Posts

Showing posts from February 11, 2024

म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Image
    रायगड दि.17 (जिमाका) :-  महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी रु.43 कोटी इतक्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. म्हसळा येथे आयोजित कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, खासदर सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या प्रकल्पाच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या स्वराज

महाराष्ट्राची लोकधारा' कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला परिसर

Image
रायगड दि.16 (जिमाका) :-  निर्माता रत्नकांत जगताप यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याऱ्या कार्यक्रमातील शिवराज्यभिषेक प्रसंगाने उपस्थितीत रसिक भारावून गेले. 'जय भवानी.. जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय. !' या जयजयकारांने परिसर दूमदुमला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील पोलीस परेड मैदानावर महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम काल झाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.        स्थानिक कलाकार अमोल कापसे यांनी सादर केलेला अवतार गाथा 'कार्यक्रम उपस्थितांचे उत्कृष्ट मनोरंजन करुन गेला. यानंतर 'महाराष्ट्राची लोकधारा' या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. गणेश नमनाने दमदार सुरुवात करत 'बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल.. करावा विठ्ठल..' तसेच 'कानडा राजा पंढरीचा' अशा गीतातून साकारलेल्या  पंढरीच्या वारीने उपस्थित रसिकांनाही वारकरी बनविले. 'झूंजूमुंजू पहाट झाली.., नभं उतरु आलं.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

  रायगड दि.16(जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि.21 फेब्रुवारी 2023 ते दि.19 मार्च 2024  या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा दि.01 मार्च 2024 ते दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ, वाशी नवी मुंबईचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे. या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक/शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा दि.15 फेब्रुवारी 2024 पासून कार्यान्वित करण्यात आली

अनुसूचित जाती (sc) प्रवर्गासाठीचे 18 दिवसीय निवासी उद्योजकीय प्रशिक्षणाचे समारोप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

    रायगड दि.16(जिमाका) :-   उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शांसन  मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(MCED) रायगड आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक,व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण नुकतेच आज अलिबाग येथील तारांगण रिसॉर्ट मध्ये सामारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, रायगडचे  प्रकल्प अधिकारी  आनंद विद्यागर, उद्योजक ज्ञानदेव खंडारे, प्राध्यापक श्री.आचार्य, दयानंद चतुर  हे उपस्थित होते. यावेळी श्री.विद्यागार यांनी  मार्गदर्शन  करुन   मागील 18 दिवसांचा  प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा सादर केला.  त्यामध्ये उद्योग निवडी पासून उद्योग सुरु करण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.  उद्योग संधिशोध CFTRI डायरेक्टर  डि.के. आहुजा, इंडीयन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकींगचे श्री.धोपटे, श्रीमती इंद्रायणी लोटणकर, राजेश कांदळगा

खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग औद्योगिक क्षेत्राकरिता मनाई आदेश जारी

    रायगड दि.16(जिमाका) :-  रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली रसायनी रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिदू-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधुन मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम व्यक्तीमध्ये दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याची जातीय व धार्मिक घटना घडत असतात.  त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थितो निर्माण होत आहे. दि. 23 जानेवारी 2024 पासून राज्यस्तरीय महाआंदोलन समितो महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्याध्यक्ष,श्री.जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे,कोळीवाड्याचे सिमाकंन करावे, मच्छिमार बांधवाना उर्वरित डिझेल परतावा मिळावा इतर मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे. दि.18

चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी इच्छूकांनी अर्ज सादर करावेत--उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते

    रायगड दि.16(जिमाका) :-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जड वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या परिवहन विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते यांनी केले आहे. तसेच एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता कार्यालयोन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये घालून कार्यालयात जमा करावा. अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनार्जर्पण चा विचार केला जाणार नाही. सद

संत सेवालाल महाराज यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

       अलिबाग, दि. 15 (जिमाका):- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) शसंतोष शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.       यावेळी तहसीलदार (सा. प्र.)उमाकांत कनडोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय कंदेवाड यांची जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागस सदिच्छा भेट

Image
    रायगड दि.15(जिमाका):-  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा, मुंबई येथील अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय कंदेवाड यांनी  जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,आयसीटीसी, एआरटी केंद्र, रक्तपेढी, गुप्तरोग विभागास सदिच्छा भेट देवून सदरील विभागाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. सर्व प्रथम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल  जोशी यांनी अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय कंदेवाड याना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  या भेटी दरम्यान डॉ.विजय कंदेवाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी डापकू कार्यालयामार्फत केल्या गेलेल्या कामाचा सविस्तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे आढावा दिला. त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 14 स्टॅन्ड आलोन आयसीटीसी, 1 मोबाइल आयसीटीसी व्हॅन, 1 तीन टेस्ट पीपीपी, 63 एफआयसीटीसी प्राथमिक आरोग्य केंद्र, 123 एफआयसीटीसी पीपीपी  (64 Type ‘B’ PPP, 59 Type ‘C’ PPP), 3 एआरटी केंद्र (1 MSACS, 2 खाजगी), तसेच 11 लिंक एआरटी केंद्र, 1 DSRC केंद्र, 5 रक्तपेढी ( 4 नको अनुदानीत 1 खाजगी), 3 एनजीओ, 1 CSC केंद्र  कार्

डाक विभागातील निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडविण्यासाठी डाक अदालतीचे आयोजन

    रायगड दि.15(जिमाका):- डा क विभागाच्या निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पोस्टमास्टर जनरल ,   नवी मुंबई यांनी दि.27    फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता   पोस्टमास्टर जनरल ,   नवी मुंबई रिजन कार्यालय ,  दुसरा माळा ,  पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत    नवीन पनवेल येथे   पेन्शन   डाक   अदालत    आयोजित करण्यात आली असून तक्रारदारांनी या डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा डाक अधीक्षक रायगड सुनील थळकर यांनी केले आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.   यामध्ये निवृत्तीधारकांच्या लाभाशी संबधित तक्रारी तसेच जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत ,  ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे ,  ज्यांना तीन महिन्याच्या आत निवृतीवेतनाची पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणाचा या डाक आदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे.   यात फक्त न्यायालयात असणारी ,  कायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणे ,  टीबीओपी ,  एमएसीपी ,  वेतनश्रेणी वाढवणे ,  शिस्तभंग हे विषय या अदालतीमध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे पेन्शनर असोसिएशन कडून आलेल्या प्रकरणावर ही या आदलती मध्ये निर्णय घेता येत

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मागविण्यात आलेल्या दरपत्रके/निविदांची माहिती WWW.mahatenders.gov.in वेबसाईटवर प्रसिद्ध

  रायगड दि.15(जिमाका):- रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सर्व प्रकारच्या चारचाकी व दुचाकी शासकीय पोलीस वाहनांच्या दुरुस्तीकरीता लागणारे सुट्टे भाग खरेदी/दुरुस्ती तसेच कंपनीचे अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी/दुरुस्तीसाठी अंदाज खर्चाच्या स्थानिक दुकानदार यांच्याकडून पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग कार्यालयाकडून दरपत्रके /निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती  WWW.mahatenders.gov.in  या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. ००००००

पोवाडा, लोकगीते, पारंपरिक गीतांच्या बहारदार कार्यक्रमात रायगडकर रसिक तल्लीन

Image
    रायगड दि.15(जिमाका):-  कोकणातील पारंपरिक लोककला त्याचबरोबर कलावंताचा गीत, संगीत, मराठी सण उत्सव परपंरांवर आधारित पोवाडा, लोकगीते, पारंपरिक गीत तसेच सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या मराठी सांगीतिक कार्यक्रमाने (बुधवार,दि.14 फेब्रुवारी) रोजी रायगडकर रसिक तल्लीन झाले. या दोन्ही कार्यक्रमाना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा मराठी सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  कलाकारांचा पोवाडा, लोकगीते, पारंपरिक गीतांच्या बहारदार कार्यक्रमात रसिक तल्लीन झाले अन्‌ त्यांनी या कलाविष्काराला भरभरून दाद दिली.  शुभेच्छा देताना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा मराठी सांगीतिक दिमाखदार कार्यक्रम अलिबाग येथे संपन्न झाला.  ही अलिबाग साठी मोठी
Image
  03 मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन   रायगड दि.14(जिमाका):-    जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात रविवार दि.03 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या माहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस देण्यात येणार आहे.  0 ते 05 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस पाजून लसीकरण मोहिम कार्यक्रमात सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.मनिषा विखे यांच्यासह सर्व तालुक्यातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिर्के म्हणाले की, संपूर्ण शासकीय यंत्रणा पोलिओ डोस देण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी ग्रामीण भागातील 55 प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरी भगातील बुथ उभारण्यात येणार असून

सरळसेवेतील गट-क पदांच्या भरतीसाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

रायगड दि.14(जिमाका):-    सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यासाठी कल्याण संघटक-40, वसतीगृह अधिक्षक-17, कवायत प्रशिक्षक -01, शारीरीक प्रशिक्षण निदेशक-01 गट 'क' या पदाकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधिक्षीका, गट-क-01 या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणी सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होवू शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींचो पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेला उमेदवारामधून दिव्यंगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता, उपलब्ध्तेनुसार भरण्यात येईल.  ही भरती प्रकिया टिसीएस-आयोएन यांच्यामार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणताही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब साईट ऑनलाईन अर्ज  www.mahasainik.maharashtra. gov.in  या संकेतस

महाराष्ट्राची संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव–पालकमंत्री उदय सामंत

Image
  रायगड दि.12(जिमाका):- महाराष्ट्राच्या संस्कृती मध्ये विविधता आहे. ही संस्कृती संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यशासनाने महासंस्कृती महोत्सव आयोजित केले आहे. यामुळे आपल्या लोक कला, संस्कृती यांचे जतन होणार असल्याचे असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.     सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील पोलीस परेड मैदान अलिबाग येथे आयोजित महा संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महिला व बालवकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,  आदी उपस्थित होते आज पहिल्या दिवशी आयोजित अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी कार्यक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.  स्थानिक कलाकारांचा शिवकालीन संस्कृती, मर्दानी खेळ, पोवाड्याच्या माध्यमातून गीत, संगीत आणि नृत्याविष्कारातून सादर करुन उपस्थितांची मन

कायदा, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही सर्व्हेलेंस यंत्रणा महत्वाची --पालकमंत्री उदय सामंत

Image
    रायगड दि.12(जिमाका):-   अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये अलिबाग शहरात असल्याने जिल्ह्यातील नागरिक शासकीय कामानिमित्त मोठ्या संख्याने अलिबाग शहरात येत असतात. तसेच अलिबाग शहर हे प्रसिद्ध पर्यटन केंद्र असल्याने शहरास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यामुळे अलिबाग शहरात तसेच शेजारील गावांमध्ये कायदा, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही सर्व्हेलेंस यंत्रणा महत्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत यांनी आज येथे केले.  अलिबाग शहरात कायदा, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हेलेंस यंत्रणा उभारणे कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्री.सामंत यांच्याहस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक संजय पा