Posts

Showing posts from September 2, 2018

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7- बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. रविवार दि.9 रोजी सायंकाळी सहा वा. धोणखार चणेरा ता.रोहा येथे आगमन व भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.   सात वा. धोणखार चणेरा येथून रोहाकडे प्रयाण.   साडेसात वा. रोहा येथे आगमन व भाजप कार्यकर्त्यां समवेत बैठक. स्थळ : ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा शहर.   साडेआठ वा. रोहा येथून महाडकडे प्रयाण.   दहा वा. शासकीय विश्रामगृह महाड येथे आगमन व मुक्काम.   सोमवार दि. 10 रोजी   सकाळी साडेआठ वा. हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती.   स्थळ : हुतात्मा स्मारक महाङ   अकरा वा. रायगड लोकसभा मतदार संघ भाजपा पदाधिकारी बैठक.   स्थळ : पी.जी.हॉटेल महाङ   दुपारी तीन वा. सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.   स्थळ : भेलोशी विद्यालय महाङ   चार वा. महाड येथून गोरेगाव ता.माणगावकडे प्रयाण.   साडे चार वा. गोरेगाव ता.माणगाव येथे आगमन व भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.   स्थळ : सार्व

ओरल कॅन्सर स्क्रीनींग आणि ओरल हेल्थ अर्वेर्नेस कँपचे आयोजन लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7 : दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत   आर्मड फोर्सेस मेडीकल कॉलज पुणे,   मार्फत   जंजिरा मिलट्री रेस्ट हाऊस, गोंधळपाडा, अलिबाग येथे रायगड जिल्हयातल माजी सैनिक,   माजी सैनिक विधवा व अवलंबितांसाठी ओरल कॅन्सर स्क्रीनींग आणि ओरल हेल्थ अर्वेर्नेस कँपचे आयोजन करण्यात आले आहे.   जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि अवलंबितानी   या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव, (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,   रायगड-अलिबाग यांनी केले आहे.   (आधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९०७५००४१०४ वर संपर्क साधावा) 00000

04 ते 13 आक्टोंबर 2018 रोजी सैन्य भरती

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7- सैन्य भरती कार्यालय, मुंबई यांचेमार्फत सैन्यभरतीचे आयोजन कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल (रायगड) येथे  04 ते 13 आक्टोंबर 2018 पर्यंत सकाळी 05.00 वाजता पासून पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.   दि. 04 आक्टोंबर 2018 मुंबई शहर  व मुंबई उपनगर जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.   05 ते  07 आक्टोंबर 2018 नाशिक जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.  08 आक्टोंबर 2018 वैद्यकिय तपासणी.  09 व 10 आक्टोंबर 2018 उर्वरित नाशिक जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.  11 आक्टोंबर 2018 ठाणे जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.  12 आक्टोंर 2018 पालघर व रायगड जिल्हयातील आणि Outsider candidates (SOS/SOEX)  who have been granted outsider sanction by ADG Rtg (MH & G) HQ Rtg Zone. युवकांकरिता स्क्रिनिंग.  13 ते  15 आक्टोंबर 2018 उर्वरित  पात्र युवकांची वैद्यकिय तपासणी.   16 आक्टोंबर 2018 आरक्षित (for any Balance Medicals).  तरी सर्व पात्र युवक तरुणांनी सदर सैन्य भरतीचा लाभ घ्यावा, असे आावाहन मेजर प्रांजळ प्र.जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलि

लष्कर भरती मेळावा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7-      कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल (रायगड) येथे   दि.4   ते   13   आक्टोंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारासाठी हा मेळावा होणार आहे. लष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यावस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे.   लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणा ऱ्यांनी ऑन लाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.   ही ऑनलाइन नोंदणी प्रकिया दि. 18 सप्टेंबर पर्यंत सुरू रहाणार आहे. त्यानंतर दि. 19 सप्टेंबर पासून भरती मेळाव्यासाठी प्रवेशपत्र देण्यात येतील.   ऑनलाईन अर्जावर नमुद   केलेल्या   ई-मेल पत्त्यावर प्रवेशपत्र उमेदवाराना पाठविली जातील.   प्रवेशपत्र डाऊनलोड करून भरती मेळाव्याला उपस्थित राहाताना आणणे आवश्यक आहे. इच्छूक उमेदवारानी www.joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर नाव नोदणी करावी. सैन्य भरतीची प्रक्रिया    संपुर्णपणे पारदर्शक आहे. या मेळाव्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच सैन्य भरती पूर्णपण

मुंबई गोवा महामार्ग दुरुस्ती : ना. चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा; गणेश आगमना पुर्वी रस्ते सुसज्ज करण्याचे निर्देश

Image
अलिबाग, जि. रायगड, दि. ७ (जिमाका)-   गणेश चतुर्थीला चाकरमान्यांना कोकणाकडे जाणे सुकर व्हावे यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सा.उ. वगळून)   ना. चंद्रकांत पाटील यांनी आज पनवेल येथे दिले.              यासंदर्भात ना. चंद्रकांत पाटील यांनी आज सायन- पनवेल ते पळस्पे या दरम्यान महामार्गाची पाहणी केली. आणि त्यानंतर पनवेल शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी पनवेल महापौर डॉ.कविता चौतमल,   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता फेगडे   आदी अधिकारी उपस्थित होते. ना. पाटील यांनी गेल्या आठवड्यात (शुक्रवार दि.31 ऑगस्ट रोजी) महामार्ग पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या आत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा त्यांनी आजच्या बैठकीत घेतला. गणेश चतुर्थीसाठी भाविक कोकणाकडे निघण्याआधी खड्

परिवहनेतर संवर्गातील वाहनांचे कामकाज 15 पासून ऑनलाईन पध्दतीने

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.5- परिवहनेतर संवर्गातील वाहनांचे सर्व कामकाज  (हस्तांतरण उतरविणे-चढवणे, ना-हरकत प्रमाणपत्र, पत्ता बदल, दुय्यम प्रत इत्यादी कामे) दि. 15 पासून ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात येणार आहे.   सदरचे शुल्क www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर भरुन कागदपत्रे खिडकी क्रमांक दहा वर जमा करावी.  सर्व वाहन मालकांनी यांची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिहवन अधिकारी पेण यांनी कळविले आहे. 00000

सण-उत्सव कालावधीत स्थानिकस्तरावर अधिकार प्रदान

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.5- नजिकच्या काळात असलेल्या सण उत्सवाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,याकरिता रायगड जिल्हा हद्दीत पोलीस कार्यक्षेत्रात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे  पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अंमलदार व त्यांचेवरील अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत स्थानिक परिस्थितीनुसार, खालील बाबतीत  तोंडी व लेखी आदेश देण्याच्या अधिकार जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी प्रदान केले आहेत. त्यानुसार,सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा रस्त्यालगत  सभा, मोर्चे, मिरवणुका, पदयात्रा व मनोरंजनाचे कार्यक्रम परवानगी देणे,कार्यक्रमाची जागा, तारीख, वेळ, निश्चित करणे, वर्तणुक किंवा वागणूक प्रतिबंध आदींबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. हे आदेश दि.30 पर्यंत लागू राहतील, असे जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड-अलिबाग अनिल पारसकर यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7.53 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.53 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2920.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 200 मि.मि., पेण-1.00 मि.मि., मुरुड-7.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-11.80 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-10.00 मि.मि., रोहा-5.00 मि.मि., सुधागड-4.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-10.00, म्हसळा-29.40 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-10.30 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 120.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.53 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   92.92 टक्के इतकी आहे. 00000

स्थानिकस्तरावर अधिकार प्रदान

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.4- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी  तसेच सरपंच पदासाठी थेट निवडणुकीद्वारे  भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 23 ऑगस्ट पासून संबंधित ग्रामपंचायत हद्दीत निवडणूक आचारसंहिता अंमलात आली आहे.   नवीमुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ 1 विभागातील एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहाळ ग्रामपंचायत तसेच परिमंडळ 2-  पनवेल  विभागातील पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव, पळस्पे, पारगाव, पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोयंजे, वांगणी तर्फे वाजे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे हद्दीतील आदई,विचुंबे, देवद,न्हावाशेवा पोलीस ठाणे हाद्दीतील गव्हाण, उरण पोलीस ठाणे हद्दीतील कोप्रोली, जुई, विंधणे व मोरासागरी पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान कोळवाडा या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून दि. 26 सप्टेंबर रोजी मतदान तर दि. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने   नवी मु

लोकशाही दिनी 3 अर्ज दाखल

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाची अंमलबजावणी होते. सोमवारी (दि.3 रोजी) स्थानिक सुट्टी असल्याने या महिन्याचा लोकशाही दिन आज निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी   एकूण 3 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 3 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे सूपूर्द करण्यात आले. विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या याप्रमाणे-   महसूल विभाग-2, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद-1   असे एकूण 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6.49 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.49 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2912.66 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 3.00 मि.मि., पेण-10.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-7.40 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-7.00 मि.मि., रोहा-6.00 मि.मि., सुधागड-5.00 मि.मि., तळा-12.00 मि.मि., महाड-13.00 मि.मि., पोलादपूर-16.00, म्हसळा-11.40 मि.मि., श्रीवर्धन-2.00 मि.मि., माथेरान-6.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 103.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.49 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   92.68 टक्के इतकी आहे. 00000

गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक : चोख नियोजनातून सण गुण्यागोविंदाने साजरे करु - पालकमंत्री चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- गणेशोत्सव व सर्व धर्मीयांचे सण गुण्यागोविंदाने साजरे करण्यासाठी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचे चोख नियोजन  आवश्यक आहे. त्यासाठी आपण सारे मिळून हातात हात घालून कामकरुन सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अशा सौहार्दपूर्ण वातावरणातूनच आपण रायगड जिल्ह्याला प्रगतीकडे नेण्यासाठी कटीबद्ध होवू या, असे मार्गदर्शन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज खोपोली येथे केले.           खोपोली ता. खालापूर येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात आज गणेशोत्सव 2018- पूर्व तयारी आढावा व जिल्हा शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ना. चव्हाण यांनी उपस्थितांना   मार्गदर्शन केले. यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडको अध्यक्ष तथा आ.प्रशांत ठाकुर, आ.सुरेश लाड, खोपोली नगराध्यक्ष सुमन औसरमल, प्रभारी   जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर,अप्पर अधिक्षक सचिन गुंजाळ, कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी   आदींसह जिल्ह्यातील श

त्सुनामी आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम बोर्ली-मांडला ग्रामस्थांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- राष्ट्रीय आपत्ती व्यस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली   व भारतीय राष्ट्रीय समुद्रीय माहिती सेवा केंद्र, हैदराबाद (Indian   National   Center   for   Ocean   Information   Service   Hyderabad ) यांच्या   मागदर्शनाखाली   त्सुनामी या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या   भाग म्हणून जिल्ह्यात बोर्ली मांडला ता. मुरुड येथे जिल्हा प्रशासनातर्फे रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.   या सराव उपक्रमात जिल्हा प्रशासनाच्या 18 विभागांच्या 267 अधिकारी कर्मचाऱ्यांसह बोर्ली-मांडला येथील नागरिकांनी सक्रीय सहभाग दिला. आजच्या या सराव सत्रात बोर्ली मांडला येथील ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवले. मंत्रालय- जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ते बोर्ली मांडला   हैदराबाद येथील संस्थेतून सकाळी अकरा वाजता पहिला त्सुनामी संदर्भात पहिला संदेश हा मंत्रालयात नियंत्रण कक्षात आल्यानंतर तेथून हा संदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील   नियंत्रण कक्षात आला.   त्यानंतर मुरूड तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षात येऊन तो बोर्ली- मांडला येथील नियंत्रण कक्षात संदेश पोहोचला. बोर्ली स

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 31.13 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.13 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2906.18 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 14.00 मि.मि., पेण-33.20 मि.मि., मुरुड-20.00 मि.मि., पनवेल-17.40 मि.मि., उरण-17.00 मि.मि., कर्जत-33.40 मि.मि., खालापूर-42.00 मि.मि., माणगांव-71.00 मि.मि., रोहा-26.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-51.00 मि.मि., महाड-24.50 मि.मि., पोलादपूर-44.00, म्हसळा-31.20मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-38.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 498.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 31.13 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   92.48 टक्के इतकी आहे. 00000

सुधारित वृत्त : बोर्ली मांडला येथे आज जिल्हा प्रशासनातर्फे त्सुनामी आपत्ती व्यवस्थापनाची रंगित तालीम

Image
                                                        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- त्सुनामी या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या सरावाचा भाग म्हणून मंगळवार दि.4 रोजी जिल्ह्यात बोर्ली मांडला ता. मुरुड येथे जिल्हा प्रशासनातर्फे रंगित तालीम राबविली जाणार आहे. या रंगित तालीम मध्ये जिल्हा प्रशासनाचे तब्बल 18 विभाग सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर मंगळवार दि. 4 रोजी पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यात   हे सराव सत्र राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने त्सुनामी रंगीत तालीम(मॉक ड्रिल) आढावा बैठक आज बोर्ली मांडला ता.मुरुड येथे   जिल्हा परिषद शाळेत पार पडली. यावेळी   मुरूड तहसीलदार उमेश पाटील बोर्ली सरपंच नौशाद दळवी,मांडला सरपंच सुचिता पालवणकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने,मुरूड आगार प्रमुख युवराज कदम,रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप,मुरूड गटविकास अधिकारी आर.ओ. भागवत आदी विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.              यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली की,   राष्ट्रीय आपत्ती व्यस्थापन प्र

बोर्ली मांडला येथे आज जिल्हा प्रशासनातर्फे त्सुनामी आपत्ती व्यवस्थापनाची रंगित तालीम

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- त्सुनामी या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या सरावाचा भाग म्हणून आज जिल्ह्यात बोर्ली मांडला ता. मुरुड येथे जिल्हा प्रशासनातर्फे रंगित तालीम राबविली जाणार आहे. या रंगित तालीम मध्ये जिल्हा प्रशासनाचे तब्बल 18 विभाग सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर मंगळवार दि. 4 रोजी पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यात   हे सराव सत्र राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने त्सुनामी रंगीत तालीम(मॉक ड्रिल) आढावा बैठक आज बोर्ली मांडला ता.मुरुड येथे   जिल्हा परिषद शाळेत पार पडली. यावेळी   मुरूड तहसीलदार उमेश पाटील बोर्ली सरपंच नौशाद दळवी,मांडला सरपंच सुचिता पालवणकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने,मुरूड आगार प्रमुख युवराज कदम,रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप,मुरूड गटविकास अधिकारी आर.ओ. भागवत आदी विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.              यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली की,   राष्ट्रीय आपत्ती व्यस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली   व भारतीय राष्ट्रीय समुद्रीय माहिती सेवा केंद्र,

छत्रपती राजाराम महाराज उद्योजक व कौशल्य विकास अभियान शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन कर्तृत्व घडवा सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांचे आवाहन अलिबाग जि. रायगड दि. 2 (जिमाका)-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. या प्रगतीत समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या रोजगार स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतः उद्योजक व्हावं आणि इतरांनाही रोजगार देऊन आभिमान वाटेल असे कर्तृत्व घडवावे, असे आवाहन सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल येथे केले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठा सांस्कृतिक समिती पनवेल यांच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कोकण विभाग म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई, जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक संचालक ए. जी. पवार, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रायगड जिल्हा समन्वयक अंजली पाटील, सांगली जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक आनंद आंबेकर, रामदास शेवाळे, मराठा सांस्कृतिक समिती, पनवेलचे राजकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळाव्यात उपस्थित युवकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रबोधन करण्यात आले. यावेळी उपस्थित आधिकार्यांपनी आपापल्या विभागाच्या योजना व त्यांच्या लाभ घेण्याविषयीची प्रक्रिया सांगितली. तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करण्याबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे आंबेकर यांनी मार्गदर्शन केले. उद्योजकता विकास व कौशल्य विकास या विषयी ए. जी. पवार यांनी माहिती दिली. तसेच महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी शासनाच्या www. mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून या संकेतस्थळावर सर्व प्रकारच्या रोजगार, स्वरोजगार संधींची तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती विनामुल्य उपलब्ध असते असे सांगितले. तर अंजली पाटील यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना आदी योजनांची माहिती दिली. शासनाच्या योजनांचा लाभ घ्या- नरेंद्र पाटील यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, समाजातील होतकरू, गरीब युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करणे हे समाजातील जाणकार लोकांचे कर्तव्य आहे. त्यांनी युवकांना कर्ज मिळवण्यासाठी व उद्योग स्थापण्यासाठी मार्गदर्शन करावे. महामंडाळाच्या योजनांमधून घेतल्या जाणार्याय कर्जासाठी स्वतः सरकार जामीन राहणार असल्याने कर्ज मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तरी तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनीही यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात आमदार ठाकूर म्हणाले की, देशातली अर्थव्यवस्था ही वाढत्या विकास दराकडे झेपावत आहे. क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. हे अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे लक्षण आहे. अशावेळी मराठा समाजाच्या युवकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वरोजगाराकडे वळावे. समाजाच्या स्वयंपूर्णतेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरी युवकांनी अभिमान वाटेल असे कर्तृत्व घडावे असे आवाहन आ. ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजकुमार पाटील यांनी केले. तर सूत्र संचालन श्रीमती रुपाली राणे यांनी केले. कार्यक्रमाला युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकराज्य स्टॉलला प्रतिसाद लोकराज्य वाचक अभियानाचा भाग म्हणून सदर मेळाव्यात जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या वतीने लोकराज्य विक्री व वर्गणीदार करण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला मेळाव्यास उपस्थित युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर मेळाव्यात शासकीय योजनांच्या माहितीसाठी लोकराज्य हे माहितीपूर्ण मासिक असल्याचे युवकांना सांगण्यात आले. 00000

Image
अलिबाग जि. रायगड दि. 2 (जिमाका)-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. या प्रगतीत समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या रोजगार स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतः उद्योजक व्हावं आणि इतरांनाही रोजगार देऊन आभिमान वाटेल असे कर्तृत्व घडवावे, असे आवाहन सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल येथे केले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठा सांस्कृतिक समिती पनवेल यांच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कोकण विभाग म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई, जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक संचालक ए. जी. पवार, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास