Posts

Showing posts from March 31, 2019

वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने दखल

Image
रायगड-अलिबाग दि २: माणगाव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत असून काल तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे त्यांच्या माहेरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली व वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी वीर पत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या अनुषंगाने तहसीलदार आयरे यांना लक्ष्मीबाई यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना कुठल्या अडचणी येत आहेत याविषयी विचारणा करण्यास सांगितले होते. वीर पत्नी   लक्ष्मीबाई या १०० वर्षांच्या आहेत.   त्याप्रमाणे काल प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे जाऊन त्यांची   व्यवस्थित विचारपूस केली व वैद्यकीय उपचार मिळत आहेत किंवा नाही ते पाहिले. सध्या त्यांच्यावर कौटुंबिक डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. लक्ष्मीबाई यांना स्मृतीभंशाचा आजार असून सध्याचे उपचार पुरेसे आणि योग्य आहेत असे त्यांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांनी सांगितले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार   वीरपत्नी लक्ष्मीबाई यां

दोन उमेदवारांचे अर्ज सादर एकूण आठ उमेदवार

Image
रायगड-अलिबाग दि १: ३२- रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज आणखी दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली. अशोक दाजी जंगले   (अपक्ष) आणि सुमन भास्कर कोळी   ( वंचितबहुजन आघाडी ) अशी या उमेदवारांची नावे आहेत. यामुळे आता एकूण नामनिर्देशन पत्रे भरलेल्या उमेदवारांची संख्या आठ झाली आहे. --------------------------
Image
रायगडात आजपर्यंत ६ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सादर रायगड-अलिबाग दि २: ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आजपर्यंत एकूण ६ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे सादर केली आहेत. या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: श्री अनंत गंगाराम गीते (शिवसेना) श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष) श्री तटकरे सुनील दत्तात्रय (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) श्रीमती तटकरे अदिती सुनील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) संजय अनंत पाशिलकर (बळीराज पार्टी) नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी )
Image
आचारसंहिता भंगाबाबत आत्तापर्यत ४   गुन्हे दाखल; २६ हजार लिटर दारू, सोने जप्त ------------------ पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल ----------------------- जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांची पत्रकार परिषद रायगड-अलिबाग दि २८:   आजपासून ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील एका जागेसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी तीन अर्ज सादर केले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली. आजपासून नवी दिल्लीहून खर्च निरीक्षक निलंक कुमार नियुक्त झाले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. आचारसंहिता भंगाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईत २६ हजार ३६१ लिटर दारू तर १४७१ ग्राम सोने जप्त करण्यात आल्याचेही ते म्हणाले.जप्त सोन्याची किंमत ४२ लाख ७१ हजार रुपये आहे तर २ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.    या पत्रकार परिषदेस सहायक निवडणूक अधिकारी शारदा पोवार आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने देखील उपस्थित होत्या   दोन उमेदवारांचे तीन अर्ज आज नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याच्या पहि

राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 7 हजार 600 हून अधिक रायगडमध्ये 2693 मतदान केंद्रे

रायगड दि. 31 : लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 7 हजार 600 हून अधिक मतदान केंद्र आहेत. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे.   रायगड मध्ये ग्रामीण भागात 2470 तर शहरी भागात 220 अशी 2693 मतदान केंद्रे आहेत. शहरी भागात मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असून पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. राज्यात सुमारे 1300 पेक्षा जास्त मतदान केंद्र वन आणि अर्ध वन भागातील असून 90 हजार पेक्षा जास्त मतदान केंद्र शाळा, महाविद्यालये आणि शासकीय इमारतींमध्ये आहे. निवडणूक प्रक्रियेतील अविभाज्य घटक म्हणून मतदान केंद्र ओळखले जाते. मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याकरीता मतदान केंद्र महत्वाची भूमिका बजावतात. बहुतांश मतदान केंद्र शासकीय इमारत अथवा शाळा, महाविद्यालयांमध्ये असतात. काही वेळेला तात्पुरत्या स्वरुपात मतदान केंद्र देखील उभारले जातात. यावर्षीच्या निवडणूकांसाठी सुमारे 1100 मतदान केंद्र तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आले आहे.   केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध अत्यावश्यक सुविधा मतदान क

निवडणूक चिन्हांवर डिजिटल साधनांचा प्रभाव 198 मुक्त चिन्हं उमेदवारांना उपलब्ध

मुंबई, दि. 31 :   लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा   दुपटीनहून अधिक वाढ करण्यात आली आहे. 198 निवडणूक चिन्हे ‘मुक्त चिन्हे’ (फ्री सिम्बॉल्स) घोषित करण्यात आली असून त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येतो. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. 2014 च्या निवडणुकांमध्ये 87 मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करुन यावर्षी 198 मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन दिली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विहीत पद्धतीने चिन्हांचे वाटप केले जाते. दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश कर