Posts

Showing posts from July 23, 2017

विभागीय माहिती कार्यालयामार्फत लोकराज्य वर्गणीदारांसाठी विशेष मोहीम

नवी मुंबई, दि. 29 : -विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई यांच्यामार्फत 1 ऑगस्ट 2017 पासून लोकराज्य वार्षिक वर्गणीदार मोहीम सुरु करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिध्द होणारे लोकराज्य हे मासिक शासनाचे उत्कृष्ट मुखपत्र आहे. लोकराज्य मासिक शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणारे एक उत्कृष्ट साधन आहे. लोकराज्य   मासिक मराठी, हिंदी, इंग्रजी,  गुजराथी, उर्दू या भाषांमधून दरमहा प्रकाशित होते. शासनाच्या या मासिकाचे वर्गणीदार जास्तीत जास्त लोकांनी व्हावे यासाठी हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेची सुरुवात दि. 1 ऑगस्ट 2017 पासून रोहा जि.रायगड येथून होणार आहे. लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी नजिकच्या जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. 000 000

रोह्यातील अंजुमान माध्यमिक विद्यालयात उर्दू लोकराज्य मेळावा

नवी मुंबई, दि. 29 : - कोकण विभागीयस्तरावरील उर्दू लोकराज्य मेळावा               दि. 01 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता अंजुमान माध्यमिक उर्दू विद्यालय रोहा, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश व. मुळे, हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख  म्हणून प्राचार्य वसीम मुलहक सातारेकर असणार आहेत. तर कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष    श्री. मिंलिद अष्टिवकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती अधिकारी, रायगड मिंलिद दुसाने  यांनी केले आहे. जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे  अनिरुद्ध अष्टपुत्रे, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी पालघर दत्तात्रय कोकरे हे  या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास उर्दू भाषीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी केले आहे. 000 000

आपले सरकार आपला शेतकरी

Image

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.29, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.51मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2080.16  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 23.00 मि.मि., पेण-45.40 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-12.00 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-58.60 मि.मि., खालापूर-40.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-20.00 मि.मि., सुधागड-40.00 मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-42.00 मि.मि., पोलादपूर-43.00, म्हसळा-31.60 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-38.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 488.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.51मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   66.19 % इतकी आहे.            0000            

पत्रपरिषद कोकणातील सर्व ग्रामपंचायती व शाळांना वायफाय सुविधा- ना. गीते

Image
        अलिबाग दि.28, (जिमाका):-   डिजीटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत  रायगड जिल्ह्यासोबत कोकणातील  सर्व ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांना  वायफाय सुविधेने जोडले जात असून  हे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गीते यांनी आज येथे पत्रकारांना दिली.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीच्या बैठक आज पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जि.प. सदस्य किशोर जैन आदी उपस्थित होते.  यावेळी बोलतांना ना. गीते म्हणाले की,  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व शाळांना वायफायने जोडण्यात येणार आहे. त्यासाठी केबलिंगचे काम पूर्ण होत आले असून  अनेक ग्रामपंचायतींपर्यंत वायफाय कनेक्टिव्हीटी मिळाली आहे. याकामाला अधिक गती देण्यासाठी येत्या 3 ऑगस्टला दिल्ली येथे बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच सागरमा

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा ग्रामिण भागातील रस्त्यांचा विकास आराखडा तयार करा- ना. गीते यांचे निर्देश

Image
        अलिबाग दि.28, (जिमाका):-   जिल्ह्यातील ग्रामिण भागातील रस्त्यांचा  विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश व्हावा यासाठी रस्त्यांचा विकास आराखडा, अंदाजपत्रके आदी कामे पुर्ण करा, असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गीते यांनी आज येथे दिले.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे,  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जि.प. सदस्य किशोर जैन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, सर्व पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  यावेळी ना. गीते यांनी  केंद्राच्या निधीतून राबविण्यात येत असलेल्या  विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना,  प्रधानमंत्री आवास योजना,  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, 

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 19 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.28, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.57मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2049.65  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 04 .00 मि.मि., पेण-26.10 मि.मि., मुरुड-08.00 मि.मि., पनवेल-04.00 मि.मि., उरण-16.20 मि.मि., कर्जत-35.00 मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-22.00 मि.मि., रोहा-23.00 मि.मि., सुधागड-27.00 मि.मि., तळा-18.00 मि.मि., महाड-18.00 मि.मि., पोलादपूर-11.00, म्हसळा-11.40 मि.मि., श्रीवर्धन-06.00 मि.मि., माथेरान-35.40 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 313.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 19.57मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   65.22 % इतकी आहे.           0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.27, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.55मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2030.09  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 06 .00 मि.मि., पेण-25.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-12.00 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-43.80 मि.मि., खालापूर-05.00 मि.मि., माणगांव-04.00 मि.मि., रोहा-03.00 मि.मि., सुधागड-16.00 मि.मि., तळा-03.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-04.00, म्हसळा-09.00 मि.मि., श्रीवर्धन-01.00 मि.मि., माथेरान-29.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 184.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.55मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   64.60 % इतकी आहे. 0000

राष्ट्रीय कृषी विकास योजना संरक्षित शेती व्यक्तिगत लाभासाठी अर्ज मागविले

अलिबाग,दि.27:-   कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षित शेती व्यक्तिगत लाभाच्या घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 5ऑगस्ट पर्यंत   www.hornet . gov.in    या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. फलोत्पादन यांत्रिकीकरण या घटकांतर्गत पुर्वसंमती अर्जाची मूळ प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांच्या कार्यालयात 5ऑगस्ट पर्यंत सादर करावेत. लाभार्थ्यांनी कोणत्या घटकासाठी लाभ घ्यावयाचा आहे ते स्पष्टपणे अर्जामध्ये नमूद करावे. विहीत मुदतीमध्ये प्राप्त अर्जांपैकी लक्षांकास अधीन राहून लाभार्थ्यांची   निवड लॉटरी पद्धतीने जिल्हास्तरावर करण्यात येईल. फलोत्पादन यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या सात बारा उताऱ्यावर फळपिके,भाजीपाला पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. या योजनांमध्ये     संरक्षित शेती तसेच फलोत्पादन यांत्रिकीकरण यासारख्या घटकांचा     लाभ दिला जाणार असून लाभार्थ्यांने अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकार

जिल्हाधिकाऱ्यांनी केली रायगडाची पाहणी गडाच्या स्वच्छता व पावित्र्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
        अलिबाग दि.26, (जिमाका):-   रायगड किल्ला हा महाराष्ट्राचा मानबिंदू असून त्यांची स्वच्छता व पावित्र्य राखणे हे आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य असून  किल्ले परिसराची विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सहभाग घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले.             जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सोमवारी पदभार स्विकारल्यानंतर किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस वंदन करुन, आशिर्वाद घेऊन कामकाजास प्रारंभ करण्याचा मानस व्यक्त केला होता.  त्यानुसार, डॉ. सूर्यवंशी यांनी  किल्ले रायगड येथे  मंगळवारी (दि.25) भेट देऊन पाहणी केली व रायगड किला जतन, संवर्धन व परिसर विकास आराखड्याच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा नियोजन  अधिकारी  सुनिल जाधव,  अधिक्षक अभियंता विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला, प्रांताधिकारी  विठ्ठल ईनामदार,  तहसिलदार चंद्रसेन पवार, वन विभाग, कृषि विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी
Image
जिल्हाधिकाऱ्यांनी केली रायगडाची पाहणी गडाच्या स्वच्छता व पावित्र्यास सर्वोच्च प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी         अलिबाग दि.26, (जिमाका):-   रायगड किल्ला हा महाराष्ट्राचा मानबिंदू असून त्यांची स्वच्छता व पावित्र्य राखणे हे आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य असून  किल्ले परिसराची विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सहभाग घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले.             जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सोमवारी पदभार स्विकारल्यानंतर किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस वंदन करुन, आशिर्वाद घेऊन कामकाजास प्रारंभ करण्याचा मानस व्यक्त केला होता.  त्यानुसार, डॉ. सूर्यवंशी यांनी  किल्ले रायगड येथे  मंगळवारी (दि.25) भेट देऊन पाहणी केली व रायगड किला जतन, संवर्धन व परिसर विकास आराखड्याच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा नियोजन  अधिकारी  सुनिल जाधव,  अधिक्षक अभियंता विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला, प्रांताधिकारी  विठ्ठल ईनामदार,  त

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.26, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.79  मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2018.54  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 01 .00 मि.मि., पेण-10.20 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-03.00 मि.मि., उरण-14.00 मि.मि., कर्जत-22.20 मि.मि., खालापूर-15.00 मि.मि., माणगांव-04.00 मि.मि., रोहा-05.00 मि.मि., सुधागड-13.00 मि.मि., तळा-12.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-12.00, म्हसळा-10.20 मि.मि., श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-19.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 156.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.79  मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   64.23 % इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 14 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.25, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.71मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2008.75  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 05 .00 मि.मि., पेण-13.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-04.60 मि.मि., उरण-01.00 मि.मि., कर्जत-08.40 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-07.00 मि.मि., सुधागड-31.00 मि.मि., तळा-08.00 मि.मि., महाड-42.00 मि.मि., पोलादपूर-36.00, म्हसळा-6.40 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-27.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 235.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 14.71  मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   63.92 % इतकी आहे. 0000

जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी स्विकारला पदभार

Image
        अलिबाग दि.24, (जिमाका):-   नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी आज सकाळी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. आज सकाळी डॉ. सुर्यवंशी  यांनी अप्पर जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्विकारली. तत्पूर्वी श्री. मलिकनेर यांनी  पुष्पगुच्छ देऊन डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे आदी उपस्थित होते. त्यानंतर राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व विभागांनी आपला प्राथमिक लेखाजोखा सादर केला. सर्व विभागप्रमुखांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचा अल्पपरिचयः- जिल्हाधिकारी डॉ. विजय नामदेवराव सूर्यवंशी हे  भौतिक शास्त्र विषयाचे आणि कायद्याचे पदवीधर आहेत. तसेच व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेतील   एमबीए (विपणन) ही पदव्युत्तर पदवी व पीएच.डी ही पदवीही त्यांनी संपादन केली आहे. 2006 च्या भारतीय प्रशास

योजनाः शालेय साहित्यखरेदीसाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात रक्कम

अलिबाग,दि.24(जिमाका)- आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय साहित्य, दैनंदिन आवश्यक वस्तू या शासनामार्फत पुरविण्यात येतात. यासंदर्भात शासनाने विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात रक्कम जमा करुन विद्यार्थ्यांना त्यांच्या  पालकांनीच या वस्तू शाळा सुरु होण्यापूर्वी  खरेदी करुन द्याव्या, असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आश्रमशाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत सुविधा उपलब्ध होण्यासोबतच साहित्य खरेदीसंदर्भातील पारदर्शकताही जोपासली जाणार आहे. या निर्णयाची माहिती जाणून घेऊ- सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरीता महाराष्ट्र शासनामार्फत देय होणाऱ्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना घेण्याचे  स्वातंत्र्य मिळावे म्हणून या सुविधांची एक किंमत निश्चित करुन विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आश्रमशाळेत शिक्षणाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाची जबाबदारी शासनाची असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्व क्रमिक पुस्तके,शालेय स्टेशनरी, दैनंदिन वापरण्याच्या

माजी सैनिक गुणवंत पाल्यांना गौरव पुरस्कार

अलिबाग,दि.24(जिमाका)-   शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये इयत्ता 10वी व 12वी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधीक गुण मिळवुण उत्तीर्ण झालेले असतील अशा माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी माजी सैनिक विधवेचा अर्ज.,फॉर्म डी.डी.40.,विधवेचे ओळखपत्र.,10वी, 12वीच्या प्रमाणपत्राची/गुणपत्रीकेची साक्षांकीत प्रत.,डिस्चार्ज बुकामध्ये कुटूंबाची नावे असलेल्या पानाची छायांकीत प्रत.,राष्ट्रीयकृत बँक पासबुकची छायांकीत प्रत आदी कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत सादर करावीत. जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांच्या  विधवा पत्नींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण आधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. ०००००

तांडा वस्ती सुधार योजना अशासकीय सदस्य निवडीसाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,दि.24(जिमाका)- सामाजिक न्याय विभागांतर्गत  लमाण,बंजारा व इतर तत्स्म जातींच्या तांडा,वस्तीला  मुख्य गावाशी जोडण्यासाठी तांडा वस्ती सुधार येाजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्याकरिता  सन 2017-18 साठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येत असून अशासकीय अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी अर्ज,प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या समितीच्या अशासकीय अध्यक्ष व सदस्यपदी लमाण,बंजारा व  भटक्या जमाती पैकी एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. समितीचे अध्यक्ष  व सदस्य् यांचा कार्यकाल हा तीन वर्षाचा असेल आणि सदर कार्यकाल संपुष्ठात येण्यापूर्वी किंवा संबंधित अध्यक्ष व सदस्य यांनी राजीनामा दिल्यास किंवा पदावरुन काढून टाकल्यास एक महिन्याच्या आत नव्याने समिती पुनर्गठीत करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज,प्रस्ताव दि. 29 जुलै 2017पर्यंत विहीत नमुन्यात सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण रायगड अलिबाग  येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी कार्यालय दूरध्वनी क्र.02141-222288. ०००००

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग दि.24,(जिमाका) :- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री,  ना.अनंत गीते, हे गुरुवार दि. 26 पासून रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- गुरुवार दि.26 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हॉटेल रॅडिसन,ता. अलिबाग येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार दि.27 रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल रॅडीसन येथून अलिबागकडे प्रयाण.सव्वा दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय  अलिबाग येथे आगमन. दुपारी दोन वाजता  मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. ०००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.24, (जिमाका):-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.14मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1994.04  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 01 .00 मि.मि., पेण-10.40 मि.मि., मुरुड-05.00 मि.मि., पनवेल-10.40 मि.मि., उरण-04.00 मि.मि., कर्जत-21.20 मि.मि., खालापूर-17.00 मि.मि., माणगांव-20.00 मि.मि., रोहा-09.00 मि.मि., सुधागड-33.00 मि.मि., तळा-07.00 मि.मि., महाड-50.00 मि.मि., पोलादपूर-44.00, म्हसळा-5.20 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-43.10 मि.मि. असे गेल्या 24 तासांतले एकूण पर्जन्यमान 290.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 18.14  मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरीशी   पर्जन्यमानाची  टक्केवारी   63.45 % इतकी आहे. 00000

लोकमान्य टिळक यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

Image
अलिबाग दि. 23:- (जिमाका):-   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार  अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 46 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.23, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 46.16 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1975.89  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-             अलिबाग 39 .00 मि.मि., पेण-130.00 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-72.00 मि.मि., उरण-58.00 मि.मि., कर्जत-60.00 मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-38.00 मि.मि., रोहा-21.00 मि.मि., सुधागड-32.00 मि.मि., तळा-17.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-21.00, म्हसळा-16.00 मि.मि., श्रीवर्धन-06.00 मि.मि., माथेरान-150.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 738.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 46.16  मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी  62.87 % इतकी आहे. 0000