जिल्हाधिकाऱ्यांनी केली रायगडाची पाहणी
गडाच्या स्वच्छता व पावित्र्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
        अलिबाग दि.26, (जिमाका):- रायगड किल्ला हा महाराष्ट्राचा मानबिंदू असून त्यांची स्वच्छता व पावित्र्य राखणे हे आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य असून  किल्ले परिसराची विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सहभाग घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले.
            जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सोमवारी पदभार स्विकारल्यानंतर किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस वंदन करुन, आशिर्वाद घेऊन कामकाजास प्रारंभ करण्याचा मानस व्यक्त केला होता.  त्यानुसार, डॉ. सूर्यवंशी यांनी  किल्ले रायगड येथे  मंगळवारी (दि.25) भेट देऊन पाहणी केली व रायगड किला जतन, संवर्धन व परिसर विकास आराखड्याच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा नियोजन  अधिकारी  सुनिल जाधव,  अधिक्षक अभियंता विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला, प्रांताधिकारी  विठ्ठल ईनामदार,  तहसिलदार चंद्रसेन पवार, वन विभाग, कृषि विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ले रायगड परिसराची पाहणी केली.त्यानंतर रायगड किल्ला विकास आराखड्यानुसार करावयाच्या विकास व जतन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली . येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढतो त्यावेळी करावयाच्या व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदींचाही त्यांनी आढावा घेतला. या आराखड्याअंतर्गत कामे ही आखून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार व्हावीत, असे निर्देशही डॉ. सुर्यवंशी यांनी उपस्थितांना दिले.
 यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, किल्ले परिसराच्या स्वच्छतेला आणि पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने किल्ल्याची नियमित व विशेष स्वच्छता होणे आवश्यक आहे. त्यासाठी किल्ल्यावर प्लास्टिक कचरा निर्मूलनास प्राधान्य द्यावे. विशेष स्वच्छता मोहिमेसाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या श्रमदान शिबीरांचे आयोजन करावे, अशा सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
किल्ले रायगड जतन, संवर्धन व परिसर विकास आराखड्यासंदर्भात अधिक माहितीः-
  • मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने दि. 15 मार्च 2017 रोजी प्रस्तावित रु.606.09 कोटी रकमेच्या आराखडयास मान्यता दिली.  त्यानुसार 31 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये आराखडयास मान्यता मिळाली.
कामांचे स्वरुपः-

  • भारतीय पुरात्व विभागामार्फत त्यांच्या पर्यवेक्षणाखाली करावयाची कामे रु.124.15 कोटी.
  • रायगड किल्ला पाचाड येथील समाधी वाडा परिसरात पुरातत्व विभागाच्या पूर्व अनुमतीने घ्यावयाची कामे रु.49.53 कोटी.
  •  रायगड किल्ला परिसरात घ्यावयाची पर्यटनाची कामे रु.78.91  कोटी.
  • रायगड किल्ला परिसरातील मुलभूत सुविधांची व विकासाची कामे (7 कि.मी.परिघातील 21 गावे व त्याअंतर्गत वाड्या) रु.43.60 कोटी.
  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय भूतलपरिवहन मंत्रालयामार्फत आणि सार्वजनिक विभागामार्फत करावयाची कार्यवाही रु.206.04 कोटी.
  • भूसंपादन रु. 25 कोटी.
  • रज्जू मार्ग रु.50 कोटी.
  • आकस्मित खर्च 28.86 कोटी.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक