स्वच्छता व आरोग्य दोन्हींचा समतोल राखून जिल्ह्याचा, राज्याचा व आपल्या देशाचा विकास राखण्यात आपण सर्वजण पुढाकार घेवू या.. --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 

 वृत्त क्रमांक:- 862                                                                                     दिनांक:- 15 ऑगस्ट 2021

 



अलिबाग,जि.रायगड दि.15(जिमाका) :- स्वच्छता व आरोग्य दोन्हींचा समतोल राखून स्वत:च्या जिल्ह्याचा, राज्याचा व आपल्या देशाचा विकास राखण्यात आपण सर्वजण पुढाकार घेवू या, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 74 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री.बबन मनवे, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती गीता जाधव, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे,, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, पजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, जिल्हा उपनिबंधक गोपाळ माळवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) नितीन मंडलिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्रीम.शितल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) डॉ.ज्ञानदा फणसे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरुड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार सचिन शेजाळ, सतिश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 

सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर तंबाखू मुक्तीबाबत उपस्थित सर्वांनी शपथ घेतली.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे आलेला महापूर,दरड दुर्घटना व करोना या संकटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

उपस्थितांना संबोधताना त्या पुढे म्हणाल्या, आपले स्वातंत्र्य अबाधित राहावे, यासाठी आपले जवान देशाच्या सीमेवर रात्रंदिवस जागता पहारा देत आहेत. त्यामुळेच आपण आज सुरक्षित आहोत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, हे आपलं कर्तव्यचं आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या भारताची मान जगभरात उंचावणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमधील सर्व पदक विजेत्यांना पालकमंत्री कु.तटकरे यांनी रायगडवासियांकडून भरभरुन शुभेच्छा दिल्या व  या यशातून ऑलिम्पिकमधील विविध खेळात यशाची शिखरे गाठण्यास देशातील खेळाडूंना भविष्यात नक्कीच मदत होईल, ही सदिच्छा व्यक्त केली.

त्या पुढे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे कोकणात निर्माण झालेल्या पूरस्थितीत मदत व कर्तव्याच्या भावनेने राज्य व देशभरातून आलेल्या मदतीसाठी रायगड जिल्हा सदैव ऋणी राहील. बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आपत्कालीन यंत्रणा (एनडीआरएफ,एसडीआरएफ, टीडीआरएफ), तसेच जीव झोकून जबाबदारीने मदत करणारे जिल्हावासीय, लोकप्रतिनिधी व सर्व शासकीय यंत्रणांचे या सोहळ्याच्या अनुषंगाने आवर्जून आभार व्यक्त करते. या आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य व मदतकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा आज प्राथमिक स्वरूपात जरी गौरव होत असला तरी सर्व सेवाभावी संस्था व पत्रकार, नागरीक यांचा शासनाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येईल. 

जगभर पसरलेल्या कोरोनाचा प्रादूर्भाव गेली 2 वर्षे आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय यंत्रणा अधिक मजबुतीने उभी करुन आरोग्य सुविधा संपन्न रायगड जिल्हा करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यानुसार अनेक महत्त्वाच्या बाबी पूर्णत्वासही आल्या आहेत. कोकणाला धडकणारी निसर्ग-तोक्तेसारखी चक्रीवादळे, वातावरणीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती यामध्ये शासकीय यंत्रणांचा नेहमीच कस लागतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा अधिक बळकट करण्याचा प्राधान्याने प्रयत्न आपण करीत आहोत, असे सांगून त्यांनी या प्रयत्नांना मोलाचे सहकार्य देणारे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री ना. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार व विविध विभागांचे सन्माननीय मंत्री महोदय व सहकारी यांचे विशेष आभार व्यक्त केले.

            पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे आपत्तीग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत देण्यात येत आहे. मौजे तळीये, साखर सुतारवाडी, केवनाळे व इतर दरडग्रस्त गावांत राज्य शासनाकडून लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मागील काही वर्षांतील चक्रीवादळे व नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन जिल्ह्यात कायमस्वरुपी एनडीआरएफ व एसडीआरएफ बेसकॅम्प उभारणीसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला आहे.  त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या कार्यालयांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तलाठी/मंडळ अशा विविध कार्यालयासाठी शासकीय जमीन प्रदान करण्यात आल्या असून इमारती उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.कायदा व सुव्यवस्था बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस यंत्रणेसाठी भरीव तरतूद सुपूर्द करण्यात आली आहे.

आपल्या भाषणात जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, रायगड जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा देण्याचा आपला मानस आहे. श्रीवर्धन, मुरूड व अलिबाग या पर्यटन स्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्रदान केला असून त्यातून अनेक पर्यटन विकासकामे करण्यात येत आहेत. प्रस्तावित सागरी महामार्ग-पर्यटनासाठी नवी दिशा देणारा ठरेल. सुमारे 13 खाड्यांवर 13 आयकॉनिक पूलांच्या निर्मितीने 93 पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचा प्रकल्प आराखड्यात समावेश आदी महत्त्वाच्या बाबींमुळे पर्यटन विकास कार्यक्रमातून पर्यटन व रोजगार निर्मिती होणार आहे.

            आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी कर्जत तालुक्यातील पाथराज व पिंगळज येथे आश्रमशाळा व वसतिगृह बांधकामासाठी 40 कोटींच्या भरीव निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. आदिवासी जमातीकरिता (कातकरी) बहुउद्देशीय निवासी शैक्षणिक संकुल निर्मितीसाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली आहे, असे सांगून जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत त्या पुढे म्हणाल्या, आपल्या रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील न्यायालयीन सुविधा मजबूत करण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करीत आहोत. आपल्या रायगडकरांचे स्वप्नं म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 406 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून इतर शासकीय बाबींची पूर्तता लवकरच पूर्ण होऊन प्रत्यक्षात महाविद्यालयाचे बांधकाम सुरू होईल.  कोकणातील क्रीडा प्रेमी व खेळाडूंसाठी उपलब्ध होणार असलेले विभागीय क्रीडा संकुल तसेच दिवेआगर (श्रीवर्धन) मधील सुपारी संशोधन केंद्र, रायगड जिल्ह्यातील पनवेल-नवी मुंबई मध्ये उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे, विरार-अलिबाग कॉरिडोर आदी महत्वाच्या प्रकल्पातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.  

            राज्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाबाबत बोलताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यभरात राबविला जाणारा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी व्यक्त केला आहे. ई- पीक पाहणी प्रकल्प महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येणार असून 'विकेल ते पिकेल' या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प असणार आहे. पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑनलाईन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता 8 अ सुध्दा ऑनलाईन करण्यात आला आहे. हवामानात दररोज बदल होत आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. 

शेवटी स्वातंत्र्यदिनाच्या या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना पालकमंत्री कु.तटकरे यांनी उत्तम आरोग्यासाठी आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी चांगल्या प्रकारे घेत आहोत, घेत राहू. स्वच्छता व आरोग्य दोन्हींचा समतोल राखून स्वत:चा, जिल्ह्याचा, राज्याचा व आपल्या देशाचा विकास राखण्यात आपण सर्वजण पुढाकार घेवू या, असे आवाहन करुन  रायगडाचा कणखरपणा इथल्या मातीत व प्रत्येक जनमाणसात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने प्रत्येक आव्हानास तोंड देण्याची ताकद आम्हांस मिळावी, अशी ईश्वरास प्रार्थना केली.

उपस्थितांना संबोधित केल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे व इतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा, संस्थांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, नागरिक यांची भेट घेतली.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा

पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव

        विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, सामाजिक संस्थांचा, व्यक्तींचा व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

ठाणे महानगरपालिका आपत्ती प्रतिसाद दल- आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम, राज्य आपत्ती प्रतिसाद दल- पोलीस निरीक्षक कैलास पवार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- निरीक्षक श्री.यावले, साळुंके रेस्क्यू टीम- श्री प्रशांत साळुंखे, महेश सानप रेस्क्यू टीम- श्री.महेश सानप, कोलाड, तळीये ग्रामस्थ मंडळ, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल व पंचक्रोशी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने तळीये सरपंच श्री.संपत तांदळेकर, मुंबई महानगरपालिका टीम- विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी, ठाणे महानगरपालिका टीम- अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, पनवेल महानगरपालिका टीम- उपायुक्त सचिन पवार, नवी मुंबई महानगरपालिका टीम- जयदीप पवार, महाड नगरपालिका टीम- मुख्याधिकारी जीवन पाटील, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान- श्री. विलास जाधव, श्री.अरुण चांदोरकर, श्री जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री संप्रदाय दक्षिण पीठ नाणीजधाम- अध्यात्मिक प्रमुख श्री मनीष पोतदार, संत निरंकारी मंडळ, महाड- प.पु. श्री. प्रकाश म्हात्रे, प.पु.श्री. प्रवीण पाटील, श्री गणेश फायर इक्विपमेंट सर्विस, महाड- शशिकांत कदम, अंजुमन दर्दमन तालीम व तरक्की ट्रस्ट, महाड- मुप्ती रफिक पुरकर, जैन नवयुवक मंडळ, पारोळा,जिल्हा जळगाव- श्री.उमेश जैन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, लोणेरे टीम, माणगाव – डॉ.पोरे, साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठान, माणगाव- श्री.सतीश शिर्के, एन.ए.आर.डी.ई.सी.ओ.- श्री अशोक मोहनानी, टाटा स्टील- श्री. कपिल मोदी, पनवेल गुरुद्वारा- जितेंद्रसिंग सिद्धू, जेएसडब्ल्यू डोलवी,पेण- प्रतिनिधी.

श्री.नसीर समशेद्दिन नाडकर, माटवण, श्री.पांडुरंग विष्णू सुतार, नारायण गुणाजी सुतार, पांडुरंग तुळशीराम सुतार, सहदेव बारकू सुतार, धोंडीराम सोनू दाबेकर, युवराज कृष्णा दाबेकर, सचिन कोंडीराम खेडेकर (केवनाळे), अमरदीप मंगेश नगरकर, राहुल धर्माजी ससाणे, संजय उद्धवराव कांबळे (पोलादपूर).

कोविड-19 जनजागृती व कोविड रुग्ण समुपदेशन स्वयंसेवक- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती- संदीप गायकवाड, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था- उदय गावंड, अंकुर ट्रस्ट पेण- डॉ. वैशाली पाटील, लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट- श्री.गौतम कनोजे, दिशा केंद्र, कर्जत- उज्जैन शिरसाठे.

 काशीद पूल दुर्घटनेमध्ये बचावकार्य केलेला ‍श्री.सागर भायदे, वय वर्ष 10.

दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती व कर्मचारी यांच्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच वरिष्ठ सहाय्यक, समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग- श्री.साईनाथ दत्तात्रय पवार यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

दि. 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये शोध बचाव व मदत कार्यासाठी बहुमोल मदत करणाऱ्या संस्था, स्वयंसेवक व नागरिक- याहा वॉटर स्पोर्ट्स, आरवी, ता. श्रीवर्धन- अरमान इक्बाल राऊत, जमातुल मुस्लिमीन, म्हसळा- समीर चोगले, सहजसेवा फाउंडेशन, खोपोली, ता.खालापूर- श्री.शेखर जांभळे, खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन, खोपोली, ता. खालापूर- श्री.अतिक खोत, गम्प्रो कंपनी, ढेकू, खालापूर- श्री आनंद गुप्ता, जमेत-ए- उलेमा, जिल्हाध्यक्ष, रायगड- काझी हुसेन माहिमकर, दंगल नियंत्रण पथक, पोलीस अधीक्षक, कार्यालय, रायगड.

करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या सूचनांचे काटेकोर पालन करीत या सोहळयासाठी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक