लष्कर भरती मेळावा



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7-    कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल (रायगड) येथे  दि.4  ते  13  आक्टोंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारासाठी हा मेळावा होणार आहे.
लष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यावस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे.  लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणा ऱ्यांनी ऑन लाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.  ही ऑनलाइन नोंदणी प्रकिया दि. 18 सप्टेंबर पर्यंत सुरू रहाणार आहे. त्यानंतर दि. 19 सप्टेंबर पासून भरती मेळाव्यासाठी प्रवेशपत्र देण्यात येतील.  ऑनलाईन अर्जावर नमुद  केलेल्या  ई-मेल पत्त्यावर प्रवेशपत्र उमेदवाराना पाठविली जातील.  प्रवेशपत्र डाऊनलोड करून भरती मेळाव्याला उपस्थित राहाताना आणणे आवश्यक आहे.
इच्छूक उमेदवारानी www.joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर नाव नोदणी करावी. सैन्य भरतीची प्रक्रिया   संपुर्णपणे पारदर्शक आहे. या मेळाव्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच सैन्य भरती पूर्णपणे मोफत आहे. मेळाव्याच्या कालावधीत दरदिवशी अंदाजे पाच ते सहा हजार उमेदवार उपस्थित राहतात. त्यामुळे होणारा गोंधळ आणि गैरसोय टाळण्यासाठी नियोजित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक