Posts

Showing posts from December 16, 2018

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम यशस्वीपणे राबवा--उपजिल्हाधिकारी श्रीम.वैशाली माने

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.21 :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने यांनी आज येथे दिले.    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती. माने म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे दि. 24 डिसेंबर 2018 पासून जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्या त येत आहे.   यासाठी पाच सदस्यांची एक टिम तयार करण्यात येऊन प्रत्येक दिवशी 4 प्रात्यक्षिके दाखविणे आवश्यक आहे.   ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविताना तेथे जास्तीत जास्त   नागरिक जमा होतील ते पहावे व प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या सोडविण्याचाही प्रयत्न करावा.    स्ट्राँगरुममधून मशीन घेऊन जाताना तेथे पोलीस कर

गॅस पाईपलाईन शेतकरी मोबदला प्रकरणी 15 दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करा-पालकमंत्र्यांचे आदेश

Image
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.21:- रिलायन्स गॅस पाईपलाईन्स लिमिटेड कंपनीकडून देहेन नागोठणे या इथेन पाईपलाईन प्रकल्पात ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईप लाईन गेली त्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्यासंदर्भात   शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत   राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री   जिल्ह्याचे तथा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली.येत्या 15 दिवसांत सक्षम प्राधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पुर्ण करुन अहवाल सादर करावा असे आदेश   यावेळी ना.चव्हाण यांनी दिले. रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनी लिमिटेड यांच्याकडून पेण, खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अदा केलेल्या मोबदल्याबाबत राजस्व सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखली बैठक पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी रविंद मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे सक्षम प्राधिकारी   पांडुरंग मकदुम,पेण तहसिलदार अजय पाटणे तसेच रिलायन्स कंपनीचे राजेंद्र धड्डा, एस. जयचंद्रन, एल कुमार्वेल, एस.

कातकरी उत्थान जिल्हास्तरीय जनजागृती मेळावाःसहानगोठी येथे 1 हजार 450 जातीचे दाखले व 710 अंत्योदय रेशनकार्ड वितरीत

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कातकरी उत्थान अभियानांतर्गत तालुक्यातील सहानगोठी येथे कातकरी उत्थान जिल्हास्तरीय मेळाव्यात कातकरी बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 1 हजार 450 जातीचे दाखले, 710 अंत्योदय रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी, जिल्ह्यातील कातकरी, ठाकूर समाजातील आदिवासी समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी शासनाच्या नाविण्य पूर्ण योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी, लिलाधर दुफारे यांनी केले. आदिम आदिवासी समाज विकास सेवा संस्था वाघोडे व रियांशु फाऊंडेशन संस्था वरंडेपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने   गणेश मंगळ कार्यालय सहानगोठी बायपास रोड येथे आयोजित कातकरी उत्थान जिल्हास्तरीय जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुके, तहसिलदार सचिन शेजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निघोट, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, आदिम आदिवासी समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश नाईक, उपाध्यक्ष चांगू मेंगाळ,   रियांशु फाऊंड

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे   शुक्रवार दि.21 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.21 रोजी सकाळी सहा वा. अलिबाग शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव., सकाळी 11 वा. रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनी लिमिटेड यांच्याकडून पेण, खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अदा केलेल्या मोबदल्याबाबत बैठक, स्थळः राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, दुपारी पाऊण वा. मांडवा- येळवणे ता. अलिबागकडे प्रयाण, दुपारी दीड वा. मांडवा येळवणे येथे आगमन व साखरपुडा कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी पावणे तीन वा. मांडवा येळवणे येथून   कर्जतकडे प्रयाण, सायं. सहा वा. कर्जत येथे आगमन व   कर्जत तालुका भाजपा कार्यकर्ता बैठकीस उपस्थिती व मार्गदर्शन, स्थळ- भाजपा कार्यालय कर्जत (पू), रात्री आठ वा. कर्जत येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

         मुंबई , दि. 20 :   मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०१८ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या २५ डिसेंबर २०१८ पूर्वी पाठवावीत ,   असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.                   पुरस्कारामध् ये जीवनगौरव पुरस्कार (राज्यस्तरीय) ,   वृत्तपत्र प्रतिनिधी ,   इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी (राज्यस्तरीय) ,   उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार    अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश    आहे.    शाल ,   श्रीफळ ,   मानचिन्ह ,   आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारितेतील उल्लेखनीय लिखाण करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या    नामांकनाच्या प्रवेशिका यापूर्वी मिळालेल्या पुरस्काराच्या माहितीसह आणि सामाजिक कार्याच्या तपशिलासह    (   वृत्तवाहिनींच्या पत्रकारानी वृत्तांकन केलेली सी. डी. सोबत पाठविणे आवश्यक आहे ) येत्या २५ डिसेंबर    २०१८ पूर्वी अध्यक्ष ,   मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ ,   तळमजल

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम

नवी मुंबई , दि .20 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे दि.13 डिसेंबर 2018 पासून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याप्रमाणे कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये अशा मोहिमांचे आयोजन प्रस्तावित करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने या जनजागृती मोहिमेदरम्यान वापरण्यात येणारी मतदान यंत्रे व अधिकारी/कर्मचारी यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत कोकण विभागातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जास्तीत जास्त माहिती प्राप्त करावी असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी विभागातील सर्व मतदारांना केले आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान:नाडसूर ग्रा.पं.च्या वैतागवाडीत तयार टेराकोटा दागिने मुंबईच्या प्रदर्शनात

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.20(डॉ.मिलिंद दुसाने)- बाजारात टेराकोटाच्या दागिन्यांना (विशिष्ट प्रकारच्या मातीपासून बनविलेले) मोठी मागणी आहे. ही मागणी ओळखुन सुधागड तालुक्यातील नाडसुर ग्रामपंचायतीतील वैतागवाडीच्या महिलांनी एकत्र आल्या; टेराकोटा दागिन्यांची निर्मिती करुन बाजारपेठेत जाण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. मुंबई येथील मुंबई स्टॉक एक्सचेंज तर्फे आयोजित वित्त व साहित्य या विषयावरील दलाल स्ट्रीट फेस्टिव्हल मध्ये त्यांनी बनवलेल्या दागिन्यांचे प्रदर्शनही लागले होते. आता या महिला मोठ्या शहरातील बाजारात बनविलेले दागिने विकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पारंपारिक कौशल्याला आधुनिकतेची जोड रायगड जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीतील 55 गावांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान  राबविण्यात येत आहे. नाडसूर ता. सुधागड ही ग्रामपंचायत त्यापैकीच एक.   या ग्रामपंचायतीत येणाऱ्या वैतागवाडी गावातील शेतकरी महिला उत्पादक बचत गट आणि धोंडसे गावातील संत गोरोबा कुंभार महिला बचत गट अशा दोन बचत गटाच्या महिला. यापैकी संत गोरोबा कुंभार महिला बचत गटाच्या म

गोवर रुबेला लसीकरण मोहिमः जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 67 हजार बालकांना लसीकरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात बुधवार (दि.19 डिसेंबर) अखेर जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 715  बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (बुधवार दि.19) दिवसाअखेर जिल्ह्यातील 112 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 16 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1476 विद्यार्थ्यांना तर 96 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 12 हजार 904 विद्यार्थ्यांना अशा एकूण 14 हजार 380 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 7 हजार 254 मुले व 7 हजार 126 मुलींचा समावेश आहे.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 42 हजार 929 मुले   व 2 लाख 24   हजार 786 मुली असे एकूण 4 लाख 67 हजार 715 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते हे   शनिवार दि.22 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शनिवार दि.22 रोजी सकाळी 11 वा. मोतिमहल डिलक्स हॉटेल , बांधनवाडी ता.पनवेल येथे आगमन, सकाळी साडेअकरा वा.इंदापुरकडे प्रयाण. दुपारी दीड वा.इंदापूर येथे आगमन , दुपारी साडेतीन वा.इंदापुर येथून मौजे देवळी कोंड ता, माणगावकडे प्रयाण. दुपारी साडेचार वा. मौजे देवळी कोंड येथून   कस्तुळे ता. माणगावकडे प्रयाण. सायं. साडेसहा वा. मुद्रा बीच रिसॉर्ट   दिवेआगर उत्तरेश्वर पाखडी ता. श्रीवर्धन येथे आगमन.   रविवार दि.23 रोजी सकाळी साडेदहा वा. मुद्रा बीच रिसॉर्ट येथून   आर.एन राऊत माध्यमिक विद्यालय मैदान श्रीवर्धन येथे आगमन, सकाळी साडेअकरा वा. पुणेकडे रवाना. 00000

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’ प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद

  अलिबाग, जि. रायगड ,   दि. 1 9(जिमाका)- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ ,   त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   ‘ लोक संवाद ’   साधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.   1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण) ,   उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना ,   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना , प्रधानमंत्री पीक विमा योजना ,   मागेल त्याला शेततळे ,   गाळमुक्त धरण , गाळयुक्त शिवार ,   स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ,   सूक्षम सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ज

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून बुधवार दि.19 डिसेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्री मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1)(3)   प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. सदर आदेश अपर जिल्हादंडाधिकारी किरण पाणबुडे यांनी   जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 00000

गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 53 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.   या अभियानात रायगड जिल्ह्यात मंगळवार (दि.18 डिसेंबर)   अखेर जिल्ह्यातील 4 लाख 53 हजार 335   बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.18) दिवसाअखेर   जिल्ह्यातील 102 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 20 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1566 विद्यार्थ्यांना तर 82 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 13 हजार 87 विद्यार्थ्यांना अशा एकूण 14 हजार 653 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 7 हजार 571 मुले व 7 हजार 82 मुलींचा समावेश आहे.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 35 हजार 675 मुले   व 2 लाख 17   हजार 660 मुली असे एकूण 4 लाख 53 हजार 335 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिक

पनवेल मध्ये विविध विकासकामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातूनच विकास शक्य- ना.चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19:- रचनात्मक विकासासाठी कायद्याच्या चौकटीत राहून महसुली आणि भांडवली जोड द्यावी लागते. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी समन्वयाने योग्य पाऊले उचलली तरच विकास होतो, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज पनवेल येथे केले.              पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पनवेल व नवीमुंबई भागात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमांना महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील , सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिति अध्यक्ष मनोहर म्हात्रे , महिला व बाल कल्याण सभापती लिना गरड , माजी उपमहापौर चारुशीला घरत, जगदीश गायकवाड, अभिमन्यु पाटील, एकनाथ   गायकवाड, दिलीप पाटील, चंद्रकांत सोनी,   उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, माजी सभापती दर्शना भोईर, मनोज भुजबळ, डॉक्टर अरुणकुमार भगत, विद्या गायकवाड, अरुणशेठ भगत, जयंत पगडे,

गावाशी ‘नाळ’ जोडली; रायगडच्या भूमिपुत्रांचे यशस्वी ‘पुनरागमन’ 63 कुटूंबांचे यशस्वी पुनर्स्थलांतर,112 कुटूंब गावच्या वाटेवर

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.19 (डॉ.मिलिंद दुसाने)- मुंबईसारख्या महानगरात केवळ रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या रायगडच्या भुमिपुत्रांनी पुन्हा आपल्या गावाशी ‘नाळ’ जोडून घेत आपल्याच गावी यशस्वी ‘पुनरागमन’ केलंय. आपल्या गावी परतू इच्छिणाऱ्या या भूमिपुत्रांना पाठबळ देण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र कक्ष स्थापन केलाय. या कामी जिल्हा प्रशासनाला स्वदेस फाऊंडेशन सक्रिय सहभाग देत मदत करीत आहे. मार्च 2018 पासून सुरु झालेल्या या अनोख्या अभियानामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 63 कुटूंबांचे यशस्वी पुनरागमन झाले आहे.   तर 112 कुटूंब पुन्हा आपल्या गावी परतण्याच्या वाटेवर आहेत. रोजगारासाठी महानगरांकडे स्थलांतर ही तशी एक स्वाभाविक प्रक्रिया मानली जाते. रायगड जिल्ह्यातल्या ग्रामिण भागातूनही अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर होत असते. त्यामुळे खेडी ओस पडली आणि शहरे बकालपणे फुगू लागली. शहरात राहून धकाधकीचे जीवन जगून पैसा मिळत असेलही पण स्वास्थ्य समाधानाचे काय? हा प्रश्न आणि या प्रश्नाचे गमक उमगलेल्या काही भूमिपुत्रांनी योग्य वेळी निर्णय घेतला आणि पुन्हा आपल्या गावच्या मातीशी नाळ जोडून घे

माथेरान संनियंत्रण समितीची बैठक 21 रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन संनियंत्रण समितीची बैठक शुक्रवार दि.21 रोजी सकाळी 10 वाजता  माथरान नगर परिषदेच्या समिती सभागृह, माथेरान ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या क्षेत्रात करावयाच्या विकास कामांचे प्रस्ताव  तसेच या समितीकडे करावयाच्या तक्रारींसाठी नागरिकांनी आपले अर्ज या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे तात्काळ सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि.4 फेब्रुवारी 2003   च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण 89 (काही पूर्ण व काही भागत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पुर्ण   1 व भागत: 19, एकूण- 20,खालापूर तालुक्यातील भागत: 10,पनवेल तालुक्यातील पुर्ण 2 व भागत: 38, एकूण- 40,आणि ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुक्यातील भागत: 19,अशा एकूण 89 गावांचा प्रदेश समाविष्ट आहे. वरील समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसिलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे. या गावामधील जो भाग संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  बुधवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- बुधवार दि.19 डिसेंबर रोजी सकाळी दहा वा. खारघर येथे आगमन व प्रभाग अ विभागीय कार्यालय उद्घाटन . स्थळ: ग्रामपंचायत इमारत, खारघर. सकाळी साडेदहा वा. खारघर येथून प्रयाण. सकाळी पावणे अकरा वा.   रोड पाली (कळंबोली) येथे आगमन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.सव्वा अकरा वा. प्रभाग ब विभागीय कार्यालय कळंबोली उद्घाटन. स्थळ:ग्रामपंचायत इमारत, कळंबोली.   पावणे बारा वा. रोड पाली (कळंबोली) येथून कामोठे कडे प्रयाण. दुपारी 12 वा. कामोठे येथे आगमन व प्रभाग क विभागीय कार्यालय उद्घाटन. स्थळ: ग्रामपंचायत इमारत कामोठे. दुपारी साडेबारा वा. जुई कामोठे रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन.स्थळ- जुई कामोठे. दुपारी पाऊण वा. जुई कामोठे येथून आसूडगांव कडे प्रयाण. दुपारी एक वा.आसुडगांव खांदा कॉलनी येथे आगमन व रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन.स्थळ-आसुडगांव(खांदा कॉलनी पनवेल) दुपारी दीड वा.आसुड

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’

Image
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद   अलिबाग, जि. रायगड ,   दि. 1 8(जिमाका)- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ ,   त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   ‘ लोक संवाद ’   साधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.   1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण) ,   उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना ,   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना , प्रधानमंत्री पीक विमा योजना ,   मागेल त्याला शेततळे ,   गाळमुक्त धरण , गाळयुक्त शिवार ,   स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ,   सूक्षम सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गे