डाक विभागातील निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडविण्यासाठी डाक अदालतीचे आयोजन

 

 

रायगड दि.15(जिमाका):-डाक विभागाच्या निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई यांनी दि.27  फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालयदुसरा माळापनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत  नवीन पनवेल येथे पेन्शन डाक अदालत  आयोजित करण्यात आली असून तक्रारदारांनी या डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा डाक अधीक्षक रायगड सुनील थळकर यांनी केले आहे.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. यामध्ये निवृत्तीधारकांच्या लाभाशी संबधित तक्रारी तसेच जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेतज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहेज्यांना तीन महिन्याच्या आत निवृतीवेतनाची पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणाचा या डाक आदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे. यात फक्त न्यायालयात असणारीकायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणेटीबीओपीएमएसीपीवेतनश्रेणी वाढवणेशिस्तभंग हे विषय या अदालतीमध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे पेन्शनर असोसिएशन कडून आलेल्या प्रकरणावर ही या आदलती मध्ये निर्णय घेता येत नाही.

तक्रारदाराने अर्ज करताना निवृत्तीधारकांचे नावकार्यालयाचे नावनिवृतीची तारीखपिपिओ क्रमांकपोस्टऑफिसचे नाव जिथून पेन्शन घेतली जात आहेपोस्टाचा पत्त्तादूरध्वनी क्रमांकथोडक्यात तक्रार अशा पद्धतीने अर्ज करावा. या पेन्शन अदालतीचा हेतू पेन्शन धारकांच्या समस्या वेगवान व प्रभावी रीतीने विनाविलंब सोडवणे हा आहे. या डाक अदालती धून डाक विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांना असणाऱ्या समस्यावरतक्रारीवर जागेवरच निर्णय घेऊन तोडगा काढण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तक्रारदारांनी आपला अर्ज नवी मुंबई रिजनसाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालयदूसरा माळापनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत  नवीन पनवेल 410206 येथे पाठवावा. 

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक