Posts

Showing posts from August 8, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
    अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका) :-   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 74   व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या सूचनांचे काटेकोर पालन करीत अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उ पजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार सचिन शेजाळ, सतिश कदम, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.   सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 74   व्या वर्धापनदिनानिमित्त

स्वच्छता व आरोग्य दोन्हींचा समतोल राखून जिल्ह्याचा, राज्याचा व आपल्या देशाचा विकास राखण्यात आपण सर्वजण पुढाकार घेवू या.. --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
    वृत्त क्रमांक:- 862                                                                                      दिनांक:- 15 ऑगस्ट 2021   अलिबाग,जि.रायगड दि.15(जिमाका) : -   स्वच्छता व आरोग्य दोन्हींचा समतोल राखून स्वत:च्या जिल्ह्याचा, राज्याचा व आपल्या देशाचा विकास राखण्यात आपण सर्वजण पुढाकार घेवू या, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 74 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री.बबन मनवे, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती गीता जाधव, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधि

स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त “फिट इंडिया फ्रीडम रन” चे शिरढोण येथे यशस्वी आयोजन

  अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका):-   येथील पनवेल तालुक्यातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीत शिरढोण येथे "स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी रॅली" तसेच फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले होते.    भारत सरकारच्या कला क्रीडा व युवा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र रायगड, रुरल एन्ड यंग फौंउडेशन,   ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी (पनवेल) आणि ग्राम पंचायत शिराढोण यांच्या   वतीने शुक्रवार, दि. 13 ऑगस्ट   रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीत म्हणजेच हुतात्मा स्मारक शिरढोण येथे   सकाळी 10.30   वाजता "स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी रॅली" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ.जी. जी.पारीख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, रायगड रुलर व यंग फाउंडेशन अध्यक्ष सुशील साईलकर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, नेहरु युवा केंद्राचे निशांत रौतेला,   नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   देशाच्या स्वातं

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधील इयत्ता 6 वी च्या नियमित तर 7 वी ते 9 वी च्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसूचित,आदिम जमातीच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

    अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका):-   सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षात राज्यातील आदिवासी विभाग विकास विभागांतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमांच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मधील इयत्ता 6 वी च्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.   त्यासाठी https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आवेदनपत्र ऑनलाईन भरून त्यासोबत मागील वर्षाची नवीन 900 गुणांचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्यांनी सरल पोर्टलवरील स्टुडन्ट आयडी माहीत असणे आवश्यक आहे. आवेदनपत्र ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत दि.31 ऑगस्ट 2021 पर्यंत राहणार आहे.   राज्यातील कोणत्याही व्यवस्थापनाच्या शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासन सक्षम अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झालेले आहे.  जिल्ह्यातील करोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा, पुणे यांनी दि.11 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या अहवालानुसार दोन रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासन सक्षम असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी  आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे. डेल्टा प्लस ची लागण व त्यातून बऱ्या झालेल्या तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे- उरण तालुक्यातील श्रीमती करुणा उदय म्हात्रे, वय वर्षे 44 यांची दि.5 जुलै 2021 रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांना घसा खवखवणे, ताप व खोकला ही लक्षणे होती. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. त्यांचे कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लसीचे (पहिला डोस दि.25 फेब्रुवारी 2021 व दुसरा डोस दि.8 एप्रिल 2021 रोज

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील 119 समूहांना रु.17 लाख 85 हजार फिरता निधी तर 11 समूहांना समूदाय गुंतवणूक निधी रु. 13 लाख 20 हजार वितरीत

    अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका):-   आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत मार्च 2021 ते ऑगस्ट 2021 या 75 आठवड्यांच्या कालावधीत “ आजादी का अमृत महोत्सव ” निमित्त मा. पंतप्रधान, भारत सरकार यांनी दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.30 वा. रोजी देशातील सर्व राज्यातील एन.आर.एल.एम. अभियानांतर्गत स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ, शेतकरी उत्पादक संघ, उत्पादक गट तसेच पंचायत राजस्वयंसहायता समूह, ग्रामसंघ ,शेतकरी उत्पादक संघ उत्पादक गट तसेच पंचायतराज संस्थांमधील सदस्य यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. रायगड जिल्ह्यातील एन.आर.एल.एम अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(MSRLM)अंतर्गत उमेद अभियानातील 13 हजार 632 महिला स्वयंसहायता समूहातील   52 हजार   529   ग्राम संघ व स्वयं सहाय्यता समूहाच्या महिलांनी यात सहभाग नोंदविला असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील 119 समूहांना रु.17 लाख 85 हजार इतका फिरता निधी   तर 11 समूहांना रु. 13 लाख 20 हजार   इतका समूदाय गुंतवणूक निधी   वितरीत करण्यात आला.   यावेळी रायगड

कौशल्य स्पर्धेकरीता इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):-   सन 2021-22 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने   47 क्षेत्रांशी संबधित जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने Skill Competition आयोजित करण्यात आ ली   आहे. ही   स्पर्धा आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद     (NSDC-   National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.   जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन दि.17   व दि.18 ऑगस्ट2021 या कालावधीत संबंधीत जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी आयोजन करण्यात येईल. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.   महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, 

जिल्हास्तरीय महसूल दिन साधेपणाने संपन्न जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अनोख्या संकल्पनेतून कु.साक्षी आयरेकर या निराधार विद्यार्थीनीच्या हस्ते गौरविण्यात आले उत्कृष्ट काम केलेल्या महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना

  अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):-   म हसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार जिल्हा स्तरावरील महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांचा निपटारा करणे इत्यादी कामे वेळेच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या आणि महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता तसेच महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दि. 01 ऑगस्ट हा दिवस "महसूल दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. तथापि, रायगड जिल्ह्यात दि. 21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे महाड व पोलादपूर तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. मौजे तळीये, ता. महाड व ता. पोलादपूर येथे काही गावात दरड कोसळून जीवित व वित्तहानी झाली. या संवेदनशील कारणास्तव यावेळी जिल्हास्तरीय महसूल दिन दि.06 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात अतिशय साधेपणाने पार पाडला.   कार्यक्रमाच्या सुरुवातीस माहे जुलै, 2021 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद

मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग यांच्या न्यायदान कक्षामध्ये दि. 14 ऑगस्ट रोजी “मध्यस्थ जागृती” कार्यक्रमाचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):-   मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग यांच्या न्यायदान कक्षामध्ये शनिवार, दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता “ मध्यस्थ जागृती ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती विभा इंगळे या असणार आहेत तर जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी तसेच अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रवीण ठाकूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.   प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी हे करणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,अलिबाग श्री. आर. आर. पाटील हे “ मध्यस्थी प्रक्रिया ” या विषयावर प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी दिली आहे. 000000

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथील इयत्ता 8 वी ची प्रवेशपात्रता परीक्षा दि.18 डिसेंबर रोजी पुणे येथे

  अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):-   महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे.   ही परीक्षा दि. 18 डिसेंबर 2021 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे, याची नोंद घ्यावी.   या परीक्षेसाठी उमेदवाराचे (विद्यार्थ्यांचे) वयोमर्यादा (वय) दि.01 जुलै 2022 रोजी 11 1/2 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच विद्यार्थ्याचा उमेदवाराचा जन्म दि.02 जुलै 2009 च्या आधि व दिनांक आणि 01 जानेवारी 2011 च्या नंतरचा नसावा अशी प्रवेशासाठी वयाची अट आहे.   शैक्षणिक पात्रता : विद्यार्थी (उमेदवार) दि.01 जुलै 2022 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा.   परीक्षा शुल्क : आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता.   परीक्षेसाठी मा.कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांच्याकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाच

जिल्हा न्यायाधीश कार्यालयातील जुने वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्यांनी मोहोरबंद किंमतीच्या निविदा सादर कराव्यात

    अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):- प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा न्यायाधीश-1 यांना मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील पुरविण्यात आलेले शासकीय वाहन मारुती बलेनो व्हीएक्सआय क्र. एम.एच.01/पीए/5050 हे दि.16 मे 2019 रोजी निर्लेखित करण्यात आले आहे. हे वाहन जास्त किंमत देवून खरेदी करु इच्छिणाऱ्या लोकांकडून मोहोरबंद किंमतीच्या निविदा मागविण्यात येत आहेत. हे वाहन जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्या न्यायालयाच्या आवारात पाहण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आले आहे. ते कार्यालयीन वेळेत इच्छुक लोकांना पाहता येईल.               ज्या कोणा इच्छुक व्यक्तीस हे वाहन खरेदी करावयाचे असेल त्यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या नावाने मोहोरबंद किमतीच्या निविदा दि.16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने सादर कराव्यात.दि 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्राप्त न झालेल्या निविदा किंवा अपूर्ण असलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत. अनामत रक्कम म्हणून रु.5

स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण

    अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दि. 15 ऑगस्ट, 2021 रोजी, सकाळी 09.05 वाजता, कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रायगड जिल्हा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. हा सोहळा घरी बसून पाहण्यासाठी   https://www.facebook.com/dioraigad06 या फेसबुक पेजला क्लिक करावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार असून या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा, अशी सूचना शासनाकडून देण्यात आली आहे. करोना

सुयोग्य बदलासह पीक स्पर्धा खरीप हंगाम 2021 साठी नव्याने स्पर्धा जाहीर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्याचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.               या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात आहे.         या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत :-     पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.          खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी). तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग,

महाड पूरग्रस्तांच्या नुकसान पंचनाम्याची माहिती प्रशासनाकडून जाहीर

  अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) :- दि.22 व   23 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरस्थितीचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत जवळपास पूर्ण झाले आहेत.   महाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात पूरामुळे नुकसान झालेल्या घरे, झोपडी, गोठा, दुकाने, टपरी यांच्या पंचनाम्याची माहिती पुढीलप्रमाणे- महाड शहर विभाग पंचनाम्यांची संख्या - पाणी शिरुन नुकसान झालेली घरे पूर्णत-56, अशत: 4 हजार 577   असे एकूण 4 हजार 633.   नुकसान झालेली घरे (इमारती) पक्की घरे पूर्णत:21, कच्ची घरे-7, एकूण-28, अंशत: पक्की घरे-760, कच्ची घरे-34,एकूण-794. दुकाने - पूर्णत:67, अंशत:-2 हजार 562, एकूण-2 हजार 629. टपरी- पूर्णत:6,अंशत:-53, एकूण-59. गोठे- पूर्णत:2, अंशत:-10, एकूण-12. झोपडी - पूर्णत:10, अंशत:-9, एकूण-19. महाड ग्रामीण विभाग पंचनाम्यांची संख्या - पाणी शिरुन नुकसान झालेली घरे पूर्णत-38, अंशत: 5 हजार 72   असे एकूण 5 हजार 110.   नुकसान झालेली घरे (इमारती) पक्की घरे पूर्णत:24, कच्ची घरे-16, एकूण-40, अंशत: पक्की घरे-1 हजार 99, कच्ची घरे-37,एकूण-1 हजार 136. दुकाने - पूर्णत:6, अंशत:-1 हजार 74, एकूण

"माझी शेती..माझा सात बारा..मीच भरणार माझा पीक पेरा" जिल्हा नियोजन भवनात ई-पीक पाहणी प्रकल्प कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील तालुका मास्टर ट्रेनर, तलाठी, कृषी सहायक यांची प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे नुकतीच पार पडली.             या कार्यशाळेस जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीसह निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.               श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, उरण तलाठी शशिकांत सानप यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.             या प्रशिक्षण कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी ई-पीक पाहणी आजच्या काळाची गरज असून शेतकऱ्यांना आपले स्वतः घेतलेले पीक ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा दिल्यामुळे अचूक पीक पेरा नोंदविण्यात येईल, असे मत नोंदविले.             राज्यात दि.15 ऑगस्ट 2021 पासून राज्यातील सर्व शेतकरी हे त्यांनी पेरलेले/लावलेले शेतातील पीक हे तलाठी यांना ऑनलाईन ई पीक ॲप च्या माध्यमा

ई-पिक पाहणी कार्यक्रमाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

    अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका) :- क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा वस्तुनिष्ठ पीक पेऱ्याची व पिकांची माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने शासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.             ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे इत्यादी उद्देशाने पीक पेरणीची माहिती नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी ही माहिती स्वतः भ्रमणध्वनीद्वारे मोबाईल ॲप च्या माध्यमातून "ई पीक पाहणी" हा कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून राबविण्यात येणार आहे. त्यांच्या तांत्रिक व इतर अनुषंगीक बाबींच्या सहाय्याने व सहकार्याने दि. 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यात महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या हा कार्यक्रम राबविण्याचा   निर्णय घेण्यात आला आहे.             त्यानुषंगाने जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची जिल्हा

जागतिक आदिवासी दिनास रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका) :- दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये कृषीमंत्री दादाजी भुसे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.   रायगड जिल्ह्यातील 22 आदिवासी शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता.   महोत्सवामध्ये या शेतकऱ्यांना 39 प्रकारच्या विविध रानभाज्या प्रदर्शन व विक्रीकरिता ठेवल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने करटोली, सुरण, टाकळा, आळू, अंबुशी, भुई आवळा, भारंगी, कुरडू, कुडा, काटेमाठ, चंदन, बटवा, चाईचा वेल, बहावा, बांबूचे कोंब, रानकेळी यांचा समावेश होता.   कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत रायगड जिल्ह्यामध्ये दि.09 ते 15 ऑगस्ट 2021 च्या कालावधीमध्ये तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे नियोजन केले असून रोहा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.       आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनांवर अवलंबून आहे. त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. रानभाज्या पूर्णपणे न