbcfdc.org या संकेत स्थळाला भेट द्यावी.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक