पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली 5% दिव्यांग कल्याण निधी सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

 

 

अलिबाग जि.रायगड,दि.11 (जिमाका):- शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्व-उत्पन्नाचा 5% निधी दिव्यांग कल्याणासाठी राखून ठेवणे अनिवार्य आहे. त्यासाठी राखून ठेवलेल्या निधीचे नियंत्रण करण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची बैठक आज मंगळवार, दि.11 जानेवारी 2022 रोजी पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील "राजस्व" सभागृहात संपन्न झाली.

या बैठकीस रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती श्री.दिलीप भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री.सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी श्री.गजानन लेंडी, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.भगवान घाडगे तसेच अशासकीय सदस्य श्री.साईनाथ पवार, श्रीम. रंजना सत्वे, श्री.दिगंबर पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत सन 2021-22 मध्ये जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण निधीच्या नियमित योजनांचा व अनुशेष रक्कमेचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिव्यांगांना मूलभूत सोयी-सुविधा तसेच त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबविण्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, असे सांगितले. दिव्यांग कल्याणामध्ये रायगड जिल्हा परिषदेस यापूर्वीच भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याने दिव्यांगांच्या कल्याणासाठी सातत्याने नव-नवीन उपक्रम राबविण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असतो, असे या समितीचे अशासकीय सदस्य श्री.साईनाथ पवार व श्री.दिगंबर पवार यांनी माहिती दिली. सहाय्यक सल्लागार श्री.किशोर वेखंडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक