Posts

Showing posts from January 9, 2022

मराठी भाषा संवर्धनासाठी आपण सारे होऊ कटिबद्ध..! -पत्रकार नागेश कुलकर्णी

    अलिबाग,दि.14 (जिमाका) :- शासनाने दि.14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 हा कालावधी “ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ” साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शासनाच्या या स्तुत्य उपक्रमात समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे, तुम्ही-आम्ही सारे या निमित्ताने मराठी भाषा संवर्धनासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष श्री.नागेश कुलकर्णी यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ” या उपक्रमाचा दिमाखदार उद्घाटन कार्यक्रम कोविड मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार विशाल दौंडकर व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. श्री.नागेश कुलकर्णी पुढे म्हणाले की, मराठी भाषा आपला स्वाभिमान आहे. आपल्या मात

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना

            असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे.         त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा महामहोत्सव सुरु झाला आहे. जिल्ह्यात नागरी सुविधा केंद्रामार्फत ऑक्टोबर 2021 पासून नोंदणीचे कामकाज सुरु करण्यात आले असून आतापर्यंत 78 हजार 270 असंघटित कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करण्यात आली आहे.     जिल्ह्यातील ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा असंघटित कामगारांनी www.eshram.gov.in या लिंकद्वारे ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि रायगड कामगार उपायुक्त श्री. प्र.ना.पवार यांनी केले आहे. योजनेचे लाभ :-   ● असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.   ● शासन असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्र

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली 5% दिव्यांग कल्याण निधी सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

    अलिबाग जि.रायगड,दि.11 (जिमाका):-   शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्व-उत्पन्नाचा 5% निधी दिव्यांग कल्याणासाठी राखून ठेवणे अनिवार्य आहे. त्यासाठी राखून ठेवलेल्या निधीचे नियंत्रण करण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची बैठक आज मंगळवार, दि.11 जानेवारी 2022 रोजी पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील "राजस्व" सभागृहात संपन्न झाली. या बैठकीस रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती श्री.दिलीप भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री.सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी श्री.गजानन लेंडी, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.भगवान घाडगे तसेच अशासकीय सदस्य श्री.साईनाथ पवार, श्रीम. रंजना सत्वे, श्री.दिगंबर पवार आदि मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सन 2021-22 मध्ये जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण निधीच्या नियमित योजनांचा व अनुशेष रक्कमेचा पालकमं

ई-संजीवनी ओ.पी.डी.मार्फत डॉक्टरांचा सल्ला मिळवा घरबसल्या

    अलिबाग जि.रायगड,दि.11 (जिमाका):-   "हॅलो…डॉक्टर साहेब पोट दुखतंय, खोकला येतोय, औषध सांगा अशा प्रकारचा ऑनलाईन संवाद केवळ ई-संजीवनी ओ.पी.डी. मुळे शक्य झाला आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयामध्ये जाऊन रांगेत उभे न राहता घरबसल्या मोफत उपचार मिळत आहेत. या वैद्यकीय सुविधेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे. राज्यात गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये शासनप्रणित ई-संजीवनी ऑनलाईन मोफत ओ.पी.डी. सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 16 महिन्यात या सेवेचा 93 हजार 649 रुग्णांनी लाभ घेतला आहे. सोमवार ते रविवार सकाळी 09.30 ते दुपारी 1.00 आणि तर दुसऱ्या सत्रात दुपारी 01.45 ते सायंकाळी 5.00 या वेळेमध्ये या सेवेचा लाभ घेता येतो. यामध्ये "एस.एम.एस." द्वारे ई-प्रिस्क्रीप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रीप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात. या योजनेचा वापर करताना लॉग-इन करताना कुणाला काहीही अडचण येत असेल तर जिल्हा सामान्य रुग्णालय, र

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

  अलिबाग जि.रायगड,दि.11 (जिमाका):-   जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे   कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय,निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण   सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित   कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या   www.mahaswayam.gov.in   या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार डिसेंबर, 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांखिकी   माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु असून, या सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्डचा वापर करुन या विभागाच

ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, दि.10 (जिमाका):- राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे- मंगळवार, दि.11 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.00 वा. पर्णकुटी, शासकीय बंगला, मलबार हिल, मुंबई येथून महालक्ष्मी रेसकार्सकडे प्रयाण. सकाळी 10.10 वा. महालक्ष्मी हेलिपॅड, महालक्ष्मी रेसकार्स, मुंबई येथे आगमन. सकाळी 10.15 वा.महालक्ष्मी रेसकार्स हेलिपॅड, मुंबई येथून हेलिकॉप्टरने भिरा ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा.भिरा हेलिपॅड, ता.माणगाव येथे आगमन व मुंबई-गोवा मार्गे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या बामणोली रोड, माणगाव निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निवासस्थान येथे आगमन. सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वा. प्रधान सचिव, ऊर्जा व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण यांच्या समवेत बैठकीकरिता राखीव.   दुपारी 1.45 वा. भिरा, टाटा पॉवर प्लांट येथे आगमन. दुपारी 1.45 ते सायंकाळी 4.00 वा. भिरा टाटा पॉवर पहाणी दौरा व बैठकांकरिता राखीव. सायंकाळी 4.00 वा. भिरा हेलिपॅड ता.माणगाव येथून महालक्ष्मी हेलिपॅड मुंबईकडे प्रयाण. 00000

प्रशासकीय कामकाजात मराठी भाषा वापरासंबंधीच्या तक्रारी व निवारणासाठी मराठी भाषा समिती स्थापन

    अलिबाग, दि.10 (जिमाका):- प्रशासकीय कामकाजात मराठी भाषा वापरासंबंधीच्या तक्रारी व निवारणासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम 2021, अधिसूचना दि.16 जुलै 2021 महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे.   या अधिनियमातील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर न करण्यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करुन तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापना या सर्व कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे याबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व मराठी भाषेसंदर्भातील उपक्रम राबविण्यासाठी या अधिनियमातील नियम 5 ड नुसार मराठी भाषा समिती गठीत करण्याचे नमूद आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मराठी भाषा समिती गठीत केली असून अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे असून उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर

विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडी-पूलावरील वाहतूक बंदी आदेश जारी

  अलिबाग, दि.10 (जिमाका):- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी कळविल्यानुसार विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडी-पूलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूलाच्या दुरुस्तीकरिता तसेच कोणतीही दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने दि.10 जानेवारी 2022 ते दि.10 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्या कार्यक्षेत्रातील विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडीवरील टोळ पूल हा एकूण 157 मीटर लांबीचा मोठा पूल आहे. हा पूल कमकुवत झाल्याने अधीक्षक अभियंता, संकल्प चित्र मंडळ (पूल) यांनी सुचविल्याप्रमाणे पूलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश मे.डायनासोर काँक्रीट ट्रीटमेंट प्रा.लि.यांना देण्यात आले असून दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत या पूलाच्या एकूण 3 पिअर पैकी 3 पिअरचे काम पूर्ण झाले असून, Neoprene Pad And Bearing बदलायचे काम करण्याचे बाकी आहे. आता पूलाच्या बेअरिंग बदलणे व पेडस्टची