Posts

Showing posts from January 20, 2019

Raigad goes Mobile....

Image
Alibag Dist.Raigad, 26 (DIO)- Tourism of Raigad Disrict is now available on mobile. Raigad District administration has launched a mobile aap. Taigad Gudardian minister Ravindra chavan announced this in Republic Day function.   “Raigad”   the mobile aap is   to promote tourism in the district. A brainchild of the Collector Dr. Vijay Surywanshi, the App will give information about Raigad district’s tourist attractions, sites, forts, history, beaches and more. A special feature is also the SOS button provided for tourists to contact the district administration in case of an emergency. Users can download it from the google play store or App Store.  The link for the App is available on the district website  https://raigad.nic.in   This app will boost tourism in Raigad, said Guardian minister Chavan. 00000

आदीवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचे हितगुज

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26- जिल्ह्यातील विविध आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त   जिल्हाधिकारी बंगल्यावर आमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांना   जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटण्या बोलण्याची संधी मिळाली व स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.या सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांचे कुटूंबियही सहभागी झाल्याने हा सोहळ्या कौटुंबिक सोहळा झाला.              प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला निवृत्त ॲडमिरल एल. रामदास यांची सपत्निक उपस्थिती होते. या शिवाय जिल्हाधिकारी, त्यांच्या सहधर्मचारीणी डॉ.आरती सूर्यवंशी, त्यांचे अन्य कुटूंबिय या सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर , जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी   रविंद्र मठपती आदींसह जिल्ह्यातील अन्य प्रमुख अधिकारी तसेच पेण आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे

रायगड पर्यटनः मोबाईल ॲप पर्यटकांच्या सेवेत दाखल

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26 -   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून हे ॲप आज पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले असल्याची घोषणा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज केली. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात   त्यांनी ही घोषणा केली.   या ॲप मध्ये जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली असून तेथे पोहोचण्याचे मार्ग, वाहतकीची साधने, त्यांच्या उपलब्धता, राहण्याची, जेवणाची उत्तम ठिकाणे , खाद्यपदार्थ आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. पर्यटकांना आपत्ती प्रसंगी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांशी साधावयाच्या संपर्काची सोयही या ॲप मध्ये करण्यात आली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याची लिंक https://raigad.nic.in   या रायगड जिल्ह्याच्या वेबसाईटवरही उपलब्ध करण्यात आली आहे. याॲपमुळे रायगड जिल्ह्याचे पर्यटन आता मोबाईलच्या सहाय्याने करणे शक्य होणार

प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा शेतकरी, कामगार,कष्टकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध- ना. चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26 -   समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री   ना. रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उस्ताहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- एकात्मिक फलोत्पादन विकास   अभियान सन 2018-19 मध्ये मनुष्य्बळ विकास कार्यक्रमांतर्गत फळबाग, भाजीपाला,फळबाग व्यवस्थापन,एकात्मिक किड व्यवस्थापन काढणी पश्चात व्यवस्थापन,कृषि पर्यटन इत्यादी विषयावर खोपोली उपविभागाअंतर्गत खालापूर,कर्जत,पनवेल,उरण तालुक्यातील 80 शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील पाच दिवसांचे प्रक्षेत्र प्रशिक्षण (On Farm Training)सोमवार दि.4 ते 8फेब्रुवारी या कालावधीत उपविभाग सातारा,जिल्हा सातारा अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गुरुवार दि.31 रोजी सायंकाळी   चार वाजेपर्यंत नांव नोंदणी करावी,असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली यांनी केले आहे. 00000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार छाननी अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध ;आक्षेप-हरकती मागविल्या

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- सन 2017-18 या वर्षीच्या शिवछत्रपती राज्य् क्रीडा पुरस्काराचा प्राथमिक छाननी अहवाल www.mumbaidivsports.या संकेतस्थळावर राज्य क्रीडा पुरस्काराच्या लिंकवर क्लिक करुन www.xiroots.com या लिंकवर प्राथमिक छाननी पुरस्कार निहाय गुरुवार दि.24 पासून सोमवार दि.28 या कालावधीसाठी या.वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या बाबत काही हरकत नोंदविण्याची असल्यास वरील संकेतस्थळाला भेट देवनू देण्यात आलेल्या विहीत नमुना डाऊन लोड करुन त्यामध्ये आपली हरकत,आक्षेप नमूद करावी व नमूद केलेली हरकत, आक्षेप पुन्हा त्याच संकेतस्थळावर दिनांक 28 पर्यंत अपलोड करावी,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. 000000

राष्ट्रीय लोक अदालत 9 मार्च रोजी

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- - राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवार दि. 9 मार्च रोजी   रोजी जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग येथे आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.                         सदर लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे,138 एन. आय. ॲक्ट् खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांचेकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.             राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने ‍निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय   होत   नाही.पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि सदर लोकअदालतीचा जास्तीत जास्त

राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम मतदान हक्क अंमलबजावणीसाठी जागरुक रहा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 25 -   लोकशाहीत मतदाराला दिलेला मतदानाच्या अधिकार हा सर्वोच्च आहे. निवडणूकीच्या वेळी आपले मतदान योग्य उमेदवाराला होऊन आपल्या मतदान हक्काची अंमलबजावणी होण्यासाठी आपण जागरुक असलं पाहिजे,असे आग्रही प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी   यांनी आज येथे केले. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आज 9 वा राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘वंचित न राहो कुणीही मतदार’   हे यावेळच्या मतदार दिनाचे घोषवाक्य होते. या निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात नव मतदार, दिव्यांग मतदार व महिला मतदारांचा मोठा सहभाग दिसून आला.              या कार्यक्रमानिमित्त आज सकाळी     जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयापासून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी   मतदार जनजागृती संदर्भात घोषणा देऊन अलिबाग शहरातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मेघा चित्रमंदिर येथे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यसमारंभाला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान येथे

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 25 -   भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ हा अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमात   राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री   ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सकाळी सव्वा नऊ वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होईल. या समारंभास जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूयवंशी यांनी केले आहे. 00000

करंजा मत्स्यबंदर विकास भूमिपुजन येत्या पाच वर्षात 10 हजार कोटींपर्यंत मत्स्योत्पादन नेणार- ना.फडणवीस सागरी सुविधा विकासातून रोजगार निर्मिती- ना. नितीन गडकरी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 24 -   राज्यात मासेमारीतून होणारी सध्या 6 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. येत्या पाच वर्षात राज्यात मत्स्य व्यवसाय सुविधा विकासाला प्राधान्य देऊन   हे उत्पन्न 10 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आपण गाठू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज करंजा ता. उरण येथे व्यक्त केला. करंजा ता.उरण येथील मत्स्यबंदर विकासाचे भूमिपूजन केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक व नौकानयन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे होते. त्यावेळी ना. फडणवीस बोलत होते. पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री   ना. रविंद्र चव्हाण. वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री ना. अर्जून खोतकर, सिडकोचे अध्यक्ष पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, खा. श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील,

गोवर रुबेला लसीकरण मोहिमः जिल्ह्यात आजअखेर 6 लाख 51 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 23 - भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात मंगळवार (दि.22) अखेर जिल्ह्यातील 6 लाख 51 हजार 486 बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.22) दिवसाअखेर जिल्ह्यातील 36 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 22 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 546 विद्यार्थ्यांना तर 14 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 5 हजार 203 विद्यार्थ्यांना अशा एकूण 5 हजार 749 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 3 लाख 37 हजार 950 मुले   व 3 लाख 13   हजार 536 मुली असे एकूण 6 लाख 51 हजार 486 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती   जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.   या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 6060 शाळांपर्यंत पोहोचली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 23 - थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.  यावेळी उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, तहसिलदार के.डी. नाडेकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

किहीम येथील महिलांचे हळदी कुंकूः लुटले वाण ‘मतदार जागृती’ अन् ‘आपत्ती व्यवस्थापना’चे

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 23 - सध्या संक्रांतीचे हळदी कुंकू समारंभ सगळीकडे होत आहेत. महिला वर्गाचे हे एक स्नेह मिलनच असते. या स्नेहमिलनाचे उद्देश असते ते एकमेकींना सौभाग्याचे ‘वाण’ लुटणे. किहीम येथील महिलांनी हळदी कुंकू समारंभात मतदार जागृती आणि आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीचे  ‘वाण’ लुटत वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. रिद्धी महिला मंडळ किहीम व ‘रायगडचा युवक’ या सामाजिक सेवाभावी संस्थेने या कामी पुढाकार घेत हे आयोजन केले होते.   किहीम येथील गणपती मंदिर सभागृहात काल (दि.22) सायंकाळी हा सोहळा पार पडला.   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. जयदीप मोहिते हे होते. तसेच यावेळी   दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) वृषाली पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्ष रश्मी केळूस्कर,   ॲड. निलोफर   शेख, प्रणिता मगर, डॉ. ज्ञानेश्वर शेळके, तलाठी पल्लवी   भोईर, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जयपाल पाटील यांनी उपस्थित महिलांना घरातील विविध उपकरणांशी संबंधित आपत्ती व सुरक्षानिहाय माहिती दिली. तर निवडणूक शाखेच्या वतीने मतदान यंत्र व

जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम मुठवली ता.माणगावः गावकऱ्यांशी पारावर गप्पा, अन घेतला पोपटीचाही आस्वाद

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 23 -  मुठवली ता. माणगाव येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी काल(दि.22) गावात जाऊन मुक्काम केला. या मुक्कामात गावच्या पारावर बसून गावकऱ्यांचे सुखदुःख जाणून घेत. त्यांनी गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेल्या ‘पोपटी’ च्या अविट चवीचा आस्वाद घेत आदरातिथ्यही स्विकारले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींतील 58 गावांचा सहभाग आहे. या अभियानासाठी   प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नेमण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी त्या त्या गावात जाऊन रात्री मुक्काम करुन गावकऱ्यांशी संवाद साधावा असा एक अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी   यांनी राबविला. या उपक्रमाअंतर्गत स्वतः जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशीहे काल अर्थात 22 रोजी रात्री मुठवली या गावी मुक्कामी होते. या गावात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पारावर बसून गावकऱ्यांशी संवाद साधला तर   आपल्या गावी मुक्कामाला आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने ‘पोपटी’ बनवून खाऊ घातली. जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रेमाने या आदरातिथ्याचा स्विकार केला. या उपक्

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- मार्च 2019 या कालावधीमध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायती व नव्याने अस्त्विात आलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर,आगरसुरे,काविर,कुरकुंडी कोलटेंभी, कुर्डूस, कुसुंबळे, चरी, चिंचोटी, चौल, ढवर, ताडवागळे, थळ, धोकवडे, पोयनाड, बामणगाव, बेलकडे, बेलोशी, बोरघर, रामराज, वरंडे, शहापूर, श्रीगाव, सहाण सारळ व सुडकोली या ग्रामपंचातीच्या   प्रारुप मतदार याद्या   दि.21 जानेवारी रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर तसेच तलाठी यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.             सदरची प्रारुप मतदार यादीवर कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास दि.21 ते 23 जानेवारी पर्यंत तहसिल कार्यालयात स्विकारण्यात येतील.   23 जानेवारी नंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही असे तहसिलदार अलिबाग यांनी कळविले आहे. 000000

वित्त व नियोजन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- राज्याचे वित्त व नियोजन, वने, मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे   दि.24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार दि.24 रोजी सकाळी अकरा वा. उरण येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव.   स.11.30 वा.करंजा मच्छिमार जेटीच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती.   स्थळ : उरण.    दुपारी दीड वा. उरण येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 :   25 जानेवारी 2019 रोजी 9 वा राष्ट्रीय मतदार दिवस No Voters to be left behind  हा विषय आगामी लोकसभा निवडणूक 2019 समोर ठेऊन निश्चित करण्यात आला असून या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची  माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली              यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी म्हणाले की, हा कार्यक्रम जिल्हास्तरावर, मतदार संघ स्तरावर, तालुका व मतदान केंद्र स्तरावर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय मतदार दिवसाची मराठी भाषेतील शपथ घेणे, नविन नोंदणी झालेल्या मतदारांना बॅच वितरीत करणे, मतदार नोंदणी जनजागृती EVM/VVPATS जनजागृती बाबत चित्रफित दाखविणे, युवक मतदार महोत्सव साजरा करणे, निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.  राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने शाळा, कॉलेजमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.  सदर कार्यक्रम दि.25 जानेवारी 2019 रोजी सका