ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर



        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- मार्च 2019 या कालावधीमध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायती व नव्याने अस्त्विात आलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर,आगरसुरे,काविर,कुरकुंडी कोलटेंभी, कुर्डूस, कुसुंबळे, चरी, चिंचोटी, चौल, ढवर, ताडवागळे, थळ, धोकवडे, पोयनाड, बामणगाव, बेलकडे, बेलोशी, बोरघर, रामराज, वरंडे, शहापूर, श्रीगाव, सहाण सारळ व सुडकोली या ग्रामपंचातीच्या  प्रारुप मतदार याद्या  दि.21 जानेवारी रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर तसेच तलाठी यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
            सदरची प्रारुप मतदार यादीवर कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास दि.21 ते 23 जानेवारी पर्यंत तहसिल कार्यालयात स्विकारण्यात येतील.  23 जानेवारी नंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही असे तहसिलदार अलिबाग यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक